संपादकीय (दिवाळी अंक)

मराठीमध्ये विपुल ललित लेख लिहिले गेले आहेत आणि या लवचिक साहित्य प्रकाराने मराठी साहित्य समृद्ध केलेलं आहे. या अंकातले हे ललित लेख वाचून तुम्हाला नक्कीच त्याची प्रचिती येईल.

अनुक्रम

या अंकात काय वाचाल?
अंकात आहेत दोन विभाग –
‘माझे कॉलेजचे दिवस’ आणि ललित लेख विभाग…

सफर खुबसुरत है मंजिल से भी! (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा कॉलेजचे दिवस जसे स्वप्निल, रोमँटिक व संवेदनक्षम असतात, तसे ते आपल्या जडणघडणीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असतात. पुढील आयुष्यात आपण जे कोण होणार असतो, त्याची बीजं या काळात पडण्याची शक्यता असते. या काळाला, या काळातल्या आठवणींना, स्मृतींना व व्यक्तींना उजाळा मिळावा, यासाठी या अंकातला खास विभाग - माझे कॉलेजचे दिवस! दहावीची परीक्षा झाली आणि [...]

मी प्राध्यापिका… (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा खरं तर मी एक गायिका...! अगदी आतून बाहेरून परफॉरमिंग आर्टिस्टच...! मनापासून ‘स्टेज’ आवडणारी, स्टेजवरच्या प्रत्येक क्षणाचा थरार उत्कटपणे अनुभवणारी, समोरच्या श्रोत्यांशी डोळ्यांतून संवाद साधत, त्यांनी दिलेली दाद, त्यातून मिळणारी ऊर्जा पुन्हा गाण्यातूनच त्यांच्यापर्यंत पोचवण्याच्या अनोख्या कलाव्यवहाराच्या, वयाच्या मी सोळाव्या वर्षापासूनच प्रेमात असलेली...! पण या भूमिकेला दोन वेगळ्या भूमिकाही येऊन मिळाल्या, ‘संशोधक’ मी; [...]

लिहिण्याचे प्रयोग (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा माझे लिहिण्याचे प्रयोग माझ्या जगण्याच्या प्रयोगांशी आजवर बरेचसे समांतर राहिलेले आहेत. किंवा जगण्याच्या अनेक प्रयोगांमधला एक मह्त्त्वाचा प्रयोग लिहिणं असंही असू शकतं. आपण आजवर जे काही केलं, अनुभवलं, शिकलो, प्रवास केले ते लिहिण्याकरताच होते का, असा प्रश्न मला अनेकदा पडतो आणि प्रत्येकच लिहिणाऱ्याला पडत असावा. या ना त्या प्रकारे आपलं जगणं लिहिण्यात [...]