साडेतीन खून
Sale₹375.00 ₹430.00
इन्स्पेक्टर सारळकर केस फाइल्स
लेखक : सलील देसाई
अनुवाद : शुचिता नांदापूरकर-फडके
एक बाई पलंगावर मरून पडलेली… आणि त्याच खोलीत एक पुरुष सीलिंग फॅनला लटकलेला. टेबलावर सुसाइड नोट… कर्जात बुडालेल्या एका पुरुषाने प्रतारणा करणाऱ्या बायकोला मारून टाकत स्वतःलाही संपवलेलं आहे, असं हे प्रकरण वरवर जरी दिसत असलं, तरी तपासातून समोर येणारे धागेदोरे वेगळ्याच बाबींकडे दिशादर्शन करतात.
मग सीनिअर इन्स्पेक्टर सारळकर आणि पीएसआय मोटकर या धाग्यांचा कसून माग काढतात. त्यातून उघड होतात निराळ्याच गुंतागुंतीच्या गोष्टी… बंगळुरूतली सात वर्ष जुनी खुनाची केस, लुबाडणुकीचे जमिनीचे व्यवहार, फसवणुकीची कृत्यं, कडवट शत्रुत्व, मृत बाईचं पूर्वजन्म जाणून घेण्याचं वेड आणि रामदेव नामक गूढ बाबाचं गौडबंगाल…
अचानक खुनी समोर येतो… आणखी एक जीव घेण्यासाठी… सारळकर आणि मोटकर यांना चौथा खून करण्याआधी त्याला पकडता येईल का?
अनपेक्षित वळणं घेणारी, मानवी मनाचे अंधारे कोपरे उजागर करणारी… खिळवून ठेवणारी मर्डर मिस्टरी… साडेतीन खून !
















Reviews
There are no reviews yet.