भारत : समाज आणि राजकारण

यशवंतराव चव्हाण यांचे प्रगट चिंतन


डॉ. जयंत लेले
अनुवाद: माधवी गी. आर.कामात 


आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करून देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी तीन खंडांमधून आत्मचरित्र लिहिण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात त्यातील एकच खंड प्रकाशित होऊ शकला. प्रा. जयंत लेले यांच्या प्रदीर्घ मुलाखतसत्रांतून आकारास आलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे एका अर्थाने यशवंतरावांनी लेले यांना सांगितलेले आत्मचरित्र म्हणावे लागते. ‘‘हा मी स्वत:शी करत असलेला संवाद आहे” असे स्वत: यशवंतरावच म्हणतात यात सारे काही आले. यशवंतरावांचे राज्य व राष्ट्र या दोन्ही पातळ्यांवरचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक दृष्टिकोन आणि व्यवहार यांचा हा सखोल अभ्यास आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास जागतिक पातळीवरील स्थित्यंतरांच्या संदर्भात करण्यात आलेला असल्याने तो एकमेवच मानावा लागतो. आपण मनापासून स्वीकारलेली स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे एकीकडे व प्रत्यक्ष राजकीय व्यवहार दुसरीकडे. तर प्रसंगी स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांमधील द्वंद्वावर मात करण्याची यशवंतरावांची धडपड लेले यांनी हळुवारपणे उकलली आहे. चव्हाण साहेबांची राजकीय भूमिका व शैली यांच्यासाठी त्यांनी केलेला सैद्धांतिक व्यवहारवाद हा शब्दप्रयोग अत्यंत समर्पक म्हणावा लागेल.

स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान झालेली यशवंतरावांची वैचारिक वाटचाल, स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई राज्याच्या व द्वैभाषिकाच्या कायदेमंडळात घडलेला प्रशासक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अविचलपणे राष्ट्रीय व प्रादेशिक हितसंबंधांचा मेळ घालणारा मुत्सद्दी, चिनी आक्रमणामुळे अचानकपणे अंगावर आलेली जबाबदारी पेलणारा खंबीर नेता व विचारवंत असे अनेक पैलू या ग्रंथातून उलगडतात. महाराष्ट्र आणि भारत या दोन्ही स्तरांवरील सहकारी व स्पर्धक यांच्याशी आपल्या मानवी पातळीवरील संबंधांविषयी इतक्या स्पष्टपणे यशवंतराव कधीच बोलले नव्हते. या सर्व गोष्टींचा उपयोग राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत वावरणाऱ्यांना तर होईलच पण महाराष्ट्राने यशवंतरावांचा कृतज्ञतापूर्वक अभिमान का बाळगायचा हे देखील समजेल.


750.00 Add to cart

बबडू बँकेत

मुलांसाठी बँक व्यवहारांची गोष्टीरूप ओळख


विजय तांबे


बँकेचे व्यवहार कसे चालतात?

बँकेत खाती किती प्रकारची असतात?

बचत खातं (Saving Account) कसं उघडायचं?

मुदत ठेव खातं (FD) म्हणजे काय ?

एटीएममधून पैसे कसे काढायचे?

डेबिट आणि क्रेडिट कार्ड यामध्ये काय फरक असतो?

चेक कसा लिहायचा? कसा भरायचा?

चेकवरच्या विविध आकड्यांचा अर्थ काय ?

NEFT, RTGS, IMPS यामार्फत पैसे कसे ट्रान्स्फर करायचे ?

मुलांच्या चौकस बुद्धीला बँक व्यवहारांबाबत

असे अनेक प्रश्न पडत असतात.

दीर्घ काळ बँकिंग श्रेत्रात कार्य केलेल्या

लेखक विजय तांबे यांनी या पुस्तकात

मुलांच्या या प्रश्नांना गोष्टीरूपात,

रंजक पद्धतीने उत्तरं दिली आहेत.

मुलांना बँक व्यवहारांबाबत सजग करणारं पुस्तक.



