द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट

450.00

क्रिकेट या सुसंस्कृत खेळाबरोबर असलेलं माझं आजन्म प्रेमप्रकरण
_______________________________________________________________________

रामचंद्र गुहा
अनुवाद  : अजेय हर्डीकर


भारतात गल्ली-बोळांत, छोट्या-मोठ्या मैदानांत उपलब्ध साधनांद्वारे क्रिकेट खेळलं जातं आणि हा खेळ पाहणारेही जागच्या जागी थबकून, जीव ओतून तो पाहत असतात; इतका क्रिकेट हा खेळ भारतीयांच्या नसानसांत भिनला आहे!

क्रिकेटचा चाहता आणि काही वर्ष स्थानिक क्रिकेट खेळलेला एक खेळाडू या नात्याने ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी भारतीय क्रिकेटचा इतिहास आत्मकथनपर शैलीत या पुस्तकात सांगितला आहे.

क्रिकेट हे त्यांचं प्रेमप्रकरण आहे, असं सुरुवातीलाच सांगून ओघवत्या व सहज-सुंदर शैलीत त्यांच्या बालपणीच्या क्रिकेटच्या आठवणी, तेव्हाचे स्थानिक, राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरचे त्यांचे ‘हिरो’ खेळाडू, त्यांची बलस्थानं आणि मर्यादा यांबद्दल ते कथन करतात. तसंच शालेय, कॉलेज, क्लब, राज्य आणि देश अशा सर्व पातळ्यांवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटचं महत्त्वही ते पुस्तकात आवर्जून विशद करतात.

पुस्तकातील शेवटच्या भागात भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नियामक मंडळामध्ये नियुक्त प्रशासक म्हणून काम करताना आलेले अनुभव परखडपणे मांडून ते आजच्या बदललेल्या क्रिकेट-संस्कृतीची चिकित्साही करतात.

क्रिकेट खेळावर निस्सीम प्रेम करणाऱ्या विचारवंत इतिहासकाराचं क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देणारं आणि वाचकालाही त्या काळाची सफर घडवून आणणारं प्रांजळ कथन… द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट!

Add to wishlist
Share
Share

    Reviews

    There are no reviews yet.

    Only logged in customers who have purchased this product may leave a review.