युरेका क्लब

संवादातून ओळख संशोधकांची आणि त्यांच्या संशोधनांची!


इन्स्ट्रुमेन्ट्स इंजिनिअरिंगमध्ये बीई केलेल्या गौरी यांनी पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. शालेय काळापासूनच त्या भारतीय शास्त्रीय नृत्याचं शिक्षण घेत असून त्या भरनाट्यम् शिकल्या आहेत. सध्या ती विविध वयोगटाला भरतनाट्यम शिकवण्याचा आनंद घेत आहेत.

गप्पांमधून, संवादामधून संशोधकांची, त्यांनी लावलेल्या शोधांची आणि त्यांच्या आयुष्यातील गमतीजमतींची माहिती ‘शेअर’ करण्याचा क्लब म्हणजे ‘युरेका क्लब’!
या क्लबची भन्नाट आयडियाही शाल्मली, ईशा, अनिकेत, प्रणव आणि विराज अशा तुमच्यासारख्या मुलांचीच! या मुलांबरोबर या क्लबमध्ये आहे, एक ताई. तिने सायन्समधून एम.एस्सी. केलंय. मुलांच्या कलाने शिकवायची विलक्षण हातोटी तिच्याकडे आहे. मुलं तिच्याशी संशोधकांबद्दल बोलतात, प्रश्न विचारतात. कधी इंटरनेटचा वापर करून, तर कधी एनसायक्लोपीडिया वाचून शास्त्रज्ञांची माहिती गोळा करतात. इतकंच नाही, तर मोठ्या माणसांसारखी ‘प्रेझेंट’ही करतात! जिथे मुलं अडतात किंवा ताईला जास्तीची माहिती द्यावीशी वाटते तिथे ताई सहजसोप्या शब्दांत, न चिडता किंवा न ओरडता ती समजावून सांगते! आणि मग या संवादातून मिळत जाते युक्लिड, कोपर्निकस, आर्किर्मिडीज, न्यूटन, मेरी क्यूरी, आइनस्टाइन यांसारख्या २६ संशोधक आणि त्यांच्या शोधकार्याची माहिती!
ताई व मुलांच्या या ‘इनोव्हेटिव्ह’ गप्पांमधून तुम्हालाही उलगडत जातील अनेक संशोधनांमधली मर्मं आणि मग तुमच्याही तोंडून नकळत उद्गार बाहेर पडतील– ”युरेका… युरेका… युरेका क्लब!”


100.00 Add to cart

बबडू बँकेत

मुलांसाठी बँक व्यवहारांची गोष्टीरूप ओळख


राष्ट्रीयीकृत बँकेत तीस वर्षे नोकरी. नंतर स्वेच्छानिवृत्ती. तीन कथासंग्रह प्रकाशित. तरुणपणापासून समाजकार्याची आवड. विविध सामाजिक संघटनांशी संबंधित. चौथी औद्योगिक क्रांती अर्थात एआयचे भविष्यात होणारे परिणाम हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी ते विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात.

बँकेचे व्यवहार कसे चालतात?

बँकेत खाती किती प्रकारची असतात?

बचत खातं (Saving Account) कसं उघडायचं?

मुदत ठेव खातं (FD) म्हणजे काय ?

एटीएममधून पैसे कसे काढायचे?

डेबिट आणि क्रेडिट कार्ड यामध्ये काय फरक असतो?

चेक कसा लिहायचा? कसा भरायचा?

चेकवरच्या विविध आकड्यांचा अर्थ काय ?

NEFT, RTGS, IMPS यामार्फत पैसे कसे ट्रान्स्फर करायचे ?

मुलांच्या चौकस बुद्धीला बँक व्यवहारांबाबत

असे अनेक प्रश्न पडत असतात.

दीर्घ काळ बँकिंग श्रेत्रात कार्य केलेल्या

लेखक विजय तांबे यांनी या पुस्तकात

मुलांच्या या प्रश्नांना गोष्टीरूपात,

रंजक पद्धतीने उत्तरं दिली आहेत.

मुलांना बँक व्यवहारांबाबत सजग करणारं पुस्तक.


100.00 Add to cart

सुसंवाद सहकार्‍यांशी

नोकरीत बढतीसाठी व यशस्वी व्यवसायासाठी


एम. के. रुस्तुमजी हे टेल्को कंपनीचे अत्यंत वरिष्ठ व्यवस्थापक होते. व्यवस्थापनशास्त्रावर त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांना जगभर प्रचंड मागणी आहे. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, स्पेन, जपान, ब्राझिल, झेकोस्लाव्हाकिया व इस्राइल या देशांमध्ये त्यांची पुस्तकं लोकप्रिय झाली आहेत. त्यांच्या पश्चातही अजूनही त्यांची पुस्तकं विक्रीचे नवेनवे विक्रम करत आहेत. कारण व्यवस्थापन क्षेत्राचा अनुभव असलेल्या अनुभवी माणसांनी क्वचित व्यवस्थापनावरील पुस्तकं लिहिली. 'उद्योग व्यवसायातील मानवीसंबंध' या विषयांवर 'फर्स्ट ड्यूक ऑफ एडिनबर्ग्स कॉन्फरन्स’मध्ये रुस्तुमजींनी सहभाग घेतला होता. त्यानंतर भारत सरकारने त्यांची 'नवल टाटा कमिटी ऑन शेअरिंग द गेन्स ऑफ प्रॉडक्टिव्हिटी' या समितीवर मालकांचे प्रतिनिधी म्हणून खास नेमणूक केलेली होती. त्याशिवाय अत्यंत महत्त्वाच्या अशा व्यवस्थापन क्षेत्रातील संस्थांमध्ये त्यांचा सल्लागार म्हणून सहभाग होता.
सी. नॉर्थकोट पार्किन्सन यांनी लिहिलेली पुस्तकं जगप्रसिद्ध असून ती प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत. सेंट पीटर स्कूल, यॉर्क व इम्यॅन्युअल कॉलेज, केंब्रिज इथून शिक्षण पूर्ण केल्यावर ते त्याच कॉलेजचे 'फेलो' झाले. तेव्हा त्यांचे वय अवघे २४ होते. इलिऑनिस, लिव्हरपूल, हॉर्वर्ड आणि मलाया या विश्वविद्यालयांमधून त्यांनी अध्यापन केलेलं असून त्यांची अनेक पुस्तके जगभर अक्षरश: लाखांमध्ये खपलेली आहेत.