100.00 Add to cart

तुमच्या आमच्या लेकी

त्यांचं आरोग्य…त्यांच्या समस्या मनमोकळ्या संवादातून सहज-सोपं समुपदेशन


डॉ. लिली जोशी


आरोग्य-समस्या घेऊन येणारा पेशंट अनेक वेळा मानसिक दडपणाखाली असतो.
त्याच्या आरोग्य-तक्रारींचं मूळ कारण ही दडपणं तर नसावीत?
अशी शक्यता लक्षात घेऊन डॉ. लिली जोशी आपल्या पेशंटशी संवाद साधता साधता त्याचा विश्वास संपादन करतात आणि पेशंट त्यांच्यापाशी मन मोकळं करतो.
आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक समस्या सांगतो…आणि `डॉक्टर’ लिली जोशी यांच्याकडे येणार्‍या तरुणींसाठी किंवा रजोनिवृत्तीला आलेल्या स्त्रियांसाठीही त्या `लिलीताई’ होऊन जातात ! आरोग्य समस्यांचं मूळ कोठे आहे, याचा या डॉक्टरताना नेमका ठावठिकाणा लागतो.
वैद्यकीय उपचारांबरोबर केलेलं नेमकं समुपदेशन
लागू पडतं आणि या स्त्रिया शरीराने व मनाने तंदुरुस्त होऊन आयुष्याला भिडायला, आनंदी जीवन जगायला मोकळ्या होतात…!
डॉ. लिली जोशी यांनी त्यांच्या खास शैलीत असे विविध अनुभव बोलक्या कहाण्यांच्या स्वरुपात या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. हे अनुभव वाचकांना एक प्रकारचं सामाजिक भान तर देतीलच पण त्याचबरोबर स्वत:च्या समस्यांची उत्तरंही देऊन जातील !
आजच्या जीवनात अनेक आघाड्यांवर सामना करणार्‍या, धडपडणार्‍या, अडखळणार्‍या तरुणींना, स्त्रियांना मार्गदर्शन करणार्‍या या…तुमच्या-आमच्या लेकी!


180.00 Add to cart

उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा

व्यवसाय करण्यासाठी पैसा नव्हे, वृत्ती हवी!


सुरेश हावरे


आपल्या समाजात उद्योजकांविषयी एक प्रकारचं कुतूहल आणि अनेक प्रकारचे समज-गैरसमज असतात. उद्योगाशी निगडित अशा अनेक समजुतींचा तसंच तरुणांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणार्‍या घटनांचा ऊहापोह या पुस्तकात लेखकाने अतिशय रंजकपणे केला आहे.
केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास यशस्वीपणे उद्योग करता येतो या जनमानसात सर्वसाधारणपणे असलेल्या समजुतीलाच हावरे यांनी छेद दिला आहे. भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो. मात्र व्यवसाय करण्यासाठी मुख्य भांडवल तुमच्यापाशी आवर्जून हवं असतं ते दुर्दम्य इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं व व्यावसायिक वृत्तीचं! हा मूलभूत मंत्र आत्मसात करण्यासाठी आणि पुढे प्रत्यक्षात व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी लागणार्‍या घटकांची चर्चा ते विस्तृतपणे पुस्तकातून करतात. उद्योगाची उभारणी कशी करावी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग, रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ कशी करावी असे महत्त्वाचे विषय त्यांनी यात हाताळले आहेत.

जो स्वत:च्या अनुभवातून शिकतो, तो हुशार माणूस समजला जातो पण जो इतरांच्या अनुभवातून शिकतो तो खरा चाणाक्ष माणूस. त्यामुळे नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणार्‍या तरुणांसाठी हे अनुभवाचे बोल अत्यंत उपयोगी पडतील.
‘उद्योजक हा राष्ट्राची संपत्ती निर्माण करणारा मुख्य घटक असतो’ असं मत हावरे आत्मविश्वासपूर्वक व्यक्त करतात. अनेक वर्षं यशस्वीपणे बांधकाम क्षेत्रातील उद्योगधुरा सांभाळणार्‍या हावरे यांचे अनुभवाचे बोल नवउद्योजकांसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरतील


195.00 Add to cart

चार आठवडयात वजन कमी करा!


डॉ. नमिता जैन
अनुवाद: डॉ. अरूण मांडे


तुम्ही आत्तापर्यंत बरेचवेळा डाएटिंग केलं असेल पण फक्त चार आठवड्यात तुमच्या शरीराला हवा तसा आकार देणं तुम्हाला जमलंय का? हे पुस्तक तुम्हाला ते निश्चितच जमवून देईल.
लेखिका डॉ.नमिता जैन या प्रसिद्ध‌ आहार व स्वास्थ्यतज्ज्ञ आहेत. त्यांच्या वीस वर्षांच्या अनुभवातून त्यांनी तुमच्या जीवनशैलीला अनुसरून आणि कोणताही चित्र-विचित्र शॉर्टकट न वापरता प्रत्यक्षात आणता येईल असा उत्कृष्ट डाएट प्लॅन तयार केला आहे.

