आपल्यासाठी आपणच

उत्तरायुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी


[taxonomy_list name=”product_author” include=”389″]


वय वाढणं म्हणजे नक्की काय असतं? तर वयाबरोबर अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होणं. या बदलांमुळे थोडंसं गोंधळल्यासारखं होतं. साठीनंतरच्या या टप्प्यात अनेक कौटुंबिक व सामाजिक समस्याही जाणवू लागतात आणि त्यावर समंजस भूमिका घेण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळावं अशी एक गरज वाटू लागते.
आज आपली दैनंदिन जीवनशैली अमूलाग्र बदलली आहे. त्याचबरोबर आयुष्यमानही वाढलं आहे. वाढलेल्या आयुष्याचं नियोजन कसं करावं याचा विचारही ज्येष्ठांनी केलेला नसतो. त्यामुळे अनेक समस्या भेडसावतात.
या दृष्टीने या पुस्तकात ज्येष्ठांचे प्रश्न निर्माण होण्यामागची कारणं कोणती? वृध्दांच्या समस्यांवर काम करणार्‍या संस्था नक्की काय करतात? अशा प्रश्नांची चर्चा केली आहे. याशिवाय ‘वृध्दकल्याणशास्त्र’ या नवीन विद्याशाखेची ओळख करून दिली आहे. तसेच वृध्दनिवासाचे विविध पर्याय, वृध्दाश्रमांचे प्रकार व तेथील सोयी-सुविधांची माहितीही यात आहे.
वृध्दांच्या समस्या वृध्दांनीच सोडवाव्यात, त्यासाठी त्यांनी मानसिकता बदलावी व वृध्दकल्याणासाठी पुढाकार घ्यावा. म्हणजेच ‘आपल्यासाठी आपणच’ हा सर्वस्वी नवा विचार व सकारात्मक दृष्टिकोन या पुस्तकात लेखिकेने मांडला आहे.


175.00 Add to cart

हितगुजातून उलगडलेली वहिदा रेहमान

एका प्रतिभासंपन्न अभिनेत्रीचा चित्रपट व जीवनप्रवास तिच्याच शब्दांत


नसरीन मुन्नी कबीर
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर


प्रतिभा, आगळं सौंदर्य आणि व्यक्तिरेखा समजून घेऊन त्यात जीव ओतण्याची असामान्य क्षमता व बुध्दिमत्ता या बळावर वहिदा रेहमानने चित्रपटसृष्टीत आपलं विशेष स्थान निर्माण केलं. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात (१९५५-७५) गुरू दत्त, विजय आनंद ते सत्यजित राय यांसारख्या महान दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून तिने आव्हानात्मक भूमिका साकार केल्या आणि एकप्रकारे ती पर्यायी स्त्री-प्रतिमांसाठी अवकाश निर्माण करणारी अभिनेत्री ठरली. ‘प्यासा’, ‘गाइड’, ‘अभिजान’, ‘मुझे जीने दो’, ‘तीसरी कसम’, ‘खामोशी’ आदी चित्रपटांतील तिच्या सघन-सजीव व्यक्तिरेखा अविस्मरणीय व कायमस्वरूपी ठसा उमटवणार्‍या ठरल्या… आजकालच्या ‘रंग दे बसंती’ किंवा ‘दिल्ली-६’ पर्यंत तो ठसा कायम आहे.
‘आज फिर जीने की तमन्ना है’ म्हणत पडद्यावर स्त्री-स्वातंत्र्याचा उद्धोष करणारी ही अभिनेत्री पडद्यामागील जीवनाबाबत नेहमीच मितभाषी राहिली. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्रीला तिच्या भूमिकांबाबत, तिच्या व्यक्तित्वाबाबत आणि तिच्या जीवनप्रवासाबाबत बोलतं केलं आणि त्या बहुस्पर्शी संवादावर आधारित ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान’ हे इंग्रजी पुस्तक साकार केलं. त्याच इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी सिध्द केलेला हा मराठी अनुवाद- वहिदा रेहमान…हितगुजातून उलगडलेली!


295.00 Read more

सह्याद्रीचे वारे


[taxonomy_list name=”product_author” include=”456″]


माझा गेल्या तीस वर्षांचा जो अनुभव आहे त्यावरून मी असे पाहिले आहे की, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये थोडेच लोक असतात. बहुसंख्य जनता ही पक्षाच्या बाहेर असते, असे माझे स्वत:चे मत आहे. आणखी ती जनता काही अमक्याच एका पक्षाशी बांधली गेलेली असते असेही नाही. आपला मार्ग युक्त आहे आणि चांगला आहे, हे या जनतेला पटविण्याची जबाबदारी त्या त्या पक्षावर असते. जो पक्ष हे करतो तो राजकारणामध्ये यशस्वी होतो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि हाच अनुभव याच्यापुढेही राहणार आहे असे मी मानतो.”