अनुवाद : 


या मनोहारी पुस्तकात केलेलं मार्गदर्शन, सिध्दीप्रेरणा, सुसंवाद, सौजन्य आणि सहभाग या चतु:सूत्रीचं बारीकसारीक गोष्टीत कसं अवलंबन करावं याचे खर्‍याखुर्‍या उदाहरणांसकट केलेलं चित्रण सर्वांना अंतर्मुख करावयास लावतं. ‘मानवी संबंध व परिणामकारक व्यवस्थापन’ ह्या किचकट विषयाचं गुपित ह्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर खुमासदार चित्रांनी अन अत्यंत उपयुक्त सूचनांनी अगदी सहजपणे उकलले आहे,सोपं करून सांगितले आहे. व्यावसायिकांसाठी व सर्वसामान्य माणसांसाठीही अशा पुस्तकाची गरज आहे.


Translation of “Business is People” a bestseller. Guides an individual to better relations with associates.


 

120.00 Add to cart

पाठदुखी विसरा…

आहार व आरोग्य


डॉ. अगरवाल हे सुप्रसिद्ध डॉक्टर, लेखक आणि स्तंभलेखक असून त्यांची अनेक पुस्तकं लोकप्रिय आहेत. वर्तमानपत्रांतून त्यांचे अनेक लेख आणि स्तंभलेखन प्रसिद्ध झालं आहे. त्यांनी आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर आरोग्यविषयक कार्यक्रम अनेक वेळा सादर केले आहेत. डॉ. अगरवाल नवी दिल्ली येथील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये आणि व्ही.एम. मेडिकल कॉलेजमध्ये आरोग्यसेवेचे आणि ज्ञानदानाचे काम करतात. जागतिक आरोग्य संघटने(WHO)चे ते राष्ट्रीय सल्लागार होते. टोकियोतील नॅशनल कॅन्सर सेन्टर हॉस्पिटल आणि थायलंडमधील इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोशल रिसर्च, महिडॉल युनिव्हर्सिटीचे ते मानद सदस्य आहेत.

अनुवाद :
डॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.


आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्री-पुरुष, मुलं-मुली, तरुण-तरुणी आणि वयस्क-वृध्द कुणालाही पाठदुखीचा त्रास संभवतो. मात्र मध्यमवयातच पाठदुखीची सुरुवात होण्याचे प्रमाण जास्त आढळते. जीवनाच्या सर्वोत्तम अशा या टप्प्यावर तुम्हाला पाठदुखीने बेजार केलं तर तुमच्या अनेक उद्दिष्टांना खीळ बसू शकते, जीवनातील अनेक आनंदांना तुम्ही पारखे होऊ शकता.
‘पाठदुखी विसरा…’ हे पुस्तक वरील वास्तवाचे विस्मरण होऊ देत नाही. अनेक प्रकारे तुम्हाला ते साथ देतं. पाठदुखीसंबंधी संपूर्ण माहिती असलेल्या या पुस्तकामध्ये काय वाचाल?
0 पाठीची रचना कशी असते? तिचे कार्य कसे चालते?
0 पाठीचे दुखणे होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
0 वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी?
0 पाठीचे दुखणे असेल तर काय करावे? पर्यायी उपचार कोणते?
0 पाठदुखीवर उपाय म्हणून कोणते व्यायाम करावेत? पुन्हा कधीच
पाठदुखी होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
0 गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर पाठीची काळजी कशी घ्यावी?
0 बसण्याची किंवा उभे राहण्याची योग्य-अयोग्य पध्दत कोणती?
योग्य खुर्ची, गादी, पादत्राणे यांची निवड कशी करावी?
0 प्रवासात आणि काम करताना कोणती काळजी घ्यावी?
पाठदुखीचा त्रास टाळण्यासाठी, पाठदुखीपासून कायमची मुक्तता करण्यासाठी, तसेच तुमची पाठ लवचिक आणि निरोगी करण्यासाठी भारतातल्या दोन सुप्रसिध्द तज्ज्ञ डॉक्टरांनी हे पुस्तक लिहिले आहे.


