स्मार्टपणे व्हा कॅशलेस

आपले आर्थिक व्यवहार निर्धास्तपणे `कॅशलेस’ पद्धतीने करण्यासाठी सचित्र मार्गदर्शन


मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.

देसाई काका-काकूंकडे डेबिट कार्ड तर होतं, पण ते कसं वापरायचं हे त्यांना माहिती नव्हतं. खरंतर, माहिती नसण्यापेक्षा त्यांच्या मनात कार्ड वापरण्याविषयी भीती होती. मग एके दिवशी त्यांना सोसायटीतल्या हास्यक्लबमधल्या देशमुखकाकांनी एक पुस्तक भेट दिलं. या पुस्तकात पुढील विषय सचित्र समजावून सांगितले होते –
* क्रेडिट/डेबिट कार्डाचा वापर करून ऑनलाइन खरेदी कशी करायची? कार्ड स्वाइप करताना काय करायचं?
* रेल्वेचं कवा सिनेमाचं तिकिट ऑनलाइन कसं बुक करायचं?
*ऑनलाइन वीज बिल कसं भरायचं?
* NEFT/ RTGS, UPI इत्यादी सेवा कशा वापरायच्या?
* इंटरनेट बँकिंग व मोबाइल बँकिंगमधल्या सुविधा कोणत्या, त्या कशा वापरायच्या?
* सशक्त पासवर्ड्स कसे तयार करायचे?
* ई-वॉलेट्समध्ये पैसे कसे भरायचे आणि ते कसे वापरायचे?
* लघु व मध्यम उद्योजकांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी कोणती साधनं घ्यायची?
* सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना, इत्यादी
या पुस्तकातल्या टिप्स आणि मार्गदर्शनामुळे देसाई काका-काकू निर्धास्तपणे कॅशलेस व्यवहार करू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच आजच्या स्मार्टयुगात या पुस्तकाच्या सोबतीने तुम्हीही स्मार्टपणे व्हा कॅशलेस !


125.00 Add to cart

लेटेस्ट हेअरस्टाइल्स


माया परांजपे यांनी रसायनशास्त्रात बी.एस्सी. पदवी घेतली. 'ब्यूटी थेरपी' विषयाचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. १९७५ साली लंडनच्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ नॅचरल ब्युटी थेरपीचा एक वर्षाचा अभ्यासक्रमही त्यांनी पुरा केला. १९७६मध्ये 'ब्रिटीश असोसिएशन ऑफ ब्यूटी थेरपी अँड कॉस्मेटालॉजी' संस्थेचे सभासदत्व त्यांना मिळालं. १९७६पासून त्यांनी सौंदर्यप्रसाधनांचं उत्पादन सुरू केलं. त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठी लागणार्याल वनस्पतिजन्य सौंदर्यप्रसाधनांचा उत्पादन व्यवसाय त्यांनी ऊर्जितावस्थेत आणला. त्यांनी स्त्रीसौंदर्य संवर्धनाचा सखोल अभ्यास केला असून त्या या विषयावर त्या अधिकारवाणीने बोलू शकतात.

फॅशनचा व्यक्तिमत्त्वावर नक्कीच चांगला परिणाम होतो. केशरचना (हेअरस्टाइल्स) ही फॅशन मधील एक महत्त्वाची बाब! म्हणून त्या विषयावर असणारे पुस्तकसुद्धा महत्त्वाचेच ठरते. केशरचनेच्या साहाय्याने सुंदर व आकर्षक व्यक्तिमत्त्व कसे संपादन करता येईल याचे शास्त्रीय मार्गदर्शन या पुस्तकांत केले आहे.


100.00 Add to cart

लोकरीचे आकर्षक प्राणी व बाहुल्या


‘अन्नपूर्णा’ हे मंगला बर्वे यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक जरी असलं तरी त्यांच्यातली ‘पूर्ण अन्नपूर्णा’ उलगडली गेली, ती रोहन प्रकाशनात... १९८३ मध्ये रोहन प्रकाशनाने त्यांचं ‘फ्रिज-ओव्हन-मिक्सर : त्रिविध पाककृती’ हे पहिलं पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यानंतर मंगला बर्वे यांनी २० पुस्तकं ‘रोहन’साठी लिहिली आणि ती वाचकप्रिय ठरली.

मंगला बर्वे हे नाव त्यांच्या अनेक पाककृती पुस्तकांमुळे सर्वज्ञात आहे. मात्र पाककलेबरोबर विणकलाही त्यांना उत्तमरीत्या अवगत आहे. यापूर्वीही त्यांची विणकामावर काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
‘रोहन’साठी खास तयार केलेल्या या पुस्तकात त्यांनी लोकरीच्या विणकामातून तयार होणारी अनेक खेळणी दिली आहेत. त्यात बाहुला-बाहुली आहेत; विदूषक, शिपाई आहेत; पक्षी, प्राणी, मासे आहेत आणि सांताक्लॉजही आहे. घराच्या शोभेसाठी किंवा खेळणे म्हणून मुलांसाठी हे सर्व घरच्याघरी करणे
या पुस्तकामुळे सहज शक्य होणार आहे.


95.00 Add to cart

स्वानुभवी शिवणकला


१९५८-१९५९मध्ये एक वर्षाचा सरकारी शिवणकलेचा कोर्स पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मंगला राजवाडे यांना त्याची दोन बक्षिसेही प्राप्त झाली आहेत. त्यांनी ४२ वर्षं शिवणकलेचे वर्ग चालवले असल्याने शिवणकलेचा त्यांना मोठा अनुभव आहे.

४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मंगला राजवाडे या शिवणकलेत जशा पारंगत आहेत, याचप्रमाणे शिवणकाम शिकविण्याची कलाही त्यांना चांगली अवगत आहे. म्हणूनच त्यांचे हे पुस्तक शिवणकला शिकणार्‍यांसाठी वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे.
या पुस्तकात त्यांनी स्त्रिया, पुरुष व लहान मुलं यांच्या कपडयांचे अनेकविध प्रकार दिले आहेत. सर्व माहिती सविस्तरपणे, आकृत्यांसह व सोप्या पद्धतीने सांगितली आहे. त्याबरोबर मापेही काटेकोरपणे दिलेली आहेत.
शिवणकला अवगत असणे केव्हाही चांगले. त्यासाठी हे पुस्तक आपणास उत्कृष्टरीत्या मार्गदर्शन करेल एवढे निश्‍चित!


180.00 Add to cart
1 2