इन द लॉंग रन

पाळण्याच्या नियोजनबद्ध व्यायामासाठी शास्त्रीय मार्गदर्शन


डॉ. लिली जोशी या एम.डी. मेडिसिन आहेत. ज्या काळात ‘लेडी फिजिशियन’ म्हणजे काय हे लोकांना माहीत नव्हतं तेव्हापासून म्हणजे १९७६पासून त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. त्यांचा स्वभाव शांत आणि व्यक्तिमत्त्व हसतमुख असून दुसऱ्याचं ऐकून घेण्याची त्यांची वृत्ती आहे. रुग्णांना बरं वाटावं अशी त्यांची आंतरिक तळमळ असल्याने आणि औषधोपचारांपेक्षा जीवनशैली सुधारण्यावर त्यांचा भर असल्याने यातूनच त्यांनी आरोग्यविषयक लेखनाची सुरुवात केली. त्यांनी रुग्णांसाठी मधुमेह, रक्तदाब, अॅगनिमिया, थायरॉइड विकार अशा अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. तसंच व्यायामाचं महत्त्व कृतीतून सांगणारा ‘वॉक विथ डॉक’ हा टेकडीवरचा उपक्रम आणि अशा अनेक अभिनव गोष्टींचं आयोजन केलं आहे. याचबरोबर संस्कृत हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. अगदी अलीकडे त्यांनी संस्कृत साहित्यात बी.ए., एम.ए. आणि पी.एच.डी. या पदव्या विशेष गुणवत्तेसह प्राप्त केल्या आहेत. ट्रेकिंग, जिमिंग, शास्त्रीय संगीत, वाचन, लेखन या गोष्टींची त्यांना मनापासून आवड आहे.

 


दिवाळीत फराळाचं खाऊन वाढलेलं वजन उतरवण्यासाठी,
की प्रेग्नंसीनंतर पुन्हा शेपमध्ये येण्यासाठी
की आपला बेस्ट फ्रेन्ड सांगतोय म्हणून केवळ….नक्की कशासाठी रनिंग सुरु करता आहात तुम्ही? याचं  उत्तर जर, “मला आता पुढच्या आयुष्यात कायमच फिट राहायचं  आहे आणि रनिंग माझ्या जीवनशैलीचा भाग बनवायचा आहे” असं असेल तर…  मिलाओ हाथ!
मग हे पुस्तक तुम्हाला नक्कीच उत्तम दिशा दाखवेल. काय आहे पुस्तकात?१. आजच्या काळातला रनिंग फिव्हर
२. रनिंगसाठी लागणारी साधन-सामग्री, आहार आणि गॅजेट्स
३. रनिंग दरम्यान शरीर रचनेत घडणारे बदल
४. रनिंगला सुरुवात कशी करावी? वॉर्म-अप, स्ट्रेचिंगचे व्यायाम कोणते?
५. रेस किंवा मॅरेथॉनसाठी लागणारी मानसिक आणि शारीरिक तयारी
६. दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचं  मार्गदर्शन
७. अनुभवी रनर्सचे जिवंत अनुभव आणि इतर बरच काही..रनिंगच्या विश्वात A  पासून Z पर्यंत तुमची बाराखडी लखलखित करणारं आणि दस्तूरखुद्द एका नामांकित डॉक्टरने लिहिलेलं इन द लॉन्ग रन उपयोगी पडणारं  पुस्तक…. इन द लॉन्ग रन!


250.00 Add to cart