‘असा घडला भारत’ प्रश्नमंजुषा

स्वातंत्र्यदिन निमित्त ‘असा घडला भारत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे ‘रोहन प्रकाशन’ने आयोजन केले आहे. विजेत्यांना रु.१०००ची पुस्तकरूपी बक्षिसं दिली जाणार आहेत.  स्पर्धेविषयी: या  प्रश्नमंजुषेत एकूण १३ प्रश्न आहेत.या  प्रश्नमंजुषेतील प्रश्न ‘असा घडला भारत’ या ग्रंथाच्या आधारे निवडले असून ग्रंथात त्याची नेमकी उत्तरं सापडतील.स्पर्धेत दि. ६ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत भाग घेता येईल.  स्पर्धेचा निकाल १५ ऑगस्ट [...]

‘असा घडला भारत’ या ग्रंथामधील निवडक भाग

१५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्याची पहाट… ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारताचं वसाहतीकरण साधल्यावर इ.स. १८५८मध्ये भारतीय वसाहतीची सूत्रं अधिकृतपणे पूर्णत: इंग्लंडच्या राजाकडे सोपवली गेली होती. अखंड भारतावर साम्राज्यवादी सत्ता लादणाऱ्या ब्रिटिश सरकारने प्रदीर्घ अशा स्वातंत्र्य लढ्यानंतर आणि हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर अखेरीस १८ जुलै, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ‘१४ ऑगस्ट, १९४७च्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य बहाल केलं [...]