विश्वामित्र सिण्ड्रोम
उदास पोकळी… की पोकळीतच उदासी राहते भरून?
समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी?
का वागतोय तो असा? ‘इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस’सारखा कधी झपाटला जातोय…
कधी ‘पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा’ गुढाकडे ओढला जातोय…
कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन
कवितांमधून व्यक्त होत जातोय…
आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे
कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग
दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.
या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.
मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ!
खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा
पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही!
कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनवासवरचे…
समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड
काळेकरडे स्ट्रोक्स !
सत्य घटनांवर आधारित थरारक तितक्याच खिळवून ठेवणाऱ्या कथा
३) द झीरो- कॉस्ट मिशन
लेखक अमर भूषण यांनी राज्य आणि केंद्रीय इंटेलिजन्स एजन्सींसाठी व खासकरून ‘रॉ’साठी काम केलं आहे. भारताच्या तांत्रिक इंटेलिजन्स सव्हिसचे प्रमुख म्हणून २००५मध्ये ते निवृत्त झाले.
टपाल खर्चासहित पूर्ण संच रु. ७००
गोष्टी सांगण्यापूर्वी…
‘….प्रत्येक गावात काही आख्यायिका आणि दंतकथा असतात . एक लेखक म्हणून या आख्यायिका मला भुरळ पाडतात . कोणताही लेखक त्याच्या कानावर पडलेल्या आख्यायिका निव्वळ कपोलकल्पित प्रदेशात राहू देत नाही . कधी चिमूटभर आशयाच्या सूतावरून कल्पनेचा स्वर्ग गाठत , तर कधी आशयाच्या स्वर्गात कल्पनेचं सूत कातत या आख्यायिकांना लेखक कागदावर उतरवत राहतो . कधी कल्पनेतल्या माणसांना तो खरेखुरे सदरे चढवतो . तर कधी खऱ्या मानवी स्वभावांना लेखक कल्पित नियती देतो . नाव , गाव , देश , वेष बदलत ही माणसं , या आख्यायिका मग सर्वदूर पसरत जातात आणि चिरायू होतात . ” गोठण्यातल्या गोष्टी’तली ही माणसं खरी असली नसली तरीही जन्मापासून ही माणसं माझ्यासोबत आहेत . या माणसांना आदि – अंत नाही.
म्हणूनच ही माणसं स्वयंभू आणि चिरायू आहेत …..’
साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त लेखकाची तिसरी कादंबरी…
चतुर
खरंतर गोष्ट आहे तशी साधी…
३ थ्रीलर्स…
रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन अॅक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’
एकूण आठ कथांचा हा वाचनीय असा कथासंग्रह. या कथा अतिशय तरल आणि जीवन जगायला शिकवणाऱ्या आहेत. आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, पात्र या कथांमध्ये भेटत राहतात. गुंगवून टाकणाऱ्या शैलीतून लेखिका शोभा भालेकर घराघरातल्या अनेक बोलक्या कहाण्या सांगतात. काही पात्रांमध्ये आपण आपल्यालाच शोधत राहतो तर काही प्रसंग जे आपल्याही आयुष्यात घडून गेलेले असतात त्यांचाही आपल्याला पुनःप्रत्यय येत राहतो, तसे प्रसंग नव्याने समोर आल्यामुळे आपण काहीसे चकितही होतो. आपण थोड्या सकारात्मकतेने, संवेदनशीलतेने जर आयुष्य बघू लागलो तर किती सुंदर, लोभसपणे जगता येऊ शकेल याची प्रचीती नकळतपणे कथांमधून येत जाते. प्रत्येक वाचकाला गुंतवून ठेवणारा विविधरंगी कथांचा संग्रह….
निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरू !
गहाण पडलेली इस्टेट सोडवून घेऊन यशवंतराव आणि त्यांचं कुटुंब दुमजली वाड्यात राहायला येतं … … आणि मग सुरू होतो … भयप्रद आणि गूढ गोष्टींचा अनाकलनीय खेळ ! गांगरून टाकणारा भासांचा लपंडाव !! यशवंतरावांचा परिवार , दोन भाडेकरू , गूढ व्यक्तिमत्त्वाचे डॉ . नागराणी , रहस्यमय पद्धतीने मृत्यू पावलेल्या त्यांच्या पत्नी उमाबाई , सतत भीतीच्या छायेत वावरणारा त्यांचा भाचा मुकुंद पित्रे , यांच्याभोवती फिरणारं कथानक एका मोठ्या रहस्यभेदापर्यंत येऊन पोचतं … कोणाचा भास होत राहतो ? कोण वावरतंय त्या वाड्यात ? एक थरारक भयकथा अंगारिका ! विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !
या अनेकपदरी कथेचं कथानक चिन्मय, त्याचे आई-वडील, मैत्रीण, सामाजिक कार्यकर्ते अशा व्यक्तीपासून लालबाबाचा दर्गा, त्याचा शेजारचा म्हसोबा, दखनी भाषा यांनी वेगवेगळ्या कोनांतून केलेल्या कथनांद्वारे उलगडत जातं. ट्विटरवरचं चिन्मयचं अकाऊंट, व्हॉट्सअॅप, ‘लोकमत’ इतकेच नव्हे, तर कारसेवेसाठी बाभूळगावातून गेलेली एक वीट हेदेखील आपापल्या कथनांमधून स्वतःचं अंतर्विश्व उघड करतात.
एक रहस्यकथा सांगता सांगता भोवतालच्या गुंतागुंतीच्या सामाजिक परिस्थितीची उकल करण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. ती वाचताना उत्तरोत्तर वाढत चाललेल्या धार्मिक कट्टरपणाच्या उन्मादी वातावरणात आपण कोणत्या मूल्यांचा वारसा हरवून बसतो आहोत, याचं भान वाचकाला येतं.. ‘हिंदू’, ‘मुस्लिम’ या कप्पेबंद अस्मितांच्या पलीकडे जाणाऱ्या सामायिक, सांस्कृतिक धाग्यांनी बनलेल्या ‘भारतीयत्वा’ चा शोध ही कादंबरी घेते. हिंदू-मुस्लिम सहजीवनाची कल्पना मूळच्या सोशिक, उदार, सहिष्णु अशा पारंपरिक लोकधर्माला अनुसरल्याने प्रत्यक्षात येईल की त्यासाठी आधुनिक मूल्यांचा अंगीकार करणं गरजेचं आहे, असा कळीचा प्रश्न लेखकाने या कादंबरीत उपस्थित केला आहे.
डॉ. नीतीन रिंढे
ॲस्ट्रोपायलट दिक्पाल आर्य .….. धाडसी, हरहुन्नरी, हजरजबाबी, प्रसंगावधानी अशा दिक्पालची मंगळावर जाण्यासाठी निवड झाली . पृथ्वीवरील मानवांचा प्रतिनिधी म्हणून मंगळावर जाण्याचा प्रथम मान मिळणं, ही भूषणावह गोष्ट होती . दिक्पाल मंगळावर उतरला …यानातून बाहेर पडून चालत जाताना त्याच्या सहकाऱ्यांना तो दिसलाही … पण तेवीस दिवसांनी परत येणं अपेक्षित असणारा दिक्पाल तब्बल २५ ९ दिवसांनी परतला. एवढे दिवस कुठे होता तो? विश्वातल्या अज्ञात, अकल्पित आणि अनपेक्षित घडामोडींची आणि मानवाच्या राक्षसी महत्वाकांक्षेची थरारक कथा.. स्वप्नमोहिनी!
विख्यात भयकथा, गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी
अवकाशातील युद्धात भाग घेण्याची ही विक्रमची पहिलीच वेळ होती. मनात उत्सुकता होती , कुतूहल होते , जराशी भीतीही होती घणाघाती शस्त्रांचा एकच आघात जहाजाच्या अक्षरशः चिंधड्या · कोणीही वाचायचं नाही – जिंकलात तरच जगणार-हरलात की तुमचे अणूरेणू दशदिशांना भिरकावले जाणार… पाहतापाहता टेहेळ्या जहाजांनी अलेगॉनभोवती आपली जाळी तयार केली होती . टेहेळ्या जहाजांच्या जाळीतून हलक्या क्रूझर्स खाली येऊन आपापल्या जागा घेऊ लागल्या . एकाएकी खालून शक्तीचे झगमगते , देदीप्यमान झोत त्यांच्यावर आदळले…. विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची खिळवून ठेवणारी कादंबरी…. बहुमनी !
