इंदिरा गांधी, आणीबाणी… भारतीय लोकशाही

395.00


पी.एन. धर हे १९७०च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या सचिवालयाचे प्रमुख होते. त्या काळातले श्रीमती गांधींचे ते सर्वांत निकटवर्ती सल्लागार होते. देशाच्या इतिहासाला वळण देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे ते साक्षीदार होत. सिक्कीमचे विलीनीकरण असो किंवा आणीबाणीसारखी वादग्रस्त घटना असो, त्यातील आतापर्यंत प्रकाशात न आलेला बराच तपशील त्यांना ठाऊक आहे. त्यामुळेच देशाच्या राजकीय इतिहासात Indira Gandhi, the ‘Emergency’ and Indian Democracy (इंदिरा गांधी-आणीबाणी आणि लोकशाही) या त्यांच्या पुस्तकाचं विशेष मोल आहे. पंतप्रधानांच्या सचिवालयात दाखल होण्यापूर्वी पी.एन. धर हे ‘दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या संस्थेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ‘इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ,’ दिल्ली या संस्थेचेही ते संचालक होते.

अनुवाद:
'रोहन'चे एक ‘कलंदर’ लेखक. पत्रकारिता, अनुवाद, सदर लेखन ते ललित लेखनामध्ये अनेक वर्षं मुशाफिरी केलेला ‘ज्येष्ठ लेखक’ म्हणून परिचित होते. त्यांना व्यासंगी पत्रकारितेचा चार दशकाहून अधिक अनुभव होता. तसंच त्यांना पालिका बैठकीपासून आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांचे वृत्तांत देण्यापर्यंतचा समृद्ध अनुभव होता. दैनिक सकाळ, तरुण भारत व केसरी या वृत्तपत्रांतून काम केल्यानंतर ते महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात दाखल झाले. महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी ११ वर्षं काम केलं. तेथून त्यांनी लिहलेली 'राजधानीतून' ही वार्तापत्रं विशेष गाजली. त्यानंतर अनेक वर्षं त्यांनी ‘मटा’चे कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. 'कलंदर' या टोपण नावाने 'कानोकानी' हे त्याचं सदरही विशेष लोकप्रिय झालं. अनुवाद क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली असून त्यामध्ये इंदिरा गांधी (पुपुल जयकर), शेषन (के. गोविंदन कुट्टी), इंदिरा अंतिम पर्व (पी. सी. अलेक्झांडर), लता मंगेशकर (हरीश भिमानी), फॅन्टॅस्टिक फेलूदा (सत्यजित रे पुस्तकांची मालिका), लाल बहादूर शास्त्री (पी. एन. धर), कस्तुरबा : एक शलाका (अरुण गांधी), आर. डॉक्युमेंट (आयर्विंग वॉलेस) यांचा समावेश होतो. हे सर्व अनुवाद त्यांना उत्कृष्ट तर होतेच, परंतु ते लोकप्रियही झाले. सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमी, राज्य सरकार व अनुवाद सुविधा केंद्र यांचे पुरस्कार त्यांना लाभले. 'कानोकानी' या पुस्तकाला मसापचा चि. वि. जोशी पुरस्कार लाभला.


महत्त्वपूर्ण राजकीय घटना-घडामोडींनी, निर्णयांनी आणि व्यक्तित्वांनी १९७० चे दशक व्यापून टाकले होते. या सर्वांचा या पुस्तकात एका अंतस्थाने अतिशय तारतम्याने आढावा घेतला आहे. तसेच भारतातील लोकशाहीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले आहे. आणीबाणी लागू करतानाची परिस्थिती, उच्च पातळीवरील निर्णयप्रक्रिया, पडद्यामागील गुप्त हालचाली, संजय गांधी व चौकडीच्या कारवाया आणि इंदिरा गांधींची याबाबतची भूमिका, जयप्रकाश नारायण यांच्याशी गोपनीय वाटाघाटी, तसेच या दशकातील बांगला देशाची निर्मिती, सिमला करार, सिक्कीमचे विलिनीकरण इ. अभूतपूर्व घटनांमागील तपशील रंजक तितकाच उद्‌बोधक! पुस्तकाचे लेखक पी.एन.धर हे इंदिराजींचे सल्लागार व यावेळचे पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख होते. इतिहासाच्या पानात दडलेले सत्य सांगणारे, इंदिराजींच्या राजकीय जीवनाचे बरे-वाईट पैलू उलगडणारे आणि आतापर्यंत अज्ञात असलेली माहिती उघड करत परिस्थितीचा सर्वंकश परामर्श घेणारे महत्त्वपूर्ण पुस्तक.


Add to wishlist
Share
Share

    Reviews

    There are no reviews yet.

    Only logged in customers who have purchased this product may leave a review.