Sale

250.00 180.00

काँक्रीटची वनराई

प्रगत, सुनियोजित, सुंदर शहरांचं स्वप्न…

सुलक्षणा महाजन यांचा जन्म १९५१ साली मुंबई येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण नाशिक येथील गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूलमध्ये झालं. त्यांनी १९७२ साली सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई, येथून बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमधील पदवी प्राप्त केली. शिवाय १९७४ साली आय.आय.टी. पवई येथून इंडस्ट्रियल डिझाइनमधे पदविका प्राप्त केली. महाराष्ट्र नगररचना खातं, ठाणे आणि भाभा अॅसटॉमिक रिसर्च सेंटर, मुंबई, या सरकारी आस्थापनांमध्ये त्यांनी अर्किटेक्ट म्हणून नोकरी केली. घेरझी इस्टर्न लिमिटेड, मुंबई आणि एपिकॉन्स कन्सल्टंट, ठाणे या खाजगी क्षेत्रांमधील कंपन्यांमध्ये वास्तुरचनांसाठी कन्सल्टंट म्हणूनही त्यांनी काम केलं. ‘नगर नियोजन’ या विषयावर मिशिगन विद्यापीठात, तर ‘हॅबिटाट’ या जागतिक संस्थेच्या ‘सस्टेनेबल सिटीज प्रकल्पा’तर्फे महाराष्ट्रातील आठ शहरांचा अभ्यास त्यांनी केला. ‘मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिट’मध्ये मुंबई संबंधीचे संशोधन त्या करत असून ‘विचार रचना संसद,’ प्रभादेवी, मुंबई, येथे पर्यावरण वास्तुरचना आणि नगर नियोजन या विषयाचं अध्ययन करत आहेत. या विषयांवर त्यांची पुस्तकं प्रकाशित असून त्या लोकसत्ता, सकाळ या दैनिकांतून सातत्याने लेखन करतात.

काँक्रीटचं जंगल’ म्हटलं की डोळयासमोर उभ्या राहतात आक्राळविक्राळ, कशाही-कुठेही बांधलेल्या इमारती! पण कोणतंही शहर किंवा नगर म्हणजे फक्त उत्तुंग, दाटीवाटीने फोफावलेल्या इमारती आणि भावनाशून्यपणे घडयाळाच्या काटयावर पळणारी माणसं, एवढंच असतं का? शहरांबाबतच्या समाजातील अशा प्रकारच्या प्रचलित नकारात्मक समजुती आणि विस्तारणारं नागरीकरण हा प्रचंड विरोधाभास लेखिकेलाही चक्रावून टाकतो.
या विरोधाभासाचा शोध घेण्याचा, त्यामागची गृहितकं तपासण्याचा, नागरीकरणाची प्रक्रिया समजून घेण्याचा आणि समजावून देण्याचा सकारात्मक व प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच हे पुस्तक!
लेखिकेच्या दृष्टिकोनातून राज्याच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी शहरं निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावतात. उत्तम सोयी-सुविधांनी युक्त शहरांच्या निर्मितीसाठी आपल्याला गरज आहे ती दूरदृष्टी ठेवून केलेल्या नियोजनाची. ज्याप्रमाणे एखादी वनराई फुलवायला, ती वृध्दिंगत करायला एका कुशल माळयाची व त्याच्या प्रेमळ संगोपनाची गरज असते त्याचप्रमाणे आजच्या काँक्रीटच्या जंगलाचं वनराईत रूपांतर करण्यासाठी आज गरज आहे ती द्रष्टया लोकनेत्यांची आणि व्यापक दृष्टीकोन असणाऱ्या कुशल प्रशासकांची.
या दृष्टीने या पुस्तकातील चर्चा व मुद्दे वाचकांना व संबंधितांना आजच्या बकाल काँक्रीटच्या जंगलाचं रूपांतर सुंदर व नियोजनपूर्ण ‘वनराई’मध्ये करण्यास नक्कीच उद्युक्त करतील.

978-93-82591-11-5 Card Binding 184 , , ,

Reading Time: 2 Minutes (180 words)

462 978-93-82591-11-5 Concretechi Vanrai काँक्रीटची वनराई प्रगत, सुनियोजित, सुंदर शहरांचं स्वप्न… sulakshana Mahajan सुलक्षणा महाजन काँक्रीटचं जंगल’ म्हटलं की डोळयासमोर उभ्या राहतात आक्राळविक्राळ, कशाही-कुठेही बांधलेल्या इमारती! पण कोणतंही शहर किंवा नगर म्हणजे फक्त उत्तुंग, दाटीवाटीने फोफावलेल्या इमारती आणि भावनाशून्यपणे घडयाळाच्या काटयावर पळणारी माणसं, एवढंच असतं का? शहरांबाबतच्या समाजातील अशा प्रकारच्या प्रचलित नकारात्मक समजुती आणि विस्तारणारं नागरीकरण हा प्रचंड विरोधाभास लेखिकेलाही चक्रावून टाकतो.
या विरोधाभासाचा शोध घेण्याचा, त्यामागची गृहितकं तपासण्याचा, नागरीकरणाची प्रक्रिया समजून घेण्याचा आणि समजावून देण्याचा सकारात्मक व प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच हे पुस्तक!
लेखिकेच्या दृष्टिकोनातून राज्याच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी शहरं निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावतात. उत्तम सोयी-सुविधांनी युक्त शहरांच्या निर्मितीसाठी आपल्याला गरज आहे ती दूरदृष्टी ठेवून केलेल्या नियोजनाची. ज्याप्रमाणे एखादी वनराई फुलवायला, ती वृध्दिंगत करायला एका कुशल माळयाची व त्याच्या प्रेमळ संगोपनाची गरज असते त्याचप्रमाणे आजच्या काँक्रीटच्या जंगलाचं वनराईत रूपांतर करण्यासाठी आज गरज आहे ती द्रष्टया लोकनेत्यांची आणि व्यापक दृष्टीकोन असणाऱ्या कुशल प्रशासकांची.
या दृष्टीने या पुस्तकातील चर्चा व मुद्दे वाचकांना व संबंधितांना आजच्या बकाल काँक्रीटच्या जंगलाचं रूपांतर सुंदर व नियोजनपूर्ण ‘वनराई’मध्ये करण्यास नक्कीच उद्युक्त करतील.
कार्ड बाईंडिंग Book Rohan Prakashan Marathi 184 230 Informative 250 ConcretechiVanraai_RGB.jpg Concretechi VanraaiBC.jpg
Weight 230 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.