452 | Eleventh Hour | इलेवन्थ अवर | S. Hussain Zaidi | एस. हुसैन झैदी | Rama Hardikar-Sakhdeo | रमा हर्डीकर-सखदेव | मुंबईत २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमांचे घाव अजून भरलेले नाहीत. दिल्लीत पोलीस सुपरींटेंडंट विक्रम सिंग भारतभेटीला आलेल्या पाकिस्तानी उच्चायुक्ताला रागाच्या भरात कानाखाली वाजवतो…त्याच्या या धारीष्ट्र्यामुळे त्याला निलंबित केलं जातं…त्याचवेळी भोपाळच्या तुरुंगातून पाच दहशतवादी फरार होतात…मुंबईत त्यांच्या शोधमोहिमेवर विक्रांत सिंगलाच अनौपचारिकपणे नेमलं जातं. शोधकार्याला प्रचंड वेगाने सुरुवात होते. आणि हे सारं घडत असताना दूर कुठे तरी भर समुद्रात लक्षद्वीपला जाणाऱ्या क्रूजचं सोमाली चाच्यांकडून अपहरण होतं…काही ‘खास’ मागण्यांसाठी! या सगळ्या गोष्टींतून सुरु होते, ती वेगवान घटनांची मालिका… या मालिकेत दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि भोपाळपासून लक्षद्वीपपर्यंत अनेक घटनांचे दुवे जोडले गेलेले असतात. उच्चपदस्थ नेते, पोलीस व लष्करी अधिकारी आणि काही ‘विशेष’ माणसं या शोधचक्रात गुंततात. त्यांच्या जोडीने नकळतपणे वाचकही या थरारमोहिमेत गुंतत जातो. अपहरणकर्त्यांच्या मागण्या असतात तरी काय? त्यांचं कारस्थान काय असतं? उद्धटपणाच्या वागणुकीनंतरही या मोहिमेत विक्रमला सहभागी का करून घेतलं जातं? शोधमोहीम थांबते तरी कुठे? हुसैन झैदी यांच्या खास शैलीत रंगत जाणारा थरारक आणि गूढ शोधमोहिमेचा विलक्षण प्रवास इलेव्हन्थ अवर… |
book | Rohan Prakashan | Marathi | मोहर | Fiction | कथा-कादंबरी | 250 | EleventhHourcoverfinal | Eleventh HourBC.jpg |
काळेकरडे स्ट्रोक्स
[taxonomy_list name=”product_author” include=”421″]
उदास पोकळी… की पोकळीतच उदासी राहते भरून?
समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी?
का वागतोय तो असा? ‘इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस’सारखा कधी झपाटला जातोय…
कधी ‘पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा’ गुढाकडे ओढला जातोय…
कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन
कवितांमधून व्यक्त होत जातोय…
आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे
कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग
दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.
या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.
मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ!
खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा
पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही!
कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनवासवरचे…
समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड
काळेकरडे स्ट्रोक्स !
Reviews
There are no reviews yet.