125.00 Add to cart

अणुविश्वातील ध्रुव : डॉ. अनिल काकोडकर



अणुविश्वात डॉ. अनिल काकोडकर यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, ते त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे. `ध्रुव’सारखी अणुभट्टी कार्यान्वित करणं असो, किंवा पोखरण अणुचाचण्या असोत – डॉ. काकोडकरांनी अशा कितीतरी महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये बहुमूल्य कामगिरी बजावली. एवढंच नव्हे, तर भारत-अमेरिका यांच्यातल्या अणुकराराच्या मसुद्यात देशहिताच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

अणुऊर्जेबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन या विषयावरही त्यांनी सखोल चिंतन केलं. त्यातूनच भारताला तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात भरारी घ्यायची असेल, तर शिक्षण-व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे हे त्यांनी ओळखलं. त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून `सिलेज’, `शिक्षण पंढरी’ यांसारखे अनेक उपक्रम राबवले गेले. तसंच एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘व्हिजन २०२०’नंतर भारताच्या भविष्यकाळातल्या गरजा व विकास विशद करणारं `व्हिजन २०३५’ डॉक्यूमेंटही त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलं. सध्या त्यानुसार अनेक उपक्रम व प्रकल्प राबवले जात आहेत.
अणुविश्वाबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रांत `ध्रुव’पद प्राप्त करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व कार्याची ओळख करून देणारं हे चरित्र!


160.00 Add to cart

कोरडी शेतं… ओले डोळे

आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा… अंधारात असलेली एक सामाजिक समस्या


दीप्ती राऊत या पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. लोकांच्या प्रश्नांवर त्या वैशिष्ट्यपूर्ण वार्तांकन करतात. ‘ग्राउंड रिपोर्टस्’च्या माध्यमातून विविध समाजसमूहांचे अंधारातील जगणं प्रकाशात आणणं, शासकीय व्यवस्थेतील कच्चे दुवे मांडणं आणि सामाजिक बदलासाठी खारीचा वाटा उचलणं हे त्यांचे स्वप्न आहे. त्यांना दै. लोकसत्तामध्ये वार्ताहर म्हणून तसेच आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीत नाशिक ब्युरो चीफ, आणि दिव्य मराठी या दैनिकात विशेष प्रतिनिधी या माध्यमातूनवार्तांकनाचा अनुभव आहे. त्या ‘नॅशनल टेलिव्हिजन अ‍ॅवॉर्ड', ‘रामनाथ गोएंका अ‍ॅवॉर्ड', ‘मटा गौरव सन्मान', ‘वरुणराज भिडे उत्कृष्ट पत्रकार', इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित आहेत.

महाराष्ट्राला गेली २५ वर्षं शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रश्न भेडसावतो आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत रोजच्या बातम्यांपासून विधी मंडळाच्या अधिवेशनापर्यंत, रोजच्या राजकारणापासून ते निवडणुकांच्या राजकारणापर्यंत हा विषय धगधगता राहिला. पण आजही आत्महत्या होत आहेत… या गंभीर समस्येची ‘जाणारा जातो पण मागे जे राहतात त्यांचं काय?’ ही बाजूही तितकीच भीषण आहे.

अनुभवी आणि संवेदनशील पत्रकार दीप्ती राऊत यांनी याच प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. राज्यभर फिरून त्यांनी अशा अनेक महिलांशी संवाद करत प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांची वाताहत प्रत्यक्ष बघितली. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या अबला त्यांना भेटल्या आणि संकटाशी मुकाबला करत, त्यातून मार्ग काढत जाणाऱ्या अनेक योद्ध्याही त्यांना भेटल्या.

सामान्य जनता विचारही करू शकणार नाही अशी ही रोजची लढाई रोजच हरणाऱ्या शेकडो शेतकरी विधवांची होरपळ दाखवणारं आणि दु:खाला जिद्दीने सामोरं जाऊन लढणाऱ्यांची उदाहरणं जगासमोर आणणारं पुस्तक कोरडी शेतं…ओले डोळे !


160.00 Add to cart

मुलांना घडवताना

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समंजस मार्गदर्शन


डॉ. विजया फडणीस यांचा जन्म १३ ऑगस्ट १९५३, रोजी नागपूर येथे झाला असून त्यांनी नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून १९७५ साली एम. ए. (मानसशास्त्र) तसंच १९८३ साली प्रथम श्रेणी प्रथम क्रमाकांत पीएच.डी. केली आहे. त्यांनी नागपूर महाविद्यालय, नागपूर, व आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे काही काळ मानसशास्त्राचे अध्यापन केलं. त्यांचा यशवंत मनोविकास केंद्राच्या माध्यमातून समुपदेशक, मानसतज्ज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय आहे. त्यांनी विविध मराठी वृत्तपत्रांतून तसेच नियतकालिकं, दिवाळी अंकांमधून विपुल ललित तसंच मानसशास्त्रीय लेखन केलं आहे. त्यांचे गुजराथी साहित्य व संस्कृतीविषयक अनेक लेख व अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यांनी बुद्धिमापन, अभिक्षमता तसंच व्यक्तिमत्त्व चाचण्यांद्वारा मनोमापन, मुलांच्या अभ्यास, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व समस्यांवर समुपदेशन व करिअर मार्गदर्शन, अभ्यास कौशल्यं, विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन, स्वभावदोषांवर पुष्पौषधी उपचार, प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं आहे. तसंच त्या विविध मंचांवरून आणि आकाशवाणीवरून व्याख्यानं आणि मुलाखती देत असतात. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

