

कँडी क्रश
₹250.00
लेखिका : नीरजा
माणूसपण हरवण्याच्या या अंदाधुंद काळात प्रत्येकजण आपापल्यापरीने शोधतो आहे आपल्या वाटा, जगण्याचे आपले मार्ग. देश, धर्म, जाती, लिंगभेदभाव, वर्णद्वेष-वर्गद्वेष अशा अनेक भिंती उभारल्या जाताहेत माणसाभोवती. प्रश्नचिन्ह निर्माण होताहेत ‘माणूस’ नावाच्या संकल्पनेवरच त्याला चिरडून टाकण्याचे, नेस्तनाबूत करण्याचे अनेक राक्षसी बुलडोझर फिरवले जाताहेत. पण त्यातूनही एक वाट असतेच जी जाते एका सलोख्याच्या, शांतीच्या, सुकून असणाऱ्या प्रदेशात जिथे संवेदनशील माणूसपण शाबूत असेल.
अशाच प्रश्नांभोवती फिरणाऱ्या आजच्या काळाच्या या संवादी दहा कथा… स्वतःचा शोध घेणाऱ्या, नात्यांमधला लपंडाव संपवू पाहणाऱ्या, मनात येणाऱ्या प्रश्नांना अनुत्तरित न ठेवता ते सोडवू पाहणाऱ्या… काहीशा चिंतनशील, काहीशा आक्रमक, काहीशा रंजक तर काही निव्वळ डोक्याला झिणझिण्या आणणाऱ्याही…
Reviews
There are no reviews yet.