स्नेहलता दातार

स्नेहलता दातार यांचं मद्रास इथे गेले पंचवीस वर्षं वास्तव्य आहे. पाककलेत त्यांना विशेष रस असून त्याचं लेखन सोपं आणि मुद्देसूद असतं. ही दोन्ही वैशिष्ट्यं त्यांच्या 'दाक्षिणात्य पाककृती' या पुस्तकात दिसून येतात. रोहन प्रकाशन तर्फे प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ' पंचप्रांतीय पाककृती ' या पुस्तकाच्या अल्पावधित अनेक आवृत्या निघाल्या होत्या आणि ते गृहिणींमध्ये लोकप्रिय झालं होतं.

लेखकाची पुस्तकं

चिमणचारा पाककृती

बाळ-गोपाळांसाठी पचण्यास हलके व पौष्टिक पदार्थ


स्नेहलता दातार


आपली मुलं सुदृढ व सशक्त व्हावी यासाठी विचारपूर्वक तयार केलेले पुस्तक.
० मुलांना आवडतील असे काही नेहमीचे तर काही आकर्षक पदार्थ
० पचण्यास हलके, पौष्टिक पदार्थ
० लहानपणापासून घरचे जेवण प्रिय व्हावे यासाठी चवीची विशेष काळजी
० मैदा, वनस्पती व तत्सम जिनसांचा कमीतकमी वापर
० तान्ह्या बाळांपासून शाळेत जाणार्‍या बालकांसाठी उपयोगी
० पेय-सरबतं, गोड पदार्थ, न्याहरी, सूप्स, डाळी, भाज्या, आमटी, भात, पोळी, रोटी इ. आहारातील सर्व प्रकार
० मुलांच्या स्वास्थ्यासाठी आजीबाईंचे काही सल्ले, काही सूचना, काही औषधं


45.00 Add to cart

दाक्षिणात्य पाककृती


स्नेहलता दातार


पुस्तकाच्या लेखिका मद्रास येथे २५ वर्षांपासून राहत आहेत. त्यामुळे थेट दाक्षिणात्य ढंगातील पारंपरिक आणि लोकप्रिय रेसिपीज त्यांनी पुस्तकात दिल्या आहेत. भाताचे विविध प्रकार, सांबर-कोळंबू-रसम, सूप, पराठे-भाकरी, भाज्या, चटण्या आणि लोणची, न्याहारीचे पदार्थ व गोड पदार्थ सोप्या भाषेत व प्रमाणासहित दिले आहेत.



40.00 Read more

पंचप्रांतीय पाककृती

स्नेहलता दातार


आपण जरी महाराष्ट्रात राहत असलो तरी आपल्या जेवणात बंगाली, पंजाबी, गुजराथी, दाक्षिणात्य आणि राजस्थानी डिशेस सर्रास बनवल्या जातात. छेना बर्फी असो वा छोले-भटुरे किंवा कढी, चिंचेचा भात, गट्टे का साग आवडीने खाल्ले जातात. या पाच प्रांतातल्या अशाच काही स्वादिष्ट रेसिपीज या पुस्तकात वाचायला मिळतील त्याचबरोबर तोंड गोड करण्यासाठी काही परदेशी पुडिंग व सॅलड्च्या रेसिपीजही लेखिकेने दिल्या आहेत.


60.00 Add to cart

पुरुषांसाठी सोपे पाकतंत्र


स्नेहलता दातार


पुरुष असो वा कोणी शिकाऊ स्त्री… स्वयंपाकाची जुजबी माहिती नसल्यामुळे साधे पदार्थ करण्यास ते कचरत राहतात. या गरजा लक्षात घेऊन किमान स्वयंपाकतंत्र सहज अवगत व्हावे या दृष्टीने या पुस्तकाची वेगळी रचना केली आहे.


75.00 Add to cart