-यशवंतराव चव्हाण


300.00 Add to cart

ऑफबीट भटकंती

पाच खंडांमधील विविध देशांतील दिलखुलास मुशाफिरी


जयप्रकाश प्रधान


जयप्रकाश प्रधान व त्यांच्या पत्नीने आत्तापर्यंत तब्बल ६४ देश पालथे घातले आहेत. मात्र केवळ ‘भोज्जा’ला शिवल्यासारखी त्यांची ही भटकंती नसते, तर काहीतरी वेगळं ठिकाण पाहणं, तिथली संस्कृती, रीतीरिवाज, खाणं-पिणं यांची ओळख करून घेणं याकडे त्यांचा ओढा असतो. त्यामुळे त्यांची ही भटकंती ‘टिपिकल’ न ठरता ‘ऑफबीट’ ठरते.
वैशिष्टयपूर्ण अशा ऑफबीट स्थळांची भटकंती करताना वाचकाला एका आगळया-वेगळया अनुभवाची प्रचीती येते. मग लेखकाने रंगवलेला ऑटम कलर्सचा रंगवर्षाव असो, अ‍ॅथाबास्का ग्लेशिअरवरचा अनुभवलेला थरार असो किंवा मती गुंग करणारा आउशवित्झ छळछावणीच्या भेटीतला हृदयद्रावक अनुभव असो! सर्वच प्रवासअनुभव वाचकाच्या मनाला भिडतात, एक अविस्मरणीय अनुभूती देतात. विशेष ऐकिवात नसलेली ठिकाणं उदा. नॉर्वेमधलं आइस हॉटेल, पोलंडमधील कवटया व हाडांनी सजवलेलं चर्च, व्हिएतनाममधील युध्दकाळात बांधलेली कुची टनेल्स, मेकाँग नदीतील सफर किंवा व्हिक्टोरिया फॉल्सचा अजस्त्र धबधबा…एका अद्भुत दुनियेची सफर घडवतात. या स्थळांची रंजक ओळख करून देत लेखक तिथे कसं जावं, कधी जावं याबाबतच्या उपयुक्त अशा व्यावहारिक टीप्सही देतात.
नेहमीच्याच गर्दीच्या पर्यटनस्थळांच्या प्रवासवर्णनांपेक्षा ‘ऑफबीट’ पर्यटनाचा रोमांचकारी आनंदानुभव देणारं पुस्तक… ऑफबीट भटकंती!



340.00 Add to cart

मनःपूर्वक खुशवंत

जीवन, मरण आणि त्या दरम्यान…


खुशवंत सिंग
अनुवाद : अभिजित थिटे


* `माझी एकच इच्छा आहे की, मला जेव्हा मृत्यू येईल, तेव्हा तो अगदी सहजतेने यावा. आपण जसं गाढ झोपून जातो ना, तसाच…’

* `मला वाटतं, कामुक विचार करणं, त्याची कल्पना करणं हेही अगदी स्वाभाविक आहे, त्यात गैर काही नाही.’

* `शेवटी जाण्याची वेळ झाली की खेद, दु:ख, कोणावरही राग न ठेवता जावं.’

निधनापूर्वी, वयाच्या ९५व्या वर्षी खुशवंत सिंग यांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकात त्यांनी सहजसोप्या आणि रोखठोक शैलीत त्यांचं खासगी आयुष्य, विवाह, प्रेम, सेक्स आणि त्यांचं लेखन व संपादनाचं काम यांविषयी ‘बिनधास्तपणे’ लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात ते प्रथमच त्यांचं यश आणि अपयश, क्षमता आणि मर्यादा यांबद्दल खुलेपणाने सांगतात.
आनंद, श्रध्दा, मृत्यू आणि धर्म यांसारख्या विषयांबाबत बोलताना ते चिंतनात्मक होतात; तर जातीयवाद, भारताचं राजकारण, दहशतवाद यांबद्दल बोलताना ते थेट आणि रोखठोक होतात. तसंच इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, लालकृष्ण अडवाणी अशा त्यांच्या स्नेह्यांबद्दलही ते कुठलीही भीडभाड न बाळगता लिहितात.
हे ललितलेखन करताना खुशवंत सिंग यांनी आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे वेगवेगळे कंगोरेही नोंदवले आहेत. त्यामुळेच मनापासून लिहिलेलं मन:पूर्वक खुशवंत वाचकांना नक्कीच भावेल…!


