

शब्द जिवलग
₹295.00
लेखक : प्रवीण दवणे
आपल्या वाङ्मयीन कार्याने अनेक पिढ्या समृद्ध करणाऱ्या लेखकांशी, कवीशी प्रवीण दवणे यांचा स्नेह जडला. कधी पत्रांतून तर, कधी खासगी अनौपचारिक भेटीतून हे वाङ्मयीन मैत्र दृढ होत गेलं. त्या सर्वांच्या स्वभावाचं, मिस्किल टिप्पणीचं, उत्स्फूर्त उद्गारांचं व अथक ध्यासाचं मनोज्ञ दर्शन दवणे यांना घडलं. अन्यथा निसटूनच गेले असते, अशा या अनमोल क्षणांना ‘शब्द जिवलग’ पुस्तकाचं कोंदण आता लाभलं आहे.
कुसुमाग्रज, पु.ल., गाडगीळ, करंदीकर, पाडगांवकर, व.पु., शांताबाई, बाबासाहेब पुरंदरे,सुरेश भट, द.मा. मिरासदार अशा अनेक प्रतिभावंतांनी आपल्या सहवासातून लेखकाला निर्मळ आनंद दिला. त्या आनंदाचंच हे शब्दरूप अर्थात ‘शब्द जिवलग’!
Reviews
There are no reviews yet.