इयरफोन्स
₹160.00
लेखक : गणेश मतकरी
टीनएजर मुलांनो,
तुमच्या परिघातील विषय, तुमची भाषा, तुमचे विचारचक्र आणि भावविश्व असं सर्व, या पुस्तकांतील कथांमधून लेखक गणेश मतकरी यांनी चितारलं आहे. तुमच्या अडनिड्या वयात तुमच्या मनात चाललेली खळबळ लेखकाने यात अलवारपणे चितारली आहे. एखादा आर्किटेक्ट ज्या बारकाईने हरेक तपशीलाचे रेखाटन करतो, तशा रीतीने या गोष्टींतील घटनांची आणि व्यक्तींची सूक्ष्म वर्णने लेखकाने केली आहेत. त्यामुळे या कथा वाचताना कित्येक गोष्टी, त्यातील प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात आणि मनात ठसतात; दीर्घकाळ रेंगाळतात. गोष्टींतील नायक व नायिकांचा चांगुलपणा मनाला भिडतो. मुलांनो, तुम्हाला या कथा ‘आपल्या’ गोष्टी वाटतील.
आणि पालकांनो,
तुमच्या पिढीला या कथा तुमच्या स्वतःच्या ‘त्या’ वयात पुन्हा नेऊन आणतील आणि आपल्या मुलांकडे बघण्याचा योग्य चष्मा देतील.
एकंदर आजच्या समाजाला या मुलांच्या विलक्षण विश्वाकडे बघण्याचा जरा समंजस दृष्टिकोन देतील.
-शुभदा चौकर
















Reviews
There are no reviews yet.