खाद्यसंस्कृतीची संशोधिका : शिल्पा परांडेकर (मंझिल से बेहतर… हैं रास्ते!)

शिल्पाची आणि माझी भेट झाली ती एका हेरीटेज टूर मध्ये! "तू काय करतेस?" या माझ्या प्रश्नावर ती म्हणाली होती, "मी खूप भटकते, लोकांशी बोलते, पारंपरिक खाद्य पदार्थांची माहिती गोळा करते. कॉलम्स लिहिते, फिटनेस फूडचं माझं स्टार्टअप आहे." एअरपोर्टवर बसून तिने खरंच एक कॉलम लिहून पाठवला. हिचं काम समजून घ्यायलाच हवं, असं तेव्हाच वाटलं. नंतर कंबोडियातली [...]