या डाएट प्लॅनची वैशिष्ट्यं म्हणजे-
+ वैयक्तिक गरजेनुसार आहारात बदल.
+ या प्लॅनमध्ये कोणतेही न ऎकलेले पदार्थ नाहीत.
+ तुम्हाला कोणताही बेचव आणि अनाकर्षक आहार घ्यावा लागणार नाही.
+ हे पदार्थ तुमच्या नेहमीच्या भाज्या व मसाले वापरून करता येण्यासारखे आहेत.
+ या डाएट प्लॅनमधले पदार्थ कमी तेलाचे आणि कमी उष्मांक असलेले तरीही चविष्ट आहेत.

पुस्तकाची इतर वैशिष्ट्यं आहेत-
+ घरी करता येण्यासारखे व्यायाम
+ वजन कमी करण्याविषयीची माहिती
+ दैनंदिन जीवनातील अनुभवांची उदाहरणं

मग वाट कसली बघताय? आजच हा डाएट प्लॅन सुरू करा आणि चार आठवडयात शिडशिडीत फिगर बनवा!


200.00 Add to cart

योगाचार्य

बी.के.एस. अय्यंगार यांचं चरित्र

रश्मी पालखीवाला
अनुवाद : नीता कुलकर्णी


कर्नाटकातल्या एका लहानशा खेड्यातून बी.के.एस. अय्यंगार यांच्या कष्टप्रद जीवनप्रवासाला सुरुवात झाली. कुमारवयापासूनच त्यांना सुप्रसिद्ध योगतज्ज्ञ कृष्णमाचार्य यांचा सहवास लाभला व त्यांच्यात गुरु-शिष्य नातं निर्माण झालं. मात्र हे गुरु-शिष्य संबंध कायमच तणावपूर्ण राहिले, तरी अय्यंगारांनी मोठ्या जिद्दीने कृष्णमाचार्यांकडून योगविद्या शिकून घेतली.

भविष्य घडवण्यासाठी पुणे शहरात आल्यावर अय्यंगारांच्या जीवनाला वेगळं वळण लाभलं. या अनोळखी शहरात जम बसवायला अय्यंगारांना बराच संघर्ष करावा लागला… जणू काही ती त्यांची आणि योगविद्येची कसोटीच होती. आणि त्या संघर्षात ते यशस्वी झाले! त्यांची कीर्ती देशविदेशात पसरली. एवढी की, आंतरराष्ट्रीय पातळीवर योग आणि अय्यंगार हे अतूट समीकरण तयार होऊन ‘अय्यंगार योग’ अशी जणू एक वेगळी शाखाच निर्माण झाली. अय्यंगारांनी निरामय आयुष्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे हे सर्वसामान्यांच्या मनावर ठसवलं, विविध साधनांचा वापर सुचवून योग लोकप्रिय केला.

रश्मी पालखीवाला या अय्यंगारांच्या निकटवर्तीयांपैकी एक होत. या पुस्तकात त्यांनी अय्यंगार यांच्या जीवनातले चढ-उतार, त्यांचे स्वभावविशेष उत्कटतेने चितारले आहेत, तसंच योगसाधनेकडे पाहायचा गुरुजींचा दृष्टिकोन आणि त्यामागचं त्यांचं तत्त्वज्ञानही विशद केलं आहे.

जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत योगसाधना हा ध्यास असलेल्या हाडाच्या योगशिक्षकाचं चरित्र…योगाचार्य !


A saga of a Maestro, who made study and practice of yoga his life mission. A profound biography of Yogacharya B. K. S. Iyyangar, an Internationally renowned yoga teacher, practitioner and a thinker. This book speaks about his childhood, hardships- he faced, his stern and over-strict guru, his struggle to popularize yoga among common people, his popularity and the respect he earned through out the world. Written by the member of one of his close family friends, Rashmi Palkhiwala, this book is a must-read for everyone who wants to know how Shri. Iyyangar made Yoga the matter of pride in the world.


300.00 Add to cart

युरेका क्लब

संवादातून ओळख संशोधकांची आणि त्यांच्या संशोधनांची!


