जीनियस जेम डॉ. जीएम
Sale₹375.00 ₹425.00
लेखक : अनुराधा परब
प्रगतिशील उद्योगपती- शास्त्रज्ञ डॉ. गंगाधर मोतीराम वारके यांच कार्यचरित्र
” सूक्ष्मजीवशास्त्र त्याचबरोबर उद्योजकीय कौशल्य आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदान अशा विविध व्यापक स्तरांवर डॉ. जी. एम. वारके यांचे कार्यचरित्र महत्त्वाचे आहे.
साइटोफागा जिवाणूंच्या विविध प्रजातींची ओळख तसेच त्यांचे विलगीकरण यामधील त्यांच्या मूलभूत संशोधनाने सूक्ष्मजीवशास्त्राच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. या जिवाणूंच्या प्रजार्तीच्या लक्षणांचे तपशीलवार वर्णन आणि त्यांच्या विलगीकरणासाठी आवश्यक विशेष मीडिया निर्मितीद्वारे त्यांच्यातील वैज्ञानिकाने आपल्या समर्पित वृत्तीचेच दर्शन घडवले.
इतकेच नव्हे तर, त्यांच्या या पायाभूत संशोधनाने भविष्यातील संशोधनाचा आणि औद्योगिक क्षेत्रातील उपयोजनांचा मार्गच प्रशस्त केला.
डॉ. वारके यांच्या या कार्यामुळे औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर विज्ञानाच्या व्यावहारिक उपयोजनाच्या क्षेत्रातदेखील नव्या संधींची दालने खुली झाली आहेत. त्यांच्या सर्वस्वी नव्या दृष्टिकोनामुळे अनेक औद्योगिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये सुलभता आल्याने त्याचा आर्थिकदृष्ट्या व्यापक परिणाम दिसून आला आहे. त्यांचे औद्योगिक संशोधन आणि त्याद्वारे निर्मिती झालेले उत्पादन तंत्रज्ञान आजही उद्योजक तसेच उद्योगांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांचे हे चरित्र त्यांच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक यशाचे गमक सांगतानाच भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याचेही काम करते.
सूक्ष्मजीवशास्त्र आणि उद्योगविश्वात त्यांनी निर्माण केलेल्या समृद्ध वारशाचा फायदा जागतिक आरोग्य, विज्ञान आणि उद्योग क्षेत्राला झाला असून त्याबद्दल सर्वत्र त्यांच्याविषयी आदराची भावना व्यक्त केली जाते. देशाला, समाजाला आपले अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. जी, एम. वारके यांचे चरित्र तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अवश्य वाचावे. त्यातून प्रेरणा घेत नवनिर्मिती करत देशाच्या समृद्धीला आपलाही हातभार लावावा, असे यानिमित्ताने मी सुचवू इच्छितो.”
प्रा. ज्येष्ठराज बी. जोशी
कुलपती इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई
अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद
Reviews
There are no reviews yet.