सोहम पी. शहा
सोहम पी. शहा जाहिरात आणि चित्रपटनिर्मिती क्षेत्र २६ वर्षांचा अनुभव. मुंबईमधल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी कमर्शियल आर्टमधली पदवी प्राप्त केली. १९९४ मध्ये 'एबल अँड विल' या नावाने त्यांनी आपली जाहिरात संस्था स्थापन केली.
करण जोहर यांच्या 'कभी खुशी कभी गम' (२००१) आणि रामगोपाल वर्मा यांच्या 'भूत' (२००३) या चित्रपटांसाठी साहाय्य केल्यानंतर शहा यांनी २००५ मध्ये आलेल्या 'काल' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी २००९ मध्ये 'लक' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं.
त्यांच्या आगामी काही प्रकल्पांमध्ये मनोचिकित्सक विषयावरच्या 'कर्तम् भुगतम्' या चित्रपटाचा आणि पौराणिक विषयावरच्या चित्रपटांचा समावेश आहे. 'ब्लड मून' हे पुस्तक म्हणजे त्यांच्या साहित्यिक लेखनाचा पहिला प्रयत्न आहे.