गौरी गंधे


गप्पांमधून, संवादामधून संशोधकांची, त्यांनी लावलेल्या शोधांची आणि त्यांच्या आयुष्यातील गमतीजमतींची माहिती ‘शेअर’ करण्याचा क्लब म्हणजे ‘युरेका क्लब’!
या क्लबची भन्नाट आयडियाही शाल्मली, ईशा, अनिकेत, प्रणव आणि विराज अशा तुमच्यासारख्या मुलांचीच! या मुलांबरोबर या क्लबमध्ये आहे, एक ताई. तिने सायन्समधून एम.एस्सी. केलंय. मुलांच्या कलाने शिकवायची विलक्षण हातोटी तिच्याकडे आहे. मुलं तिच्याशी संशोधकांबद्दल बोलतात, प्रश्न विचारतात. कधी इंटरनेटचा वापर करून, तर कधी एनसायक्लोपीडिया वाचून शास्त्रज्ञांची माहिती गोळा करतात. इतकंच नाही, तर मोठ्या माणसांसारखी ‘प्रेझेंट’ही करतात! जिथे मुलं अडतात किंवा ताईला जास्तीची माहिती द्यावीशी वाटते तिथे ताई सहजसोप्या शब्दांत, न चिडता किंवा न ओरडता ती समजावून सांगते! आणि मग या संवादातून मिळत जाते युक्लिड, कोपर्निकस, आर्किर्मिडीज, न्यूटन, मेरी क्यूरी, आइनस्टाइन यांसारख्या २६ संशोधक आणि त्यांच्या शोधकार्याची माहिती!
ताई व मुलांच्या या ‘इनोव्हेटिव्ह’ गप्पांमधून तुम्हालाही उलगडत जातील अनेक संशोधनांमधली मर्मं आणि मग तुमच्याही तोंडून नकळत उद्गार बाहेर पडतील– ”युरेका… युरेका… युरेका क्लब!”


100.00 Add to cart

भगवद्गीता : गांधीजींच्या चिंतनातून

महात्मा गांधी यांनी जनसामान्यांसाठी भगवद्गीतेचं केलेलं नेमकं विवेचन


महात्मा गांधी

अनुवाद : भगवान दातार


‘महाभारत’ या ग्रंथातील मुगुटमणी म्हणजे ‘भगवद्गीता’! भगवद्गीतेने शतकानुशतकं अनेक विचारवंतांना आणि आध्यात्मिक चिंतकांना भुरळ घातली आहे. अनेकांनी गीतेचा अर्थ आणि रोजच्या आयुष्यातील प्रश्नं यांच्यातील नातं शोधायचा प्रयत्न केला आहे.

पण या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे आयुष्यभर ज्यांनी अहिंसेची कास धरली, त्या महात्मा गांधी यांनी या पुस्तकात कौरव-पांडवांतील युद्धाचं रूपक मांडत सांगितलेल्या गीतेवर स्वत:चं विवेचन मांडलंय.

अनासक्ती योग, कर्मयोग आणि सत्यपालन या गीतेतल्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकत यातल्या सर्व अध्यायांवर असलेलं गांधीजींचं हे चिंतन एक वेगळा आयाम समोर मांडतं. आजच्या काळाशी गीताविचाराचा संदर्भ जोडणारं महात्मा गांधी यांचं प्रगल्भ चिंतन – भगवद्गीता : गांधीजींच्या चिंतनातून


300.00 Add to cart

सूळकाटा


ल.सि. जाधव


प्रसिद्ध लेखक ल.सि. जाधव यांच्या गाजलेल्या ‘होरपळ’ या आत्मकथनाचा ‘सूळकाटा’ म्हणजे पुढचा भाग. संयत व प्रवाही भाषाशैली, बारीक तपशिलांतून प्रसंग उभे करण्याची हातोटी आणि आपल्या समाजाप्रतीची कळकळ अशी होरपळ या आत्मकथनाची सगळी वैशिष्ट्यं सूळकाटातही दिसून येतात.
या आत्मकथनाचा गाभा प्रामुख्याने त्रिस्तरीय आहे. पहिला स्तर हा मातंग समाजाची दुःख, त्यांना सोसावे लागणारे चटके आणि त्याबद्दल लेखकाला असलेली कळकळ याबद्दलचा आहे. दुसरा स्तर हा लेखकाचा तरुण मुलगा अकाली गेल्याने घनव्याकूळ करणाNया दुःखाचा आहे. तर, लेखनाची निर्मितीप्रक्रिया आणि घरात तसेच समाजात लेखकाचं असलेलं स्थान याबद्दल केलेलं परखड भाष्य हा तिसरा आणि महत्त्वाचा स्तर…
हे संपूर्ण आत्मकथन एकाच वेळी वैयक्तिक व त्याच वेळी सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं दुःख व्यक्त करत राहतं. ते केवळ दुःख व्यक्त करून थांबत नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन, या सगळ्याकडे उदार दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणूनच वेगळ्या उंचीवर पोचतं.
सलत राहणारा, सलता सलता अंतर्मुख करणारा, जीवनविषयक अंतर्दृष्टी देणारा… सूळकाटा !


