399.00

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

व्यक्ती, कार्य आणि कर्तृत्व

त्र्यंबक कृष्णराव टोपे यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९१४ साली झाला. त्यांनी आठ वर्षं (१९३९ ते १९४७) माटुंग्याच्या रूईया कॉलेजमध्ये संस्कृतचे अध्यापन व अकरा वर्षं (१९४७ ते १९५८) गव्हर्न्मेंट लॉ कॉलेजमध्ये कायद्याचं अध्यापन केलं आणि १९५८ ते १९७५ या कालावधीत लॉ कॉलेजचे प्राचार्यपद भूषवलं होतं. त्यांनी भूषवलेली इतर पदं आणि त्यांचा कार्यकाळ पुढीलप्रमाणे - (१) भारताच्या विधी आयोगाचे सदस्य (१९६२ ते १९६८), (२) मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१९७१ ते १९७७), (३) महाराष्ट्र विधी आयोगाचे सदस्य (१९७७ ते १९८०), (४) साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य (१९८० ते १९८५), (५) मुंबईचे शेरीफ (नगरपाल) (१९८६) २० फेब्रुवारी १९९४ रोजी त्यांचं निधन झालं.

भारतात होऊन गेलेल्या अनेक सुधारकांमधलं अग्रगण्य नाव म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे! रानडे यांचं कार्य आर्थिक, राजकीय, धार्मिक व सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांत असल्यामुळे ते महत्त्वाचं ठरतं. सर्वांगीण व सर्वंकष समाजसुधारणेचं स्वप्न रानडे यांनी एकोणिसाव्या शतकातच पाहिलं होतं.
न्या. रानडे हे प्राचार्य डॉ. त्र्यं. कृ. टोपे यांचे दैवत होते. या पुस्तकात टोपे यांनी रानडेंचं बालपण, शिक्षण, कौटुंबिक जीवन व कार्य-कर्तृत्व एवढाच जमा-खर्च न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत अतिशय समग्रपणे त्यांचं व्यक्तिमत्त्व रेखाटलं आहे. रानडे यांच्यावरील वैचारिक प्रभाव, त्यांची स्वभाववैशिष्टयं, त्यांनी केलेल्या समाजसुधारणा, त्यावेळचं समाजजीवन, कोणत्याही कार्यामागची त्यांची मनोभूमिका, न्यायाधीश म्हणून त्यांची कारकीर्द आणि त्यांच्यावर झालेली समकालीनांची टीका असं व्यापक चित्रण टोपे यांनी या पुस्तकात अभ्यासपूर्णरीत्या केलं आहे.
न्या. रानडे यांच्यासारख्या समाजसुधारकांचं कार्य-कर्तृत्व व आदर्श तरुणांसमोर येणं आजच्या काळाची गरज आहे. त्या दृष्टीने डॉ. टोपे यांनी लिहिलेलं हे चरित्र मोलाची कामगिरी बजावतं.

Reading Time: 2 Minutes (169 words)

470 978-93-82591-36-8 Nyaymurti Mahadev Govind Ranade न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे इस्लाम,व्यक्ती, कार्य आणि कर्तृत्व Dr. T. K. Tope डॉ. त्र्यं. कृ. टोपे भारतात होऊन गेलेल्या अनेक सुधारकांमधलं अग्रगण्य नाव म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे! रानडे यांचं कार्य आर्थिक, राजकीय, धार्मिक व सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांत असल्यामुळे ते महत्त्वाचं ठरतं. सर्वांगीण व सर्वंकष समाजसुधारणेचं स्वप्न रानडे यांनी एकोणिसाव्या शतकातच पाहिलं होतं.
न्या. रानडे हे प्राचार्य डॉ. त्र्यं. कृ. टोपे यांचे दैवत होते. या पुस्तकात टोपे यांनी रानडेंचं बालपण, शिक्षण, कौटुंबिक जीवन व कार्य-कर्तृत्व एवढाच जमा-खर्च न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत अतिशय समग्रपणे त्यांचं व्यक्तिमत्त्व रेखाटलं आहे. रानडे यांच्यावरील वैचारिक प्रभाव, त्यांची स्वभाववैशिष्टयं, त्यांनी केलेल्या समाजसुधारणा, त्यावेळचं समाजजीवन, कोणत्याही कार्यामागची त्यांची मनोभूमिका, न्यायाधीश म्हणून त्यांची कारकीर्द आणि त्यांच्यावर झालेली समकालीनांची टीका असं व्यापक चित्रण टोपे यांनी या पुस्तकात अभ्यासपूर्णरीत्या केलं आहे.
न्या. रानडे यांच्यासारख्या समाजसुधारकांचं कार्य-कर्तृत्व व आदर्श तरुणांसमोर येणं आजच्या काळाची गरज आहे. त्या दृष्टीने डॉ. टोपे यांनी लिहिलेलं हे चरित्र मोलाची कामगिरी बजावतं.
कार्ड बाईंडिंग Book Rohan Prakashan Marathi 424 520 399 Ranade_RGB.jpg Ranade_BackBC.jpg
Weight 520 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.