मुलांना जन्म दिला म्हणजे तुम्ही
पालक झालात का? तर नाही. उलट त्या क्षणापासून पालकत्वाचा प्रवास सुरू होतो. आजच्या काळात ‘मुलांना वाढवणं’
हे आव्हानात्मक आणि अत्यंत कठीण असं एक प्रकारचं ‘काम’ आहे असा चिंतेचा सूर आजच्या तरुण पालकांमध्ये असलेला दिसतो. पण खरं तर, पालकत्वाशी निगडित काही मूलभूत गोष्टी समजून घेतल्या तर हा अनुभव खूपच आनंददायी ठरू शकतो.
पालक म्हणून मुलांना वाढवताना होणा‍र्‍या चुका ओळखून, त्या वेळीच कशा दुरुस्त कराव्यात याचं उत्कृष्ट मार्गदर्शन डॉ. विजया फडणीस या पुस्तकात करतात. याशिवाय काही कळीचे मुद्देही त्या विचारात घेतात :
* मुलांचं भावविश्व कसं जपावं?
* मुलांमध्ये आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा आणि आत्मप्रतिमा कशी निर्माण करावी?
* मुलांचा अभ्यास व वर्तनासंदर्भातील समस्या कशा हाताळाव्यात?
* ‘३ Idiots ’ अर्थात टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट या तीन ‘अविभाज्य घटकांशी’ कसा सामना करावा?

मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करत असताना आलेल्या अनुभवातून आणि अभ्यासातून डॉ. फडणीस यांनी केलेलं मार्गदर्शन सर्व सुज्ञ पालकांना आपल्या मुलांना घडवताना नक्कीच उपयोगी पडेल.


175.00 Add to cart

सुखाने जगण्यासाठी

सकारात्मक दृष्टी देणारं मौलिक मार्गदर्शन


डॉ. विजया फडणीस यांचा जन्म १३ ऑगस्ट १९५३, रोजी नागपूर येथे झाला असून त्यांनी नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून १९७५ साली एम. ए. (मानसशास्त्र) तसंच १९८३ साली प्रथम श्रेणी प्रथम क्रमाकांत पीएच.डी. केली आहे. त्यांनी नागपूर महाविद्यालय, नागपूर, व आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे काही काळ मानसशास्त्राचे अध्यापन केलं. त्यांचा यशवंत मनोविकास केंद्राच्या माध्यमातून समुपदेशक, मानसतज्ज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय आहे. त्यांनी विविध मराठी वृत्तपत्रांतून तसेच नियतकालिकं, दिवाळी अंकांमधून विपुल ललित तसंच मानसशास्त्रीय लेखन केलं आहे. त्यांचे गुजराथी साहित्य व संस्कृतीविषयक अनेक लेख व अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यांनी बुद्धिमापन, अभिक्षमता तसंच व्यक्तिमत्त्व चाचण्यांद्वारा मनोमापन, मुलांच्या अभ्यास, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व समस्यांवर समुपदेशन व करिअर मार्गदर्शन, अभ्यास कौशल्यं, विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन, स्वभावदोषांवर पुष्पौषधी उपचार, प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं आहे. तसंच त्या विविध मंचांवरून आणि आकाशवाणीवरून व्याख्यानं आणि मुलाखती देत असतात. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव, धावपळ आणि घाईगडबडही कधी नव्हे इतकी वाढली आहे. अशावेळी आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीचं नीट आकलन करून त्यातून मार्ग काढणारेच यशस्वी आणि पर्यायाने सुखी होतात. मात्र त्यासाठी आवश्यक असतं – निरोगी मन:स्वास्थ्य आणि मनोनियंत्रण !
हे जाणूनच विख्यात मानसतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. विजया फडणीस यांनी या लेखसंग्रहात आपलं मन निरोगी राखण्याचे मौलिक मंत्र उदाहरणांसह सांगितले आहेत. तसंच विचार आणि भावना यांवर नियंत्रण ठेवून आपली वर्तणूक कशी ठेवावी याबद्दल अत्यंत
मौलिक अशा सूचना केल्या आहेत, तर काही ठिकाणी त्यासाठी आवश्यक अशा युक्त्या-कॢप्त्याही सांगितल्या आहेत. त्यांनी या लेखांमधून मानसशास्त्रीय संकल्पना अत्यंत सोप्या शब्दांत समजावून सांगितल्यामुळे वाचकांना आगळी अंतर्दृष्टीही मिळते.
स्वभावातीत त्रासदायक गोष्टी टाळून स्वविकास साधण्यासाठी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी उपयुक्त असा लेखसंग्रह… सुखाने जगण्यासाठी !


175.00 Add to cart

माझं कुटुंब, माझी गुंतवणूक

स्वप्न साकार करण्यासाठी पैशाचं ‘स्मार्ट’ नियोजन


कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकौटंट' असणारे वीरेंद्र ताटके फायनान्स आणि गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कॉरिट क्षेत्रात वरिष्ठ पदावर तसंच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. गेली पंधरा वर्षं ते विविध वृत्तपत्रांसाठी अर्थ आणि गुंतवणुकीविषयी सातत्याने लेखन करत आहेत. त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून अर्थविषयक कार्यक्रमही सादर केले आहेत. त्याचप्रमाणे वित्त व्यवस्थापन, शेअरबाजार, म्युच्युअल फंड या विषयांवर पुस्तकंही लिहिली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध होत असतात. म्युच्युअल फंड या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली असून सध्या ते एका नामवंत एमबीए महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

आयुष्यात प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्नं असतात, इच्छा-आकांक्षा असतात. कोणाला घर विकत घ्यायचं असतं, कोणाला चारचाकी हवी असते; तर कोणाला उच्च शिक्षण घ्यायचं असतं. आणि ही स्वप्नं-आकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक नियोजन!

