बहर मनाचा
प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी कृतिशील विचार
डॉ. विजया फडणीस
आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपण खचून जातो …क्वचित प्रसंगी कोलमडून जातो ..रोजच्या आयुष्यातल्या आणि अकल्पितपणे उद्भवणाऱ्या अशा अनेक प्रसंगांना , समस्यांना उमेदीने आणि मनोबळाने कसं सामोरं जावं याचं शास्त्रीय मार्गदर्शन डॉ . विजया फडणीस पुस्तकात समर्पक उदाहरणांद्वारे करतात .
- आशावाद कसा जोपार ? मानसिक ताण कसे हाताळावेत ? आपल्यातील सुप्त शक्ती कशी ओळखावी ?
- आपल्या वागण्याचं विश्लेषण कसं करावं ?
- वाढत्या वयामध्ये व्याधींमुळे किंवा एकटेपणाच्या भावनेमुळे येणाऱ्या नैराश्याच्या भावनेला कसं सामोरं जावं …
अशा व इतर अनेक समस्यांवर त्या आपला अभ्यास, अनुभव व संवादी समुपदेशनाच्या कौशल्यातून वाट दाखवतात. सकारात्मकतेचं खत – पाणी देऊन आयुष्याला आनंदाचं झाड बनवणारं पुस्तक…
बहर मनाचा !