देशीवाद
₹260.00
लेखक : भालचंद्र नेमाडे
अनुवाद : प्रशांत धांडे
१९८३ साली रा. भालचंद्र नेमाडेंनी ‘वाङ्मयातील देशीयता’ या निबंधाची मांडणी केल्यानंतर आजपावेतो देशीवादावर मोठ्या प्रमाणात उलटसुलट बरीच चर्चा झाली आहे.
बहुतांश वेळा ही चर्चा नकारात्मक आणि प्रतिक्रियात्मक झालेली दिसते. स्वातंत्र्योत्तर काळापासून एतद्देशीय अकादमिक समीक्षा ही पश्चिमधार्जिणी राहिल्यामुळे बहुतांश आक्षेप त्याच छायेखाली झाल्याचं दिसतं. देशीवादाला कुणी पाश्चात्त्यविरोधी, कुणी पुरोगामी, तर कुणी प्रतिगामी ठरवून आपापल्या मापदंडांनुसार समीक्षकांनी त्याचे आकलन करून घेतले. मराठी भाषेतील समीक्षक देशीवादाबाबत साशंक राहिल्याचे दिसले, तरी देशपातळीवरील परिसंवाद, वाद-चर्चा, व्याख्याने, वाङ्मयीन नियतकालिके आणि समीक्षक यांनी देशीवादाचे स्वागतच केल्याचे दिसून येते.
म्हणूनच मराठी साहित्य-संस्कृतीत नेहमी हिरिरीने चर्चिला गेलेला नेमाडेंचा देशीवादाचा मूळ विचार जिज्ञासू मराठी वाचकांना आणि अभ्यासकांना आकळून घेता यावा, या हेतूने केलेलं त्यांच्या निबंधांचं भाषांतर म्हणजे हे पुस्तक, जे साहित्य आणि समीक्षा यांच्या पलीकडे जाऊन संस्कृतीच्या विविध अंगांना स्पर्श करतं.
















Reviews
There are no reviews yet.