225.00 Add to cart

पर्यटन एक संजीवनी

अनुभव देश-विदेशातील भन्नाट भटकंतीचा…


डॉ. लिली जोशी


वैद्यकीय व्यवसाय करत असतानाच डॉ. लिली जोशी यांनी विलक्षण आंतरिक ओढीने प्रवासाचा छंद अनेक वर्षं जपला आहे. मात्र हा प्रवास म्हणजे ठरावीक पध्दतीने, ठरावीक ठिकाणीच केलेला प्रवास नव्हे. थोडी ‘हटके’ ठिकाणं पाहण्याकडे त्यांचा कल असतो. उदाहरणच द्यायचं झाल्यास गाडीने केलेली स्कॉटलंडमधली भटकंती, रेडवूडच्या जंगलातली सफारी, महाकाय व्हिक्टोरिया फॉल्सला दिलेली भेट… आणि ग्रीस व इजिप्तसारख्या लोकप्रिय तरीही वैशिष्टयपूर्ण ठिकाणी केलेलं पर्यटन… पुस्तकात असलेली अशी विविधता वाचकाला वेगळी अनुभूती देत खिळवून ठेवते.
मात्र हे पुस्तक म्हणजे केवळ प्रवासवर्णन नक्कीच नाही. पुस्तकातील ‘गुगल’ किंवा ‘हार्वर्ड स्कूल’सारख्या व्यावसायिक स्थळांच्या भेटीतील अनुभव, चीन किंवा दक्षिण आफ्रिकेच्या सहलीमधल्या अनुभवांची वर्णनं त्या त्या देशातील आर्थिक व सामाजिक पैलूंवरही प्रकाश टाकतात. याचबरोबर काला पत्थर, अन्नपूर्णा बेसकँप, योसेमिटी इ. ट्रेकमधले थरारक अनुभव अंगावर अक्षरश: काटा उभा करतात. या अनुभवांबरोबरच लेखिकेने एक डॉक्टर म्हणून पर्यटनासाठी लागणाऱ्या फिटनेसबाबतही पुस्तकात चर्चा केली आहे.
पर्यटनातील अनुभव आपलं आयुष्य अनेक प्रकारे समृध्द करतात. नवनवीन भटकंती रोजच्या आयुष्यातला तोचतोचपणा नाहीसा करून नवा जोम, नवा उत्साह निर्माण करते. थोडक्यात काय तर, पर्यटन म्हणजे आयुष्यातला तेजस्वी सूर्यप्रकाश, चेतना देणारी संजीवनी… अर्थात् पर्यटन एक संजीवनी!




200.00 Add to cart

अमावास्येचा पूर्णचंद्र

अर्थात ग्रहण भ्रमण


श्रीकांत लागू


अमावस्येचा पूर्णचंद्र म्हणजे देशा-विदेशातील विविध छटांमधील ग्रहणं बघण्यासाठी केलेली मनसोक्त भटकंती ! पुस्तकाचे लेखक श्रीकांत लागू यांनी पहिलं सूर्यग्रहण बघितलं होतं- वयाच्या आठव्या – नवव्या वर्षी. त्या वेळी निर्माण झालेल्या कुतूहलापोटी पुढील आयुष्यात लागूंनी अक्षरशः झपाटल्याप्रमाणे अनेक ठिकाणी जाऊन ग्रहणं अनुभवली. त्यांच्या दृष्टीने ग्रहण म्हणजे आकाशात घडणारं अद्भुत नाट्य. ते पाहून डोळ्याचं पारणं फिटतं पण मन मात्र भरत नाही. हुबळी, डायमंड हार्बर, कच्छ, झांबिया, द. आफ्रिका, टर्की, चीन, रामेश्वरम् अशा देश- देशातील अनेक ठिकाणी त्यांनी खग्रास सूर्यग्रहणाचा जणू पाठलागच केला! ते स्वत : खगोलशास्त्रज्ञ नाहीत किंवा अंतराळशास्त्रज्ञही नाहीत. तरीही एखाद्या निरागस पण जिज्ञासू वृत्तीच्या मुलाप्रमाणे ते ग्रहणाचं रोमांचपूर्ण वर्णन करतात. ग्रहणाच्या पहिल्या स्पर्शापासून ते ग्रहण सुटेपर्यंतच्या काळाचं वर्णन वाचताना वाचकाला स्वत: ग्रहण अनुभवत असल्याचा आनंद देऊन जातात. लागू देश-विदेशात भरपूर फिरले, मात्र नेहमीच्या पठडीतील पर्यटनासाठी म्हणून ते फिरले नाहीत. त्यांची भटकंती झाली ती कधी जलतरणस्पर्धेच्या निमित्ताने तर कधी नाट्यप्रयोगांसाठी, कधी कैलास-मानससरोवराची प्रदक्षिणा करायला, कधी एव्हरेस्ट बेसकँप सर करण्यासाठी तर कधी अद्भुत शांततेने आणि केवळ बर्फाने आच्छादलेला सातवा खंड – ‘अंटार्टिका’ अनुभवण्यासाठी मात्र या पुस्तकातील भटकंती आहे ती फक्त आणि फक्त ग्रहणं बघण्यासाठीची…



