मुलांसाठी संत तुकाराम
‘संस्कारमाला’ ह्या तीन पुस्तकांच्या संचातले ‘मुलांसाठी संत तुकाराम’ हे पुस्तक मधलं आहे. मुलांची भाषा आणि विचार यावर तुकारामाची छाया पडली तर मोठेपणी एक अनुभवविश्व आपोआप उलगडून येईल. आयुष्यभर साथ करतील असे अभंग तुकारामाने लिहिले.