978-93-80361-33-8 | santha Vahate | संथ वाहते … ? | ” जीवनदायी ‘ नद्यांचे आजचे वास्तव | अभिजित घोरपडे | ज्यांनी मानवी संस्कृतीला आधार दिला , त्या नद्यांना आपण एकीकडे आई म्हणत म्हणत पूर्णपणे विद्रूप करून टाकले ; इतके की आता त्यांना खरा चेहराच उरला नाही . नद्या अशाप्रकारे बिघडल्याने आपल्यासाठी आपत्ती बनून राहिल्या आहेत . त्यांचे स्वास्थ्य बिघडल्याने पिण्याच्या पाणी , शेती , सभोवतालचे पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवरही खोलवर परिणाम झाले आहेत . उत्तर महाराष्ट्रातील पांजरेपासून मराठवाड्यातील मांजरेपर्यंत आणि कोकणातील पाताळगंगेपासून चंद्रपूरच्या इरई नदीपर्यंत राज्यभर हेच चित्र पाहायला मिळत आहे . त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहेत . त्यामुळेच नद्या सुधारायच्या असतील तर काळजीपूर्वक आणि तातडीने पावले उचलावी लागतील ! भारतातील व जगभरातील नद्यांच्या हासाचा आढावा घेऊन लेखक अभिजित घोरपडे यांनी महाराष्ट्रातील नद्यांच्या आजच्या वास्तवाचा , प्रत्यक्ष त्यांच्या पात्रात उतरून सर्वंकष वेध घेतला आहे . | Book | Rohan Prakashan | Marathi | 157 | माहितीपर | 125 |
स्मार्टपणे व्हा कॅशलेस
आपले आर्थिक व्यवहार निर्धास्तपणे `कॅशलेस’ पद्धतीने करण्यासाठी सचित्र मार्गदर्शन
प्रणव सखदेव
देसाई काका-काकूंकडे डेबिट कार्ड तर होतं, पण ते कसं वापरायचं हे त्यांना माहिती नव्हतं. खरंतर, माहिती नसण्यापेक्षा त्यांच्या मनात कार्ड वापरण्याविषयी भीती होती. मग एके दिवशी त्यांना सोसायटीतल्या हास्यक्लबमधल्या देशमुखकाकांनी एक पुस्तक भेट दिलं. या पुस्तकात पुढील विषय सचित्र समजावून सांगितले होते –
* क्रेडिट/डेबिट कार्डाचा वापर करून ऑनलाइन खरेदी कशी करायची? कार्ड स्वाइप करताना काय करायचं?
* रेल्वेचं कवा सिनेमाचं तिकिट ऑनलाइन कसं बुक करायचं?
*ऑनलाइन वीज बिल कसं भरायचं?
* NEFT/ RTGS, UPI इत्यादी सेवा कशा वापरायच्या?
* इंटरनेट बँकिंग व मोबाइल बँकिंगमधल्या सुविधा कोणत्या, त्या कशा वापरायच्या?
* सशक्त पासवर्ड्स कसे तयार करायचे?
* ई-वॉलेट्समध्ये पैसे कसे भरायचे आणि ते कसे वापरायचे?
* लघु व मध्यम उद्योजकांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी कोणती साधनं घ्यायची?
* सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना, इत्यादी
या पुस्तकातल्या टिप्स आणि मार्गदर्शनामुळे देसाई काका-काकू निर्धास्तपणे कॅशलेस व्यवहार करू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच आजच्या स्मार्टयुगात या पुस्तकाच्या सोबतीने तुम्हीही स्मार्टपणे व्हा कॅशलेस !
Reviews
There are no reviews yet.