रक्तरंजित चंद्र
₹300.00
लेखक : सोहम पी. शहा
अनुवाद : अमिता नायडू
रक्तरंजित स्टेशन चंद्र
सुट्टीमध्ये पर्यटकांनी फुलून येणारं माथेरान हे हिल काही काळ एका वेगळ्याच कारणासाठी फेमस होऊ लागतं. तिथल्या स्थानिक लोकांना, घोडेवाल्यांना तिथे झपाटलेले घोडे, पछाडलेल्या वाटा यांचा अनुभव येऊ लागतो. त्याचबरोबर अचानक दिसणारी आणि अदृश्य होणारी स्त्रीची आकृती दिसू लागते… .. आणि मग सुरू होते मृत्यूची मालिका !
मुंबईचा एक तरुण व्यावसायिक आदित्य मल्होत्रा आपली पत्नी, छोटा मुलगा आणि दोन भाच्या यांच्यासह माथेरानला जातो. आदित्यने नुकतीच ‘सेसिल लॉज’ ही एक मोठी प्रॉपर्टी किरकोळ रकमेत विकत घेतलेली असते. कधीकाळी लोकप्रिय असलेल्या या लॉजमध्ये आता काही वर्षांपासून एका आत्म्याने आपलं बस्तान बसवलेलं असतं…
…आणि तो आता या मल्होत्रा कुटुंबाला विळख्यात घेतो.
आदित्य आणि कियारामधला रोमान्स… निरागस सीडला भुरळ घालणारे पिशाच… या भुलभुलैयातून मल्होत्रांना वाचवू पाहणारे सुरेश आणि मधू… माथेरानमधल्या भुताळीवर रील्स बनवून लाइक्स वाढवायला आलेली झोया आणि तिची दोस्त मंडळी…
भूतकाळातल्या प्रेमाची, विरहाची हादरवून टाकणारी सूडकथा… रक्तरंजित चंद्र !
















Reviews
There are no reviews yet.