गुंतवणूक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रा. वीरेंद्र ताटके यांनी या पुस्तकाच्या सुरुवातीला आर्थिक नियोजनाचा मूलभूत मंत्र दिला आहे…

एकूण उत्पन्न – गुंतवणूक = खर्च

अशा प्रकारे ताटके माहिती देता देता आपल्याला आर्थिकदृष्ट्या ‘साक्षर’ करतात, आर्थिक नियोजनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन देतात.

बँकामधली विविध प्रकारांतली गुंतवणूक, पोस्टातली गुंतवणूक, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, रिअल इस्टेट, सोनं इ. गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांचे फायदे-तोटे उदाहरणांसह ताटके सांगतात. तसंच आयुष्यातले टप्पे कोणते आणि कुठली गुंतवणूक कधी करावी याविषयी मार्गदर्शन करतात.

मुलांचं शिक्षण, आजारपण, घराची खरेदी, स्वत:ची हौस-मौज यांसारख्या कुंटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन कष्टाने कमावलेला आपला पैसा गुंतवण्याचे फायदेशीर मार्ग हे पुस्तक दाखवतं. म्हणूनच हे आहे… माझं कुटुंब, माझी गुंतवणूक !


175.00 Add to cart

तुमच्या आमच्या लेकी

त्यांचं आरोग्य…त्यांच्या समस्या मनमोकळ्या संवादातून सहज-सोपं समुपदेशन


डॉ. लिली जोशी या एम.डी. मेडिसिन आहेत. ज्या काळात ‘लेडी फिजिशियन’ म्हणजे काय हे लोकांना माहीत नव्हतं तेव्हापासून म्हणजे १९७६पासून त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. त्यांचा स्वभाव शांत आणि व्यक्तिमत्त्व हसतमुख असून दुसऱ्याचं ऐकून घेण्याची त्यांची वृत्ती आहे. रुग्णांना बरं वाटावं अशी त्यांची आंतरिक तळमळ असल्याने आणि औषधोपचारांपेक्षा जीवनशैली सुधारण्यावर त्यांचा भर असल्याने यातूनच त्यांनी आरोग्यविषयक लेखनाची सुरुवात केली. त्यांनी रुग्णांसाठी मधुमेह, रक्तदाब, अॅगनिमिया, थायरॉइड विकार अशा अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. तसंच व्यायामाचं महत्त्व कृतीतून सांगणारा ‘वॉक विथ डॉक’ हा टेकडीवरचा उपक्रम आणि अशा अनेक अभिनव गोष्टींचं आयोजन केलं आहे. याचबरोबर संस्कृत हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. अगदी अलीकडे त्यांनी संस्कृत साहित्यात बी.ए., एम.ए. आणि पी.एच.डी. या पदव्या विशेष गुणवत्तेसह प्राप्त केल्या आहेत. ट्रेकिंग, जिमिंग, शास्त्रीय संगीत, वाचन, लेखन या गोष्टींची त्यांना मनापासून आवड आहे.

आरोग्य-समस्या घेऊन येणारा पेशंट अनेक वेळा मानसिक दडपणाखाली असतो.
त्याच्या आरोग्य-तक्रारींचं मूळ कारण ही दडपणं तर नसावीत?
अशी शक्यता लक्षात घेऊन डॉ. लिली जोशी आपल्या पेशंटशी संवाद साधता साधता त्याचा विश्वास संपादन करतात आणि पेशंट त्यांच्यापाशी मन मोकळं करतो.
आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक समस्या सांगतो…आणि `डॉक्टर’ लिली जोशी यांच्याकडे येणार्‍या तरुणींसाठी किंवा रजोनिवृत्तीला आलेल्या स्त्रियांसाठीही त्या `लिलीताई’ होऊन जातात ! आरोग्य समस्यांचं मूळ कोठे आहे, याचा या डॉक्टरताना नेमका ठावठिकाणा लागतो.
वैद्यकीय उपचारांबरोबर केलेलं नेमकं समुपदेशन
लागू पडतं आणि या स्त्रिया शरीराने व मनाने तंदुरुस्त होऊन आयुष्याला भिडायला, आनंदी जीवन जगायला मोकळ्या होतात…!
डॉ. लिली जोशी यांनी त्यांच्या खास शैलीत असे विविध अनुभव बोलक्या कहाण्यांच्या स्वरुपात या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. हे अनुभव वाचकांना एक प्रकारचं सामाजिक भान तर देतीलच पण त्याचबरोबर स्वत:च्या समस्यांची उत्तरंही देऊन जातील !
आजच्या जीवनात अनेक आघाड्यांवर सामना करणार्‍या, धडपडणार्‍या, अडखळणार्‍या तरुणींना, स्त्रियांना मार्गदर्शन करणार्‍या या…तुमच्या-आमच्या लेकी!


