नरेंद्र चपळगावकर

न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावर यांचं नाव मराठी साहित्य विश्वात वैचारिक लेखन करणारे लेखक म्हणून आदराने घेतलं जातं. त्यांनी मराठी व कायदा या विषयांचे काही अध्यापन केलं आणि त्यानंतर 27 वर्षं वकिली केली. मुंबई उच्च न्यायालयाचे ते नऊ वर्षं न्यायाधीश होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ते गुणश्री प्राध्यापक होते. तसंच आय. एल. एस. विधि महाविद्यालयात ते फोर्ड अध्यासनाचे मानद प्राध्यापक होते. कायदा, समाजव्यवस्था आणि साहित्य या विषयात त्यांना रस असून त्यांनी याविषयी विपुल लेखन केलं आहे.
ते माजलगाव येथे 2005 साली भरलेल्या 26व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद; राजवाडे संशोधन मंडळ, धुळे; कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक; प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई अशा विविध संस्थांची त्यांनी मानाची पदं भूषवली आहेत. अनेक महत्त्वाच्या मानसन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.

लेखकाची पुस्तकं

हरवलेले स्नेहबंध


न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावर यांचं नाव मराठी साहित्य विश्वात वैचारिक लेखन करणारे लेखक म्हणून आदराने घेतलं जातं. त्यांनी मराठी व कायदा या विषयांचे काही अध्यापन केलं आणि त्यानंतर 27 वर्षं वकिली केली. मुंबई उच्च न्यायालयाचे ते नऊ वर्षं न्यायाधीश होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ते गुणश्री प्राध्यापक होते. तसंच आय. एल. एस. विधि महाविद्यालयात ते फोर्ड अध्यासनाचे मानद प्राध्यापक होते. कायदा, समाजव्यवस्था आणि साहित्य या विषयात त्यांना रस असून त्यांनी याविषयी विपुल लेखन केलं आहे. ते माजलगाव येथे 2005 साली भरलेल्या 26व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद; राजवाडे संशोधन मंडळ, धुळे; कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक; प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई अशा विविध संस्थांची त्यांनी मानाची पदं भूषवली आहेत. अनेक महत्त्वाच्या मानसन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.

परस्परांच्या वैचारिक आकर्षणामुळे आणि आदरामुळे दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये एक बंध निर्माण होतो. हळूहळू त्याचं स्निग्ध स्नेहात रूपांतर होतं. पण काळाच्या पंजातून कोणीच सुटत नाही हे समजल्यावर मागे उरतं ते एक कोरडं व ठोक सत्य –
मनुष्यप्राणी मर्त्य आहे! तरी या स्नेहबंधांच्या स्मृती जिवंत राहतातच. एकीकडे या स्मृतींचा ओलावा डोळ्यांत हलकेच पाणी आणतो, तर दुसरीकडे या स्मृतींच्या उजेडाने जीवन संपन्न झाल्याची जाणीवही समाधान देत राहते. ज्येष्ठ लेखक नरेंद्र चपळगावकर यांनी लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. पु. भागवत, बा. भ. बोरकर, य. दि. फडके, न. र. फाटक, ग. प्र. प्रधान, अरुण टिकेकर, विंदा करंदीकर, नरसिंह राव, पी. सी. अलेक्झांडर, मंगेश पाडगावकर, शांताबाई किर्लोस्कर यांसारख्या जनमानसावर ठसा उमटवणाऱ्या काही प्रतिभावंतांच्या स्मृतींना उजाळा देणारे स्मरणलेख या संग्रहात समाविष्ट केले आहेत. या लेखांची शैली अनलंकृत, तरीही लालित्यपूर्ण असून त्यांतून या व्यक्तींचा सहवास लाभलेल्या चपळगावकरांनी मौलिक अनुभवकथन केलं आहे. लेखांमधल्या स्मृतींच्या हिरव्याकंच पानांखालून ही माणसं आपल्याला सोडून गेल्याच्या जाणिवेचा एक दुखरा झराही सतत वाहत राहतो. अनुभव समृद्ध करता करता कातर करणारा स्मरणलेखांचा संग्रह…‘हरवलेले स्नेहबंध’!


200.00 Add to cart