250.00 Add to cart

करामत धाग्या-दोऱ्यांशी

वस्त्रांच्या रंगीबेरंगी दुनियेचा बहुपदरी मागोवा व त्यातील विज्ञान


[taxonomy_list name=”product_author” include=”391″]


वस्त्र ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक ! वस्त्रांचा वापर आपण शरीर-संरक्षणाबरोबरच आपलं व्यक्तिमत्त्व अधिक खुलवण्यासाठी, आणि इतरांवर प्रभाव पाडण्यासाठीही करतो. आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेली ही वस्त्रं नेमकी कशी बनतात, याचे ‘धागे-दोरे’ या पुस्तकात विख्यात पदार्थविज्ञानतज्ज्ञ डॉ. वर्षा जोशी यांनी रंजकपणे उलगडून दाखवले आहेत.

कोणत्या मोसमात कोणती वस्त्रं वापरायची, हे ते वस्त्र ज्या धाग्यांपासून तयार होतं त्यांच्या गुणधर्मावर अवलंबून असतं. हे गुणधर्म कोणते, त्या धाग्यांची रचना कशी असते, त्यापासून वस्त्रं कशी विणली जातात, ती कशी रंगवली जातात, त्यावर छपाई कशी केली जाते, कोणत्या प्रक्रिया होतात, आदी अनेक गोष्टींची रंजक माहिती या पुस्तकात सहजसोप्या भाषेत देण्यात आली आहे.

ई-टेक्स्टाइलसारख्या आधुनिक काळातल्या चलाखतंतूंचा म्हणजेच ‘स्मार्ट फायबर्स’ चाही अंतर्भाव यात करण्यात आला आहे. तसंच समृद्ध अशा भारतीय वस्त्रपरंपरेचा वेधक मागोवाही घेण्यात आला आहे. याशिवाय निरनिराळ्या वस्त्रांची निगा कशी राखावी, अशा उपयुक्त माहितीचाही पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
वस्त्रांचा इतिहास कथन करणारं, त्याविषयीचं कुतूहल शमवणारं आणि त्यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारं पुस्तक…
करामत धाग्या-दोर्‍यांची!


250.00 Add to cart

ना. मा. निराळे

आणि इतर सहा कथा


सतीश तांबे


ना. मा. निराळे तुम्हाला सांगतो भाऊ , आपल्या आस्तिक प्रतिमेचा फायदा घेऊन आपण त्या गावचेच नाही , असा आव आणत नामानिराळे राहत अनेक साळसूद आपल्या आसपासच्या दुबळ्या मनांच्या लोकांच्या आयुष्याची फरफट करत असतात….

प्रत्येक आत्महत्या हा एक डबल मर्डर असतो . म्हणजे असं , की एक म्हणजे तो मरणारा स्वतःचा मर्डर करत असतो , आणि दुसरे मर्डर करणारे असतात असे कुणीतरी नामानिराळे ज्यांच्या विरोधात सज्जड पुरावा असा कोणताही नसतो . आता माझंच बघा ना , अविनाशच्या आत्महत्येसाठी मला कुणीही पकडू शकत नाही . कारण माझ्या मनात जे मतलबाचे व्यवहार चालतात ना , ते मी एक तर सहसा शब्दबद्धच करत नाही , मग ते कुणाला कसे कळणार?

माझं तर असं म्हणणं आहे की, प्रत्येक उद्ध्वस्त आयुष्याच्या मागील काळोखात नामानिराळ्यांची एक कुमक उभी असते . त्यातील काही नामानिराळे हे कळून सवरून असतील, तर काही नकळत अजाणता असतील. सगळे वरवर संभावित साले… करून सवरून नामानिराळे … ना.मा. निराळे … नालायक मादरचोद निराळे!

250.00 Add to cart
1 2 3