शिखररत्न कांचनजुंगा
साहसी गिरिप्रेमी’च्या विक्रमी मोहिमेची गोष्ट
उमेश झिरपे
भूषण हर्षे
शिखररत्न कांचनजंगा जगभरातल्या गिर्यारोहकांना खुणावणारं शिखर….
त्याचं दर्शन विलोभनीय खरं ,
पण ते सर करणं तितकंच खडतर ,
तितकंच आव्हानात्मक…
‘गिरिप्रेमी’च्या दहा गिर्यारोहकांनी हेच आव्हान स्वीकारलं आणि मोहीम फत्ते केली ती अनेक विक्रम नोंदवत!
त्यासाठी शारीरिक, मानसिक, आर्थिक तयारी करण्याबरोबरच विजीगीषु वृत्तीही ठेवायची होती.
ही गोष्ट साहसी वृत्तीची जशी,
तशीच ती अपार मानवतेचीही आहे आणि निसर्गसंवर्धनाच्या जागरुकतेबद्दलचीही आहे.
पुस्तकात या थरारक मोहिमेचं रोचक वर्णन केलं आहे ते,
निष्णात गिर्यारोहक भूषण हर्षे आणि मोहिमेचे नेते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी.
साहसी आणि विक्रमी मोहिमेची गोष्ट …. ‘शिखररत्न कांचनजुंगा!”