हार्ट अ‍ॅटॅक आणि सुखी-समृध्द जीवन

हृदयविकार टाळण्यासाठी व हृदयविकारातून सावरण्यासाठी…


डॉ. टॉम स्मिथ यांना वैद्यकीय व्यवसायाचा आणि संशोधनाचा दहा वर्षांचा अनुभव असून ते पूर्णवेळ लेखन करतात. वैद्यकीय जर्नल्समध्ये आणि मासिकांमध्ये त्यांचे लेख नियमितपणे प्रसिद्ध होत असतात आणि काही वर्तमानपत्रांतून त्यांचे स्तंभलेखनही चालू असतं. त्यांची वैद्यकीय समस्यांवरची पुस्तकं लोकप्रिय आहेत.

अनुवाद :
डॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.


बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराने ग्रस्त असणार्‍याचं प्रमाण सर्वत्र दिवसेंदिवस वाढतं आहे. विशेषत: तरुणांमध्ये आणि स्त्रियांमध्येही हृदयविकाराच्या रुग्णांत झालेली लक्षणीय वाढ चिंताजनक वाटणारी आहे.
मात्र योग्य व नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य जीवनशैली ही ‘त्रिसुत्री’ अंगिकारल्यास हृदयविकारावर मातही करता येते हेही तितकंच खरं आहे. हे पुस्तक याचविषयी संपूर्ण मार्गदर्शन करतं.
ठळक वैशिष्टये
0 हृदयाचं कार्य कसं चालतं?
0 हृदयविकाराची कारणं कोणती?
0 उच्चरक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
0 कोलेस्टेरॉलमुळे कोणते धोके संभवतात?
0 अंजायनाशी मुकाबला कसा कराल?
0 हृदयविकाराच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करावेत?
0 हृदयविकार टाळण्याकरिता जीवनशैली कशी असावी?
0 हार्ट अ‍ॅटॅक किंवा हृदयविकार कसा टाळाल?
0 हार्ट अ‍ॅटॅक आल्यास कसे सामोरे जाल?
0 अ‍ॅटॅक येऊन गेल्यानंतर कोणती काळजी घ्याल?


125.00 Add to cart