बोगद्यातला वाघ आणि इतर ५ कथा
₹175.00
भावस्पर्शी व रोमांचक कथांचा गुलदस्ता
रस्किन बाँड या एक अँग्लो- इंडियन लेखकचा जन्म 19 मे १९34 रोजी कसौली इथे झाला. चार वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते आपल्या आजीच्या घरी, देहरादूनला गेले. वयाच्या सोळाव्या वर्षी, त्यांनी पहिली लघुकथा लिहिली आणि त्याला पारितोषिकही मिळालं. तेव्हापासून त्यांची लेखणी अविरत साहित्यनिर्मिती करत राहिली. पुढे त्यांनी दोन वर्षांसाठी इंग्लंडला आपल्या मावशीकडे वास्तव्य केलं आणि तिथेच आपल्या पहिल्या कादंबरी लेखनाला सुरुवात केली. या कादंबरीला वाचक व समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. भारतात परतल्यानंतर त्यांनी विविध नियतकालिकांमध्ये लेखन केलं, तसंच काही नियतकालिकांचं संपादनही केलं. मोठ्यांबरोबरच लहान मुलांसाठीही भरपूर साहित्यनिर्मिती केली. आजवर त्यांच्या कथा - कादंबऱ्यांवर नामवंत दिग्दर्शकांनी चित्रपटही तयार केले आहेत. साहित्यातील भरीव योगदानासाठी त्यांना 'साहित्य अकादमी पुरस्कार', तसंच 'पद्म भूषण पुरस्कार' यांसारखे अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार मिळाले आहेत.
अनुवाद :
अनुवाद, चित्रकला आणि लेखन-वाचन यांमध्ये विशेष रस असलेल्या रमा यांनी माधुरी पुरंदरे यांनी पुस्तकं मराठीतून इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. त्यांना फ्रेंच , इंग्रजी आणि मराठी भाषांमधली ललित साहित्याची पुस्तकं अनुवादित करायला आवडतात. लहान मुलांसाठीही त्या लेखन करतात. आजवर त्यांनी वीसपेक्षा जास्त कलाकृतींची भाषांतरं केली असून त्यांना 'डेली हंट'ने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत पारितोषिकही मिळालं आहे.
सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड
यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.
त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं,
त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन येतात. त्यांच्या
कथा-कादंबर्यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत! (खर्या अर्थाने साहित्य क्षेत्रातले ‘बाँड’च!) त्यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका; खास तुमच्यासाठी !
तुम्ही या पुस्तक मालिकेतली एखादी जरी कथा वाचली ना, तरी तुम्ही ही सगळी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचून काढाल; एवढ्या या कथा इंटरेस्टिंग आहेत! या कथा वाचण्यात वाचून तुम्ही रममाण तर व्हालच, त्याचबरोबर तुमचा आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ‘ब्रॉडर’ होईल…
तेव्हा, रस्किन बाँड यांच्या या कथा-दुनियेत तुमचं मनापासून वेलकम!
Reviews
There are no reviews yet.