Reading Time: 2 Minutes (211 words)
978-93-92374-05-0 | Narsinhavalokan | नरसिंहावलोकन | भारताच्या अर्थव्यवसथेचा कायापालट करणाऱ्या पी.व्ही. नरसिंह राव याचं राजकीय चरित्र | Vinay Sitapati | विनय सीतापती | प्रणव सखदेव | अवधूत डोंगरे | पी.व्ही . नरसिंह राव अनपेक्षितरीत्या १ ९९ १ साली भारताचे पंतप्रधान झाले , तेव्हा त्यांच्याकडे आर्थिक संकटात पडलेल्या व हिंसक आंदोलनांनी ग्रस्त झालेल्या देशाची सूत्रं आली . त्यांचा पक्षही तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हता . संसदेत त्यांचा पक्ष अल्पमतात होता , शिवाय त्यांना ‘१० , जनपथ ‘ च्या सावलीत सत्ता चालवावी लागत होती . आणि तरीही राव यांनी भारताला देशात व परदेशात नवी ओळख मिळवून दिली . जगातील मोजक्याच नेत्यांनी इतकी कमी सत्ता असताना इतका मोठा बदल घडवून आणलेला दिसतो . राव यांच्या यापूर्वी कधीच प्रकाशात न आलेल्या खाजगी कागदपत्रांचा अभ्यास करून आणि शंभरहून अधिक मुलाखती घेऊन विनय सीतापती यांनी हे चरित्र लिहिलं आहे . भारतीय अर्थव्यवस्था , आण्विक कार्यक्रम , परराष्ट्र धोरण व बाबरी मशीद अशा विविध मुद्द्यांवर या चरित्रातून नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे . तेलंगणातील एका गावातून केंद्रीय सत्तेपर्यंतचा आणि तिथून पुन्हा अपमानित निवृत्तीपर्यंतचा राव यांचा जीवनप्रवास रेखाटताना , या पुस्तकात त्यांच्या आंतरिक खळबळीचीही दखल घेण्यात आली आहे . त्यांचं तणावदायक बालपण , त्यांचे भ्रष्ट व्यवहार व प्रेमसंबंध , त्यांचा सततचा एकाकीपणा यांचीही नोंद हे घेतं . पुस्तक एका प्रतिभाशाली राजनीतीज्ञाची अकथित कहाणी … नरसिंहावलोकन ! | Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | २९६ | चरित्रात्मक | ३७५ |
Reviews
There are no reviews yet.