मर्मस्थळाचा अचूक वेध घेणारं पुस्तक

एखादा चांगला समीक्षक मनानं अत्यंत रोमँटिकसुद्धा असेल, तर तो कसं लिहील? याचं उत्तम उदाहरण द्यायचं, तर समोर येतं ते डॉ. आशुतोष जावडेकर यांचं ‘वा! म्हणताना…’हे पुस्तक ! एरवी समीक्षेचं पुस्तक म्हटलं की, सामान्य वाचकच काय, साहित्यक्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तीसुद्धा ते पुस्तक कोरडं, एखाद्या पोस्टमॉर्टेमच्या अहवालासारखं भावनाशून्य असेल असं समजतात. मात्र ‘वा! म्हणताना…’ हा या वास्तवाला [...]