सुजाता चंपानेरकर

सुजाता चंपानेरकर यांचा जन्म 18 जानेवारी 1954 चा, तर त्यांचा मृत्यू 30 एप्रिल 1999 रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी आर्ट्स शाखेतील पदवी मिळवली. एक कर्तव्यदक्ष गृहिणीची भूमिका पार पाडताना त्यांनी 'रोहन प्रकाशन'च्या व्यवस्थापनाचे कार्यही सांभाळलं. त्या'च प्रमाणे काही पुस्तकांचं संपादनही केलं. 'पाहुणचार', ‘क्रोशाचे विणकाम', 'आहार गाथा' ही त्यांपैकी त्यांनी संपादित केलेली पुस्तकं. पुणे आकाशवाणीवरही आहार व आरोग्य या विषयांवर त्यांचे कार्यक्रम झाले. वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ करणं त्यांचा आवडता प्रांत. त्यातून त्यांनी 'आईस्क्रीम व सूप्स' ही पुस्तकं साकारली व ती अतिशय लोकप्रिय ठरली. 'महाराष्ट्र टाईम्स' व 'साप्ताहिक सकाळ' या सुप्रसिद्ध दैनिकांतून व नियतकालिकांतून त्यांनी सातत्याने लेखन केलं. अकाली झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्यातली लेखिका सीमित राहिली.

लेखकाची पुस्तकं

आइस्क्रीम्स व डेझर्टस्

फ्रिजच्या साहाय्याने


सुजाता चंपानेरकर


लहानांपासून मोठयांपर्यंत आइस्क्रीम या पदार्थाचं सर्वांनाच आकर्षण असतं. अगदी बाहेरच्यासारखं चविष्ट आइस्क्रीम आपण या पुस्तकात दिलेल्या रेसिपिजच्या साहाय्याने घरी बनवू शकतो. पिस्ता, चॉकलेट, रासबेरी, आइस्क्रीम, फालुदा, फ्रूट कॉकटेल, लस्सी, कस्टर्डस, ट्रायफल अशा हव्याहव्याशा वाटणार्‍या रेसिपीज् उपयुक्त व महत्त्वाच्या टीप्ससकट या पुस्तकात दिल्या आहेत.



100.00 Add to cart

सूप्स


सुजाता चंपानेरकर


‘आइस्क्रीम्स व डेझर्टस्’ या पुस्तकाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर सुजाता चंपानेरकर यांचे हे नवे पुस्तक. नाविन्यपूर्ण तसेच प्रचलित चवींची शाकाहारी व मांसाहारी अशी विविध सूप्स त्यांनी या पुस्तकात दिली आहेत. काटेकोरपणे परंतु सोप्या भाषेत त्यांनी केलेले मार्गदर्शन गृहिणींना निश्‍चितच उपयुक्त ठरेल.


40.00 Read more