पी.एन. धर
पी.एन. धर हे १९७०च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या सचिवालयाचे प्रमुख होते. त्या काळातले श्रीमती गांधींचे ते सर्वांत निकटवर्ती सल्लागार होते. देशाच्या इतिहासाला वळण देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे ते साक्षीदार होत. सिक्कीमचे विलीनीकरण असो किंवा आणीबाणीसारखी वादग्रस्त घटना असो, त्यातील आतापर्यंत प्रकाशात न आलेला बराच तपशील त्यांना ठाऊक आहे. त्यामुळेच देशाच्या राजकीय इतिहासात Indira Gandhi, the ‘Emergency’ and Indian Democracy (इंदिरा गांधी-आणीबाणी आणि लोकशाही) या त्यांच्या पुस्तकाचं विशेष मोल आहे. पंतप्रधानांच्या सचिवालयात दाखल होण्यापूर्वी पी.एन. धर हे ‘दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या संस्थेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ‘इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ,’ दिल्ली या संस्थेचेही ते संचालक होते.