180.00 Add to cart

बातमीमागची बातमी

खळबळजनक बातम्या मिळवण्यामागचं रंजक नाट्य


‘महाराष्ट्र टाइम्स’ दैनिकाचे खास प्रतिनिधी म्हणून जयप्रकाश प्रधान २८ वर्षं कार्यरत होते. राजकीय, सामाजिक व गुन्हेगारीविषयक क्षेत्रांतील त्यांची अनेक बातमीपत्रं साऱ्या महाराष्ट्रात खळबळ निर्माण करणारी ठरली. त्यावर आधारित ‘बातमीमागची बातमी’ हे त्यांचं पुस्तक खूपच लोकप्रिय झालं आहे. ‘पर्यटन’ हा त्यांचा सर्वांत आवडीचा छंद. परदेशातील आगळ्यावेगळ्या स्थळांना, ग्रामीण भागांना भेटी देऊन, तेथील संस्कृती, चालीरीती, जुने अवशेष तसंच लोक, समाज, खाद्यपदार्थ यांची रोचक माहिती मिळवण्यात त्यांना व त्यांची पत्नी जयंती यांना विशेष रस असतो. पृथ्वीवरील सात खंडांवर प्रधान पती-पत्नीचे पाय लागले आहेत. अंटार्क्टिका खंडावर मनुष्यवस्ती नाही. राहिलेल्या सहा खंडांमधील एकूण देशांची संख्या २१०च्या घरात जाते. त्यांपैकी ७८ देश त्यांनी आतापर्यंत पाहिले आहेत. म्हणजे ३५ टक्क्यांपेक्षा थोड्या अधिक जगाची भटकंती त्या दोघांनी पूर्ण केली आहे. हा प्रवास म्हणजे केवळ त्या देशाला, प्रदेशाला भोज्जा किंवा ‘१२ दिवसांत १० देश’ या पद्धतीचा झाला नाही. बहुतेक प्रवास स्वत: आखून किंवा परदेशातील नामांकित आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल किंवा क्रुझ कंपन्यांबरोबर केल्याने, त्यांना वेगळ्याच जगाचं दर्शन घडलं. ‘अजून खूप जग बघायचं आहे, अनुभवायचं आहे,' या इच्छेमुळे दोघांच्याही पायाला लागलेली भिंगरी थांबलेली नाही.

हातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह’ बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह’ बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस’कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने…
थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते !
अशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह’ पुस्तक…‘बातमीमागची बातमी !’


200.00 Add to cart

चार आठवडयात वजन कमी करा!


सुलक्षणा महाजन यांचा जन्म १९५१ साली मुंबई येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण नाशिक येथील गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूलमध्ये झालं. त्यांनी १९७२ साली सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई, येथून बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमधील पदवी प्राप्त केली. शिवाय १९७४ साली आय.आय.टी. पवई येथून इंडस्ट्रियल डिझाइनमधे पदविका प्राप्त केली. महाराष्ट्र नगररचना खातं, ठाणे आणि भाभा अॅसटॉमिक रिसर्च सेंटर, मुंबई, या सरकारी आस्थापनांमध्ये त्यांनी अर्किटेक्ट म्हणून नोकरी केली. घेरझी इस्टर्न लिमिटेड, मुंबई आणि एपिकॉन्स कन्सल्टंट, ठाणे या खाजगी क्षेत्रांमधील कंपन्यांमध्ये वास्तुरचनांसाठी कन्सल्टंट म्हणूनही त्यांनी काम केलं. ‘नगर नियोजन’ या विषयावर मिशिगन विद्यापीठात, तर ‘हॅबिटाट’ या जागतिक संस्थेच्या ‘सस्टेनेबल सिटीज प्रकल्पा’तर्फे महाराष्ट्रातील आठ शहरांचा अभ्यास त्यांनी केला. ‘मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिट’मध्ये मुंबई संबंधीचे संशोधन त्या करत असून ‘विचार रचना संसद,’ प्रभादेवी, मुंबई, येथे पर्यावरण वास्तुरचना आणि नगर नियोजन या विषयाचं अध्ययन करत आहेत. या विषयांवर त्यांची पुस्तकं प्रकाशित असून त्या लोकसत्ता, सकाळ या दैनिकांतून सातत्याने लेखन करतात.

अनुवाद:
डॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.


तुम्ही आत्तापर्यंत बरेचवेळा डाएटिंग केलं असेल पण फक्त चार आठवड्यात तुमच्या शरीराला हवा तसा आकार देणं तुम्हाला जमलंय का? हे पुस्तक तुम्हाला ते निश्चितच जमवून देईल.
लेखिका डॉ.नमिता जैन या प्रसिद्ध‌ आहार व स्वास्थ्यतज्ज्ञ आहेत. त्यांच्या वीस वर्षांच्या अनुभवातून त्यांनी तुमच्या जीवनशैलीला अनुसरून आणि कोणताही चित्र-विचित्र शॉर्टकट न वापरता प्रत्यक्षात आणता येईल असा उत्कृष्ट डाएट प्लॅन तयार केला आहे.

या डाएट प्लॅनची वैशिष्ट्यं म्हणजे-
+ वैयक्तिक गरजेनुसार आहारात बदल.
+ या प्लॅनमध्ये कोणतेही न ऎकलेले पदार्थ नाहीत.
+ तुम्हाला कोणताही बेचव आणि अनाकर्षक आहार घ्यावा लागणार नाही.
+ हे पदार्थ तुमच्या नेहमीच्या भाज्या व मसाले वापरून करता येण्यासारखे आहेत.
+ या डाएट प्लॅनमधले पदार्थ कमी तेलाचे आणि कमी उष्मांक असलेले तरीही चविष्ट आहेत.

पुस्तकाची इतर वैशिष्ट्यं आहेत-
+ घरी करता येण्यासारखे व्यायाम
+ वजन कमी करण्याविषयीची माहिती
+ दैनंदिन जीवनातील अनुभवांची उदाहरणं

मग वाट कसली बघताय? आजच हा डाएट प्लॅन सुरू करा आणि चार आठवडयात शिडशिडीत फिगर बनवा!


