जिनॉमिक्स
Sale₹395.00 ₹475.00
मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा
लेखक : डॉ. संजय गुप्ते , डॉ.अविनाश भोंडवे
वैद्यकीय विज्ञान कल्पनेपलीकडील क्षितिजांकडे झेपावत नवनवी शास्त्र दालनं खुली करत आहे. त्यांपैकी एक दालन म्हणजे जिनॉमिक्स ! या शाखेच्या उदयानंतर वैद्यकीय विज्ञानाने मानवी जीवनातल्या अनेक घडामोडी, शारीरिक क्रिया आणि दुष्प्राप्य आजार यांचा उलगडा करण्याचा जणू चंगच बांधला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते आणि वैद्यकीय विश्लेषक व लेखक डॉ. अविनाश भोंडवे यांनी या पुस्तकात या अद्भुत विज्ञानशाखेची ओळख करून दिली आहे; वर्तमानासह भविष्यात ही शाखा वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र क्रांती कशी करू शकते याचा सर्वांगीण वेध घेतला आहे.
पुस्तकातील काही विषय असे…
जिनेटिक्स आणि जिनॉमिक्स यांची ओळख
डीएनएचं कार्य कसं चालतं ?
आनुवांशिकता आणि म्यूटेशन म्हणजे काय?
आनुवांशिक आजारांची माहिती
महत्त्वाच्या जनुकीय चाचण्या आणि त्यांती आवश्यकता
कर्करोग उपचारातील जिनॉमिक्स क्रांती
डाएट आणि जिनॉमिक्स
फोरेन्सिक सायन्स, क्रीडा, शिक्षण इ. क्षेत्रांतील जिनॉमिक्सचा वापर
आनुवांशिक आजारांबद्दलच्या केस स्टडीज आणि बरंच काही…
जिनॉमिक्स या विज्ञानशाखेच्या सर्व अंगांचा सखोल ऊहापोह करणारं, डॉक्टरांना, अभ्यासकांना तसंच सर्वसामान्य वाचकांना उपयुक्त असं पुस्तक… जिनॉमिक्स : मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा
















Reviews
There are no reviews yet.