‘झुरांगलिंग’ कादंबरीतील निवडक भाग

मोबाइल इंटरनेटमुळे गूगल सर्च असं म्हणताच वाट्टेल ती माहिती तुमच्या डोळ्यापुढे चमकत राहते. झुरांगनं इंटरनेटवरनं लदाखची माहिती मिळवायला सुरुवात केली. ती बरीचशी ‘तिथं कसं जा? काय पाहा? काय त्रास होतो? काय काळजी घ्या?’ अशी पर्यटनयुक्त होती. ‘कसं जा?’ यामध्ये त्याला इंट्रेस्ट होता. तो उत्साहाने ती माहिती वाचायला लागला. जायचे पर्याय असे होते, संपूर्ण आरामदायक पण [...]

प्रेमाच्या… ओढीच्या आठ कथांचा नवरत्न खजिना

मुखपृष्ठावरच शीर्षकाच्या तळाला खास लिहिलेलं आहे – ‘कथा प्रेमाच्या... कथा ओढीच्या...’ निसर्गचक्र पार उलटंपालटं करत जगभराचा माणूस भन्नाट वेगानं धावत होता. पळत होता. या धावपळीत सुसज्ज यंत्रणा हाताशी होती. वेळेशी स्पर्धा होती. त्यानेच निर्माण केलेल्या समाजस्थिरतेसाठीच्या सर्वच्या सर्व व्यवस्था डगमगू लागल्या होत्या. म्हणजे कुटुंबव्यवस्था, शिक्षणयंत्रणा, दहा ते सहा अशी नोकरीतील बांधिलकी, लग्नसंकल्पना, स्त्रीपुरुष मैत्रीची चौकट [...]

होऊ दे उत्साह पुनर्जीवित… माध्यम : प्रेम

‘प्रेम’ आणि ‘ताटातूट’ हे दोन शब्द अगदी सयामी जुळ्यासारखे वर्षानुवर्षं एकमेकांना धरून चालत आले आहेत. प्रेम आलं तिकडे ताटातूट आलीच. पण गम्मत म्हणजे, या दोन शब्दांना एकत्र नांदण्याची संधी मिळते केव्हा, तर जेव्हा दोन प्रेमी जीव एकमेकांपासून दुरावतात तेव्हा. तसंच काही या चालू करोनाकाळात झालं आहे. लॉकडाउनमुळे ‘जिथे आहे तिथे’ राहायचा आदेश आल्यामुळे काहींची कोणासोबत [...]

ढाई अक्षर प्रेम के…

‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ कथासंग्रहातल्या संपादकाच्या मनोगतातील निवडक भाग गेल्या अनेक वर्षांमध्ये जगभरात छोटी-मोठी युद्धं, अतिरेकी हल्ले, खून-मारामाऱ्या, आर्थिक मंद्या, चित्र-विचित्र प्रकारचे अनेक आजार, कुपोषण, भूकंप, महापूर…. अशा, रोजचं आयुष्य हादरवून टाकणाऱ्या अनेक घटना घडतच होत्या…तरी त्यातून मार्ग काढत आपण उद्याचा दिवस उगवण्याची वाट पाहत होतो आणि पुढे जात होतो. पण या वर्षाच्या [...]

‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ संग्रहातील कथेचा निवडक अंश

नाउ यू सी मी… मी जागा होतो, तेव्हा साडेसहाचा गजर व्हायला तीन मिनिटं बाकी असतात. सवयीनेच मी घड्याळाकडे पाहतो, पण त्यात काय वेळ आहे हे मला माहीत असतं. नेहमीच मी असा गजर होण्याआधी तीन मिनिटं उठतो. मग नुसतंच बिछान्यात पडून राहतो, आजूबाजूचा कानोसा घेत. प्रत्यक्ष उठण्याचा क्षण लांबवत. मी जागा झालोय हे लक्षात येताच रुडीची [...]

करोनाकाळाला फिक्शनचा तडका

मार्च महिन्यात करोनाचं संकट भारतात आलं. संपूर्ण जगाचंच रूप पालटून टाकणारी अशी संकटं क्वचितच येतात. अकल्पनीय परिस्थिती निर्माण झाली आणि जगभरात एकच घुसळण झाली. लेखक हाही जगाचाच भाग असतो. त्यामुळे या अकल्पित परिस्थितीचा त्याच्यावरही परिणाम होतो आणि त्यातून विलक्षण असं साहित्य निर्माण होऊ शकतं. विशेषत: करोनासारखा आजार- ज्याने माणसा-माणसांमधले नातेसंबंधच बदलून टाकले.. त्यांच्या जगण्याची समीकरणंच [...]