200.00 Add to cart

सायड

 


रवींद्र पांढरे यांचा जन्म खानदेशातील पहूर ह्या गावी मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला. माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत असले, तरी गाव,  गावचे लोक, त्यांची बोली, गावाची शेती, शिवार यांच्याशी जन्मतःच जुळलेली नाळ कधी तुटली नाही. त्यामुळे गाव आणि गावाचं शिवार हे लेखनाचे केंद्र , गावाची बोली हे साहित्याचं लेणं. • प्रकाशित साहित्य : लव्हाळ्याचे तुरे ( कवितासंग्रह ) मातीतली माणसं ( कथासंग्रह ) अवघाचि संसार ( कादंबरी ) गाण्यात झुलै रान ( किशोर कविता ) कथोकळी ( ललित गद्य ) पोटमारा ( कादंबरी ) प्रकाशनाच्या वाटेवर :  पोरकी माणसं ( कथासंग्रह ) • पुरस्कार : → मातीतली माणसं ह्या कथासंग्रहास दोन पुरस्कार १ ) रोहमारे ट्रस्टचा उत्कृष्ट ग्रामीण साहित्यनिर्मिती पुरस्कार २ ) राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा ग.ल. ठोकळ कथा पुरस्कार • सन्मान : 'अवघाचि संसार' कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट 'घुसमट'
कथोकळी ' पहूर ( पेठ ) , ता . जामनेर , जि . जळगाव

 


प्रत्येक बहराच्या नशिबी पानगळही लिहिलेली असते…
दोन शेतकऱ्यांनी मिळून एकमेकांच्या मदतीने आपल्या शेतांची मशागत करून घेणं म्हणजे ‘सायड’.
शांती आणि यशवंतानं शेतीसाठी केलेली सायड फक्त शिवारापुरती मर्यादित न राहता त्या दोघांच्या मनापर्यंत पोहोचते. शेतीत एकमेकांना मदत करताना, आधार देताना आणि एकमेकांची सुख-दुःखं ऐकून घेताना हि सायड त्या दोघांना प्रेम व जिव्हाळ्याच्या धाग्यांमध्ये गुंफते. त्यातून दोघांचं फक्त शेत-शिवारच फुलून येत नाही तर, दोघांचं शुष्क, कोरडं आयुष्यही नव्याने रुजतं,आणि अंकुरतं आणि बहरून येतं. पण…
 प्रगल्भ आणि उत्स्फूर्त अशा सहजीवनाची अनेक पदरी, व्यामिश्र अनुभवांची -‘जामनेरी बोलीतली कादंबरी सायड !

200.00 Add to cart

कमाल धमाल गोष्टी


3 पुस्तकांचा ८ गोष्टींचा संच


गीतांजली भोसले यांचा जन्म सोलापूरचा , बालपण पुण्यातलं . त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस.डब्लू . आणि पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन या पदव्या संपादित केल्या आहेत . आय.टी. क्षेत्रात त्यांनी कॉन्टेन्ट रायटर आणि इंस्ट्रक्शनल डिजायनर म्हणून काही काळ नोकरी केली आणि तिथूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली . पुणे विद्यापीठात त्यांनी सहअध्यापक म्हणून काम केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या बेल्जियम येथे स्थायिक आहेत . वेगवेगळ्या भाषा शिकण्याची त्यांना विशेष आवड आहे . ' अँटवर्प युनिव्हर्सिटी'मध्ये त्या फ्रेंच भाषा शिकत आहेत . सध्या वाचन आणि भटकंती हे त्यांचे छंद आहेत . विविध देशात फिरून , तिथले अनुभव घेणे , त्या देशातील संस्कृती अभ्यासणे आणि त्यावर लिहिणे यामध्ये त्या विशेष रमतात . त्यांच्या भटकंतीमध्ये इतर देशातील लहान मुलांची पुस्तकं बघत असतांना आपल्या देशातील बालसाहित्यातही काही नवं देण्याच्या उद्देशाने त्यांनी लिखाणाला सुरुवात केली .

सध्याचा जमाना कितीही इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा असला तरी गोष्ट म्हटली की अजूनही तुमचे डोळे लुकलुकतात ना ? गोष्टींच्या अद्भुत जगात आजही तुम्ही मस्तपैकी रमता की नाही ? म्हणूनच तुमच्या इंटरेस्टचा विचार करून लेखिका गीतांजली भोसले सांगते आहे , खूप सारं मनोरंजन करणाऱ्या आणि थोडासा विचारही करायला लावणाऱ्या ८ कमाल धमाल गोष्टी … 

१. चमत्कारी केक 

२. जग्गू बग्गू

३. पिंकू आणि चिंकी

 


 

210.00 Add to cart

आहाराविषयी सारे काही

आपल्या आरोग्यानुसार आपल्या आहाराची काळजी घेणारे पुस्तक


मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्राच्या पदवीधर असलेल्या वसुमती धुरू यांचा ‘आहारशास्त्रा’चा विशेष अभ्यास आहे. या विषयात त्यांनी पदविकाही संपादन केली आहे. चायनीज कुकरी हा त्यांचा आवडता विषय. इतकेच नव्हे, तर चायनीज कुकरीचे वर्गही त्या चालवत. त्यामुळे त्यांच्या व्यासंगाला अनुभवाची जोड मिळाली. विविध विषयांवर त्यांनी आजवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. अभ्यासपूर्ण लेखन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य राहिले आहे.

