माइंडफुलनेस
वर्तमानक्षणात जगण्यासाठीची ‘पूर्णभान’ संकल्पना.
डॉ.राजेंद्र बर्वे
सोशल मीडिया आणि समाजातील वाढती झुंडशाही, हव्यासांचे इमले, ताणतणावांची चढती भाजणी, यांमुळे मनाच्या एकाग्रतेवर, स्थिरतेवर आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर परिणाम होत आहे. आज प्रत्येकाच्या मनाला गरज आहे ती पूर्णभानाने जगण्याची, अर्थात माइंडफुलनेसची!
पूर्णभान म्हणजे अस्तित्त्वाची वर्तमानातील लख्ख जाणीव… पूर्वग्रह आणि निवाडा छेदून जाणवणारी उत्साही व लक्षपूर्वक जोपासलेली मनोवृत्ती… सभोवतालासकट स्वतःचा केलेला बिनशर्त स्वीकार. अशी जागती जाणीव स्वतःमध्ये निर्माण करायची तर, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि नेटकं मार्गदर्शन घ्यावं लागतं. हे साध्य करण्यासाठी गप्पाटप्पा, व्यक्तिगत समायोजन, प्रश्नोत्तरं, कविता-गाणी आणि अशा आनंदयात्रेतून पूर्णभानाचं प्रशिक्षण देत आहेत सुधार्य डॉ. राजेंद्र बर्वे.
आत्ताचा क्षण आनंदाने आणि समस्यामुक्तपणे जगण्याचा मंत्र देणारं पुस्तक माइंडफुलनेस.