सात वैशिष्ट्यपूर्ण कथांचा संग्रह…
मुंबईत २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमांचे घाव अजून भरलेले नाहीत.
दिल्लीत पोलीस सुपरींटेंडंट विक्रम सिंग भारतभेटीला आलेल्या पाकिस्तानी उच्चायुक्ताला रागाच्या भरात कानाखाली वाजवतो…त्याच्या या धारीष्ट्र्यामुळे त्याला निलंबित केलं जातं…त्याचवेळी भोपाळच्या तुरुंगातून पाच दहशतवादी फरार होतात…मुंबईत त्यांच्या शोधमोहिमेवर विक्रांत सिंगलाच अनौपचारिकपणे नेमलं जातं. शोधकार्याला प्रचंड वेगाने सुरुवात होते. आणि हे सारं घडत असताना दूर कुठे तरी भर समुद्रात लक्षद्वीपला जाणाऱ्या क्रूजचं सोमाली चाच्यांकडून अपहरण होतं…काही ‘खास’ मागण्यांसाठी!
या सगळ्या गोष्टींतून सुरु होते, ती वेगवान घटनांची मालिका… या मालिकेत दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि भोपाळपासून लक्षद्वीपपर्यंत अनेक घटनांचे दुवे जोडले गेलेले असतात. उच्चपदस्थ नेते, पोलीस व लष्करी अधिकारी आणि काही ‘विशेष’ माणसं या शोधचक्रात गुंततात. त्यांच्या जोडीने नकळतपणे वाचकही या थरारमोहिमेत गुंतत जातो.
अपहरणकर्त्यांच्या मागण्या असतात तरी काय? त्यांचं कारस्थान काय असतं? उद्धटपणाच्या वागणुकीनंतरही या मोहिमेत विक्रमला सहभागी का करून घेतलं जातं? शोधमोहीम थांबते तरी कुठे?
हुसैन झैदी यांच्या खास शैलीत रंगत जाणारा थरारक आणि गूढ शोधमोहिमेचा विलक्षण प्रवास इलेव्हन्थ अवर…
३ पुस्तकांचा संच
नारायण धारप यांची ‘समर्थ’ ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा…
अशोक समर्थ हे एक प्रकारचे ‘पॅरानॉर्मल’ डिटेक्टिव्ह…
सर्वसामान्यांना छळणाऱ्या दुष्ट व अघोरी शक्तींचा आपल्या अलौकिक बुद्धिचातुर्याने ते पाडाव करतात.
त्यांच्या डावपेचात ते भौमितिक आकृत्या, रिंगणं, धुपारे अशा सुरक्षासाधनांचाही वापर करतात…
विजयचे लक्ष वर गेले. त्याला अगदी डोक्यावर एक लाल व एक पिवळा असे चमचमणारे दोन बिंदू दिसले. ताऱ्यांना रंग नसतात व ग्रह चमचम करत नाहीत . हे चमचम करणारे दोन प्रकाशबिंदू हलत होते… खाली त्याच्याकडे येत होते. कोणीतरी खूप मोठ्या आवाजात रेडिओ लावला असावा , असा आवाज येत होता . त्याच्या अवतीभवती घुमणारा तो विलक्षण आवाज तसाच चालू राहिला.. आणि विजयच्या डोळ्यांसमोर हे असे विविध रंगछटांनी चमकणारे काहीतरी त्याच्यापासून पाच फूटावरच हिरवळीवर टेकले … आणि लगेच त्याच्या नावाने हाका ऐकू येऊ लागल्या… विजय… विजय ! विख्यात भयकथा, गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची कुमारवयीन वाचकांसाठी उत्कंठावर्धक कादंबरी…
गोग्रॅमचा चितार !