नकली पेंटिंगच गूढ
₹120.00
लेखक : विजय खंडागळे
निभू म्हणजे निसर्ग आणि भूमी. स्मार्ट, हुशार, धाडसी जुळी भावंडं… कुठेतरी पाणी मुरतंय अशी जराशी जरी शंका आली तरी लागलीच त्याचा पुरता शोध घेऊन मुळाशी जाणारी, डिटेक्टिव्हगिरी करत त्या प्रकरणाचा छडा लावणारी ! त्यांच्या साहसांच्या या भन्नाट, थरारक… निभूच्या भर्राकथा !
नकली पेंटिंगचं गूढ
निभू मावशीकडे फिरायला जातात. तेव्हा एका संग्रहालयात त्यांना त्यांच्याच वयाचा मुलगा सापडतो. त्याला त्याचं नाव, त्याचा पत्ता यांतलं काहीही आठवत नसतं. त्याच्याकडे असते ती एक पिशवी. त्यात असतं एक चित्र आणि काही वस्तू. निभू त्याला मदत करायचं ठरवतात, तेव्हा खतरनाक गँगचे गुंड या जुळ्यांना पळवून नेतात…
निभू या संकटातून स्वतःला सोडवून घेऊ शकतील? त्यांना नकली पेंटिंगचं गूढ उलगडता येईल ?
















Reviews
There are no reviews yet.