978-93-9131-923-6 | A P J Abdul Kalam | ए पी जे अब्दुल कलाम | डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम है एक वैज्ञानिक, लेखक, कवी, शिक्षक, दूरदर्शी आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती होते आणि त्याहीपेक्षा खूप काही होते. अलीकडील काळातील सर्वात प्रिय आणि प्रशंसनीय पुरुषांपैकी एक असलेले डॉ. कलाम हे दयाळू आणि सौम्य माणूस होते. ज्यांचा भारताच्या लोकांवर विशेषत: तरूणांच्या सामर्थ्यावर दृढ विश्वास होता. एक असा माणूस होता जो अकल्पनीय उंबीवर पोहोचला परंतु त्यांचे पाय हे नेहमी जमिनीवरच होते. ज्या माणसाने ज्याला स्पर्श केला त्या प्रत्येक गोष्टीत स्वतःची उत्कृष्टता आणि आणि नम्रता आणली. त्यानेच आपल्याला समर्पण आणि परिश्रम करण्याच्या शक्तीचे दर्शन दिले त्याने आपल्याला स्वप्नांची शक्ती दाखवून दिली. ते म्हणयचे, “स्वप्ने ती नाहीत जी आपण झोपेमध्ये पाहतो. स्वप्ने म्हणजे ती जी आपल्याला झोपू देत नाहीत.’ त्यांची जीवनकहाणी याचीच साक्ष देते. | paper back | book | Rohan Prakashan | Marathi | 63 | 199 |
केदारनाथची किमया आणि इतर २ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ३ कथा…
१. फेलूदाला हिरो मानणार्या आपल्या पुतणीला, रुनाला एकदा अंबर सेन सांगतात की, एकदा तरी मी फेलूदाला हरवून दाखवेनच! म्हणून ते एक नाटक रचून घरातल्यांनाही त्यात सामील करून घेतात, आणि ‘गायब झालेले अंबर सेन’ शोधताना फेलूदाला उलगडतं या नाटकात दडलेलं अनपेक्षित रहस्य!
२.शंकरप्रसाद चौधरींकडे मौल्यवान अशा ‘जहांगीरच्या सुवर्णमुद्रा’ असल्याचं रहस्य चौधरींच्या जवळच्या तीन व्यक्तींनाच माहीत असतं. त्यातली एक मुद्रा चोरीला जाते. कोण असेल चोर? कसं पकडेल फेलूदा या सुवर्णमुद्रा चोरणार्याला?
३. केदारनाथच्या पर्वतातल्या एका संन्याशाकडे असते एकच ऐहिक गोष्ट – त्यांना सन्मानाने दिलेलं मौल्यवान रत्नजडित पेंडन्ट! पण त्यावर अनेकांचा डोळा असतो… फेलूदाला या प्रकरणातून बाजूला काढण्यासाठी त्याच्यावर जीवघेणे हल्ले होतात; पण ‘केदारनाथची किमया’ घडते अन् फेलूदा चातुर्याने या प्रकरणाचा छडा लावतो…!
Reviews
There are no reviews yet.