नेहरू व बोस : समांतर जीवनप्रवास

350.00


दिल्ली येथील ‘अशोक विद्यापीठा'चे कुलगुरू रुद्रांग्शू मुखर्जी हे कुलगुरू होते. ते इतिहासाचे प्राध्यापक आहेत. कलकत्ता विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचं कार्य केलं आहे. त्याचबरोबर प्रिन्स्टन विद्यापीठ, मँचेस्टर विद्यापीठ व कॅलिफोर्निया विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी निमंत्रित व्याख्याता म्हणून शिकवलेलं आहे. कलकत्तास्थित ‘टेलिग्राफ' या वृत्तपत्राच्या संपादकीय पानांची संपादकीय जबाबदारीही त्यांनी सांभाळलेली आहे, आणि अजूनही या वृत्तपत्राचे सल्लागार संपादक म्हणून ते काम करतात. त्यांची अनेक संशोधनपर पुस्तकं प्रकाशित आहेत आणि ती गाजलीही आहेत.

अनुवाद :
तरुण कादंबरीकार, अनुवादक म्हणून अवधूत डोंगरे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आजवर चार कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या असून कादंबरीलेखनासोबतच ते एकरेघ (ekregh.blogspot.in) हा ब्लॉगही लिहितात. पत्रकारी स्वरूपाचं लेखनही त्यांनी काही वर्तपानपत्रांतून व नियतकालिकांमधून केलं आहे. व्यवसाय म्हणून ते विविध प्रकारच्या अनुवादाची कामं करतात. त्यांच्या ‘स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’ या त्यांच्या कादंबरीला २०१४ सालचा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ मिळाला आहे.


`जवाहरलाल नेहरूंएवढी हानी मला कोणीच पोचवलेली नाही’, असं सुभाषचंद्र बोस यांनी १९३९मध्ये लिहिलं होतं. नेहरूंकडे बोस यांनी शत्रू म्हणून पाहावं एवढे या दोन राष्ट्रवादी नेत्यांमधले संबंध बिघडले होते का? पण मग सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सेनेतील एका पलटणीचं नाव जवाहरलाल यांच्यावरून का ठेवलं? आणि १९४५मध्ये सुभाषचंद्रांच्या अकाली निधनाची वार्ता ऐकल्यावर जवाहरलाल यांना अश्रू का अनावर झाले? शिवाय, `मी त्यांना लहान भाऊ मानायचो’, असे उदगार नेहरूंनी का काढले?
स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीचा शोध रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या पुस्तकात सखोलतेने घेतला आहे. भिन्न राजकीय विचारधारांमुळे नेहरू व बोस यांच्यात न उमलू शकलेल्या मैत्रीचा अदमास हे पुस्तक बांधतं आणि त्याचसोबत या दोन व्यक्तिमत्त्वांमधीलभेदही अधोरेखित करतं. गांधी नेहरूंकडे आपला राजकीय वारस म्हणून बघत होते, तर सुभाषचंद्रांना मार्गभ्रष्ट पुत्र मानत होते.
आधुनिक भारताच्या घडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वांची लक्षवेधक कहाणी… नेहरू व बोस समांतर जीवनप्रवास !



Add to wishlist
Share
Share