293 | 978-93-82591-87-0 | Eureka Club | युरेका क्लब | संवादातून ओळख संशोधकांची आणि त्यांच्या संशोधनांची! | Gauri Gandhe | गौरी गंधे | गप्पांमधून, संवादामधून संशोधकांची, त्यांनी लावलेल्या शोधांची आणि त्यांच्या आयुष्यातील गमतीजमतींची माहिती ‘शेअर’ करण्याचा क्लब म्हणजे ‘युरेका क्लब’! या क्लबची भन्नाट आयडियाही शाल्मली, ईशा, अनिकेत, प्रणव आणि विराज अशा तुमच्यासारख्या मुलांचीच! या मुलांबरोबर या क्लबमध्ये आहे, एक ताई. तिने सायन्समधून एम.एस्सी. केलंय. मुलांच्या कलाने शिकवायची विलक्षण हातोटी तिच्याकडे आहे. मुलं तिच्याशी संशोधकांबद्दल बोलतात, प्रश्न विचारतात. कधी इंटरनेटचा वापर करून, तर कधी एनसायक्लोपीडिया वाचून शास्त्रज्ञांची माहिती गोळा करतात. इतकंच नाही, तर मोठ्या माणसांसारखी ‘प्रेझेंट’ही करतात! जिथे मुलं अडतात किंवा ताईला जास्तीची माहिती द्यावीशी वाटते तिथे ताई सहजसोप्या शब्दांत, न चिडता किंवा न ओरडता ती समजावून सांगते! आणि मग या संवादातून मिळत जाते युक्लिड, कोपर्निकस, आर्किर्मिडीज, न्यूटन, मेरी क्यूरी, आइनस्टाइन यांसारख्या २६ संशोधक आणि त्यांच्या शोधकार्याची माहिती! ताई व मुलांच्या या ‘इनोव्हेटिव्ह’ गप्पांमधून तुम्हालाही उलगडत जातील अनेक संशोधनांमधली मर्मं आणि मग तुमच्याही तोंडून नकळत उद्गार बाहेर पडतील– ”युरेका… युरेका… युरेका क्लब!” |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 131 | 21.6 | 14 | 0.7 | 160 |
Eureka Club’ is a club of students. In this club they discuss about the work of scientists, their life as well as their research. This dialogue unfolds 26 scientist’s life and their work in a very innovative and amusing way.
|
Science | 100 | UrekaClubcover_front | Eureka_cover_backBC.jpg |
करामत धाग्या-दोऱ्यांशी
वस्त्रांच्या रंगीबेरंगी दुनियेचा बहुपदरी मागोवा व त्यातील विज्ञान
[taxonomy_list name=”product_author” include=”391″]
वस्त्र ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक ! वस्त्रांचा वापर आपण शरीर-संरक्षणाबरोबरच आपलं व्यक्तिमत्त्व अधिक खुलवण्यासाठी, आणि इतरांवर प्रभाव पाडण्यासाठीही करतो. आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेली ही वस्त्रं नेमकी कशी बनतात, याचे ‘धागे-दोरे’ या पुस्तकात विख्यात पदार्थविज्ञानतज्ज्ञ डॉ. वर्षा जोशी यांनी रंजकपणे उलगडून दाखवले आहेत.
कोणत्या मोसमात कोणती वस्त्रं वापरायची, हे ते वस्त्र ज्या धाग्यांपासून तयार होतं त्यांच्या गुणधर्मावर अवलंबून असतं. हे गुणधर्म कोणते, त्या धाग्यांची रचना कशी असते, त्यापासून वस्त्रं कशी विणली जातात, ती कशी रंगवली जातात, त्यावर छपाई कशी केली जाते, कोणत्या प्रक्रिया होतात, आदी अनेक गोष्टींची रंजक माहिती या पुस्तकात सहजसोप्या भाषेत देण्यात आली आहे.
ई-टेक्स्टाइलसारख्या आधुनिक काळातल्या चलाखतंतूंचा म्हणजेच ‘स्मार्ट फायबर्स’ चाही अंतर्भाव यात करण्यात आला आहे. तसंच समृद्ध अशा भारतीय वस्त्रपरंपरेचा वेधक मागोवाही घेण्यात आला आहे. याशिवाय निरनिराळ्या वस्त्रांची निगा कशी राखावी, अशा उपयुक्त माहितीचाही पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
वस्त्रांचा इतिहास कथन करणारं, त्याविषयीचं कुतूहल शमवणारं आणि त्यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारं पुस्तक…
करामत धाग्या-दोर्यांची!
Reviews
There are no reviews yet.