आहारतज्ज्ञांनी किंवा डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्याची आपली कितीही इच्छा असली, तरी पोषणमूल्यांचे क्लिष्ट ‘गणित’ सोडवून एखादा पदार्थ करताना कॅलरीज, कोलेस्टेरॉल, प्रथिनं आदींचं संतुलन साधणं कठीण जातं. त्यात त्या पदार्थाची चव किंवा वैशिष्टय राखण्याची कसरत करणं म्हणजे महाकठीणच काम!
हे लक्षात घेऊनच ज्येष्ठ आहारतज्ज्ञ वसुमती धुरू यांनी या पुस्तकात पाककला व आहारशास्त्र यांचा सुयोग्य मेळ साधला आहे. सर्व प्रकारच्या विविध पाककृती पध्दतशीरपणे देऊन त्या खाली त्या पदार्थाच्या प्रत्येक वाटपातून प्रत्येकाला किती प्रमाणात प्रथिनं, खनिजं, जीवनसत्त्वं, तंतू, कॅलरीज इ. पोषणमूल्यं लाभतील याचा ‘रेडीमेड’ तक्ताच दिला आहे. तसेच हा पदार्थ कोणत्या आजारासाठी वा व्याधीसाठी पथ्यकारक ठरेल वा कुपथ्यकारक ठरेल, कुणी तो आवर्जून खावा, कुणी तो कमी प्रमाणात खावा, कुणी तो वर्ज्य करावा याचीही माहिती तिथल्यातिथेच दिली आहे. या पुस्तकाची हीच वैशिष्टये आहेत, म्हणूनच हे पुस्तक इतर पाककृती व आहारशास्त्रावरील पुस्तकांपेक्षा संपूर्णपणे आगळंवेगळं ठरावं.
थोडक्यात, गृहिणींना पाककलेसोबतच आहारशास्त्रावरही सहजपणे पकड घेण्यास समर्थ करणारं व भान देणारं पुस्तक आहाराविषयी सारे काही…


225.00 Add to cart

उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा

व्यवसाय करण्यासाठी पैसा नव्हे, वृत्ती हवी!


प्रथितयश उद्योजक आणि प्रेरणादायी बिझनेस लिडर म्हणून सुरेश हावरे परिचित आहेत. त्यांनी नागपूर विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.एससी.टेक. ही पदवी संपादित केली. भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमधून त्यांनी न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये पदव्यूत्तर शिक्षणही पूर्ण केलं. शिवाय त्यांनी इतिहास या विषयात एम.ए. केलं असून नुकतेच त्यांना ‘अ‍ॅफोर्डेबल नॅनो हाऊसिंग' या विषयासाठी मुंबई विद्यापीठाकडून पीएच.डी. (डॉक्टरेट) या पदवीने सन्मानित करण्यात आलं आहे. नागपूर विद्यापीठाचे ते मेरिट स्कॉलर व इंजिनिअरिंगमधील सुवर्णपदक विजेते आहेत. डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जीमध्ये त्यांनी २७ वर्षं वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ म्हणून सेवा केली आहे. न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये त्यांचे ३७ शोधनिबंध नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. व्हिएन्ना येथील IAEA या अणुशास्त्रातील सर्वोच्च संस्थेत भारतीय शास्त्रज्ञांच्या टीमचं त्यांनी नेतृत्व केलं आहे. याशिवाय गेली २५ वर्षं ते बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. सध्या ते सुप्रसिद्ध ‘हावरे ग्रुप ऑफ कंपनीज्’चे नेतृत्व करत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान असून त्यांना अनेक नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यवसायिक पुरस्कारही मिळालेले आहेत. जे.एन.पी.टी.चे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे आणि सध्या ते श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचे अध्यक्ष आहेत. नुकताच त्यांना ‘महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री’ दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे.

आपल्या समाजात उद्योजकांविषयी एक प्रकारचं कुतूहल आणि अनेक प्रकारचे समज-गैरसमज असतात. उद्योगाशी निगडित अशा अनेक समजुतींचा तसंच तरुणांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणार्‍या घटनांचा ऊहापोह या पुस्तकात लेखकाने अतिशय रंजकपणे केला आहे.
केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास यशस्वीपणे उद्योग करता येतो या जनमानसात सर्वसाधारणपणे असलेल्या समजुतीलाच हावरे यांनी छेद दिला आहे. भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो. मात्र व्यवसाय करण्यासाठी मुख्य भांडवल तुमच्यापाशी आवर्जून हवं असतं ते दुर्दम्य इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं व व्यावसायिक वृत्तीचं! हा मूलभूत मंत्र आत्मसात करण्यासाठी आणि पुढे प्रत्यक्षात व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी लागणार्‍या घटकांची चर्चा ते विस्तृतपणे पुस्तकातून करतात. उद्योगाची उभारणी कशी करावी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग, रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ कशी करावी असे महत्त्वाचे विषय त्यांनी यात हाताळले आहेत.

जो स्वत:च्या अनुभवातून शिकतो, तो हुशार माणूस समजला जातो पण जो इतरांच्या अनुभवातून शिकतो तो खरा चाणाक्ष माणूस. त्यामुळे नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणार्‍या तरुणांसाठी हे अनुभवाचे बोल अत्यंत उपयोगी पडतील.
‘उद्योजक हा राष्ट्राची संपत्ती निर्माण करणारा मुख्य घटक असतो’ असं मत हावरे आत्मविश्वासपूर्वक व्यक्त करतात. अनेक वर्षं यशस्वीपणे बांधकाम क्षेत्रातील उद्योगधुरा सांभाळणार्‍या हावरे यांचे अनुभवाचे बोल नवउद्योजकांसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरतील


225.00 Add to cart
1 2 4