डेथबेडवरून क्लायमॅक्स
₹250.00
लेखक : सतीश तांबे
आपणच समाजाला वाळीत टाकायचं! हे डोक्यात आलं त्या सुरुवातीच्या काळात मला आसपासचं बघायला एक वेगळाच चष्मा मिळाल्यासारखं झालं. मन कुठेच गुंतू द्यायचं नाही आणि आपल्या सुखदुःखासाठी कुणाचाही आधार घ्यायचा नाही. मुख्य म्हणजे आपण समाजाला वाळीत टाकलंय हे कुणाला म्हणून सांगायचं नाही. ते शक्यही नव्हतं ना ! कारण तुम्ही सांगणार म्हणून कुणाकुणाला?
समाजाला सांगण्यासाठी दवंडी, सर्क्युलर, फतवे, पोस्टर्स, हँडबिलं असे मार्ग असतात… बरं, माझ्या वागण्याबोलण्यात म्हणजे वरकरणी मला काहीच फरक करायचा नव्हता. जो काही फरक करायचा होता तो अंतर्यामी… या कानाचं त्या कानाला कळणार नाही असा ! तर मी आयुष्यभर बऱ्यापैकी तसा वागलो आणि समाजाला वाळीत टाकण्याची गंमत अशी होती की, समाजाकडून आवश्यक त्या सोयीसुविधा, कामं यांच्या देवाणघेवाणीला कुठेच मज्जाव नव्हता… तर हे मला जवळपास अख्खं आयुष्य साधलं होतं आणि मी समाजाला वाळीत टाकलंय हे माझं गुपित मी अगदी मरेपर्यंत कुण्णाला सांगायचं नाही असं ठरवलं होतं…
– ‘वाळी गं वाळी ळीs ळीs ळीs’ या कथेतून
मनाच्या अंतरंगात डोकवायला लावणाऱ्या गोष्टीवेल्हाळ कथा :
। डेथबेडवरून क्लायमॅक्स ।
। एका रोग्याचा लहान भाऊ ऊर्फ ‘तुला’ रोगाची कथा ।
। उचलले अंबरीश गगनात…।
। वाळी गं वाळी ळीs ळीs ळीs ।
Reviews
There are no reviews yet.