125.00

अर्धशिशी अर्थात् मायग्रेन आणि डोकेदुखी

Out of stock

लक्षणं, कारणं, उपचार, प्रतिबंधक उपाय


डॉ. जोसेफ कॅन्डेल, हे एम.डी. असून ‘नेपल्समधील न्युरॉलॉजी सेंटर’चे ते संस्थापक आणि अध्यक्ष व ‘गल्फकोस्ट स्पाईन इंन्स्टिट्यूट’चे सहसंस्थापक आहेत. जीवशास्त्र आणि मानसशास्त्रामध्ये त्यांनी पदविका घेतली असून डेटन, ओहायो येथील ‘राइट स्टेट युनि युनिव्हर्सिटी’ची वैद्यकीय शास्त्राची पदवी घेतली आहे, तसंच ‘कॅलिफोर्निया इर्विन मेडिकल सेंटर’मधून त्यांनी रेसिडेन्सी पूर्ण केली आहे. डॉ. कॅन्डेल हे एक लोकप्रिय वक्ते असून ‘न्युरॉलॉजी’, ‘व्हायटल सायन्स’ आणि ‘अमेरिकन झुऑलॉजिस्ट’ या प्रसिद्ध मासिकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत.
डॉ. डेव्हिड सुडेर्थ, एम.डी., हे नेपल्स येथील न्युरॉलॉजी सेंटरचे वरिष्ठ सहकारी असून नेपल्स, फ्लोरिडा येथील ‘गल्फकोस्ट स्पाइन इन्स्टिट्यूट’चे सहसंस्थापक आहेत. कोपनहेगन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली असून विस्कोसिन आणि इमोरी युनिव्हर्सिटीमधून रेसिडेन्सी पूर्ण केली आहे. ते प्राध्यापक आणि वक्ते असून वैद्यकीय विषयावर भाषणं देतात. ‘स्पायनल टिप्स’ या व्हिडिओ कार्यक्रमाचे ते निर्माते आहेत आणि ‘न्युरॉलॉजी’ आणि इतर मासिकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.

अनुवाद:
डॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.


या पुस्तकात मायग्रेन अर्थात् अर्धशिशीची मूळ कारणे कोणती, डोकेदुखीचे आणि मायग्रेनचे निरनिराळे प्रकार कोणते आणि डोकेदुखीची सुरुवात कशी होते हे सर्व सविस्तर सांगितले आहे. ठळक वैशिष्टये…

+ पूर्वलक्षणं  + प्रभावशाली उपचार  + होमिओपॅथीपासून आधुनिक उपचारपध्दतीपर्यंत विविध थेरपीजची माहिती  + योग्य जीवनशैली आणि योग्य आहार यामुळे होणारे लाभ  + डोकेदुखी आणि मायग्रेन टाळण्यासाठी प्रतिबंधक असे साधे, सोपे व्यायाम

या पुस्तकामध्ये सांगितलेल्या सूचनांमुळे मायग्रेनच्या रुग्णांची डोकेदुखीची वारंवारता, तीव्रता आणि कालमर्यादा कमी होईल. इतकंच नव्हे तर डोकेदुखी पूर्णपणे बरीही होईल!


Reading Time: 1 Minutes (122 words)

473 978-93-80361-54-3 Migraine Ani Dokedukhi अर्धशिशी अर्थात् मायग्रेन आणि डोकेदुखी लक्षणं, कारणं, उपचार, प्रतिबंधक उपाय Dr. joseph Candel Dr. David Suderth डॉ. जोसेफ कॅन्डेल डॉ. डेव्हिड सुडेर्थ Dr. Aroon Mande डॉ. अरूण मांडे या पुस्तकात मायग्रेन अर्थात् अर्धशिशीची मूळ कारणे कोणती, डोकेदुखीचे आणि मायग्रेनचे निरनिराळे प्रकार कोणते आणि डोकेदुखीची सुरुवात कशी होते हे सर्व सविस्तर सांगितले आहे. ठळक वैशिष्टये 0 पूर्वलक्षणं 0 प्रभावशाली उपचार 0 होमिओपॅथीपासून आधुनिक उपचारपध्दतीपर्यंत विविध थेरपीजची माहिती 0 योग्य जीवनशैली आणि योग्य आहार यामुळे होणारे लाभ 0 डोकेदुखी आणि मायग्रेन टाळण्यासाठी प्रतिबंधक असे साधे, सोपे व्यायाम या पुस्तकामध्ये सांगितलेल्या सूचनांमुळे मायग्रेनच्या रुग्णांची डोकेदुखीची वारंवारता, तीव्रता आणि कालमर्यादा कमी होईल. इतकंच नव्हे तर डोकेदुखी पूर्णपणे बरीही होईल! Papar Back Book Rohan Prakashan Marathi 141 125 MigrainVaDokedukhi.jpg MIGRAINEBC.jpg.jpg
Weight 125 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.