नांगी

195.00

 

लेखक : संतोष वरधावे


हे मानवी कारस्थान आहे का नियतीचं षडयंत्र?

तो अस्वस्थपणे टेबलापलीकडच्या खुर्चीत बसला. खुर्चीच्या उजव्या बाजूला असलेल्या पायपोसावर त्याची नजर खिळली. पायपोसाखाली सरकवता येणारी फरशी आहे. त्या फरशीखाली पुरलेल्या मडक्यात विचू आहेत, हे सावबाला ठाऊक होतं.

उजव्या बाजूला झुकत त्याने पायपोस बाजूला हटवला. फरशी सरकवली. फरशीखालच्या अंधाऱ्या मडक्यात पाहत तो क्षणभर थबकला. दुसऱ्या क्षणी त्याने उजव्या हाताचा पंजा मडक्यात घातला…

…..असंख्य सुया आपल्या हातात टोचल्या जात असल्याचा भास त्याला झाला. क्षणार्धात त्याने हात मागे खेचला. त्वचेखाली नांगीचा काटा अडकलेले अनेक विचू, त्याच्या पंज्याला लगडून मडक्याबाहेर आले. त्याने त्वेषाने हात झटकला… एकदा-दोनदा-तीनदा-अनेकदा… काही विचू पुन्हा मडक्यात पडले. काही टेबल-खुर्चीच्या आसपास झटकले गेले.

त्या तिरीमिरीतच तो बारच्या किचनमध्ये घुसला. किचनच्या ओट्यावर असलेला फुटभर लांबीचा धारदार चॉपर त्याने उचलला. बाजूलाच पडलेला नॅपकिन उचलून त्याने चॉपरभोवती गुंडाळला…

माणसात दडलेल्या विंचवाच्या दाहक कथा…

। अंगरखा । बुजगावणं । नांगी । पाणी ।

Add to wishlist
Share
Share

    Reviews

    There are no reviews yet.

    Only logged in customers who have purchased this product may leave a review.