125.00 Add to cart

यशवंतराव चव्हाण संच

३ बहुमोल पुस्तकांचा संच


यशवंतराव चव्हाण


महाराष्ट्राच्या लोकप्रिय सुपुत्राचा परिचय, त्यांनी केलेल्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची माहिती आजच्या पिढीला विशेषत: तरुणांना व्हावी या दृष्टीने यशवंतरावांच्याच लेखणीतून साकार झालेली तीन पुस्तकं- ‘कृष्णाकांठ’, ‘भूमिका’ व ‘ॠणानुबंध’ रोहन प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित करण्यात आली आहेत.
कृष्णाकांठ म्हणजे यशवंतरावांचा बालपणापासून त्यांच्या राजकीय जडणघडणीपर्यंतचा लक्षवेधक प्रवास! त्यांचं बालपण, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग, पहिला तुरुंगवास, त्यांचं वकिलीचं शिक्षण, वेणूताईंबरोबरची विवाहगाठ आणि राजकारणातील त्यांचा प्रवेश अशा रोमांचक आणि प्रेरणादायी अनुभवांचा पट यशवंतराव त्यांच्या सहज-सुंदर शैलीतून कृष्णाकांठद्वारे उलगडतात.
‘भूमिका’ हे पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या कारकिर्दीचं पुढचं पर्व म्हणता येईल. यशवंतरावांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीचे विचार या पुस्तकातील विविध लेखांतून वाचायला मिळतात.
यशवंतरावांचा चिंतनाचा प्रमुख विषय जरी राजकारण हा असला तरी गतकाळाकडे वळून बघताना वैयक्तिक जीवनातील काही आठवणी, व्यक्ती व प्रसंग त्यांच्या मनात घर करून राहिले होते. काही जवळची माणसं, स्थळं, भावना व विचार यांच्याशी यशवंतरावांचा एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्या साऱ्याचं ओघवतं शब्दांकन म्हणजे ‘ऋणानुबंध’ हे पुस्तक!


800.00 Add to cart

जेष्ठांसाठी ४ गोष्टी युक्तीच्या

कुटुंबातील सामंजस्याकरता…


[taxonomy_list name=”product_author” include=”435″]


आज बदललेल्या जीवनशैलीमुळे एकत्र कुटुंबाचं विभाजन होऊन विभक्त कुटुंबांचं प्रमाण वाढलं आहे. कोणाला वेळ द्यायला किंवा कोणाचा वेळ घ्यायलाही आपल्याकडे फुरसत नसते. तरीही, बरीच कुटुंबं अशी आहेत जी गुण्यागोविंदाने एकत्र राहाता आहेत, एकमेकांशी संवाद ठेवून आहेत. अशा एकत्र कुटुंबातील ज्येष्ठांसाठी भा. ल. महाबळ काही बोलक्या व्यक्तिरेखांमधून व प्रसंगांतून नात्यात जाणवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नकळत मार्गदर्शन करून जातात. घरात सशक्त व आनंदी वातावरण निर्माण व्हावं यासाठी घरातील सदस्य — विशेषत: ज्येष्ठ व्यक्ती विधायक व परिपक्व भूमिका बजावू शकतात. कुटुंबातील प्रत्येकाने विचारपूर्वक कृती केल्या व दुसऱ्याचा विचार केला तर कुटुंब कसं सुखी व समाधानी राहू शकतं हे लेखक विविध लेखांमधून पटवून देतात.

नुसतं वयाने ‘ज्येष्ठ’ न राहता वागण्यातून ‘ज्येष्ठ’ होण्यासाठी ज्येष्ठांसाठी चार गोष्टी युक्तीच्या….


140.00 Read more

सुरुवात एका सुरुवातीची

वेडीबाभळीपासून वीजनिर्मितीचा यशस्वी प्रयोग… या प्रयोगाची चित्तवेधक कथा!


प्रफुल्ल कदम


तसं पाहिलं तर हे पुस्तक नाही, एक प्रयोग आहे. या प्रयोगासाठी प्रयोगशाळा कशी सिद्ध केली गेली याचं ते आत्मचरित्रात्मक निवेदन आहे. बहुतेक आत्मचरित्रांमध्ये ‘आत्म’ म्हणजे ‘मी’ महत्त्वाची भूमिका बजावत असतो. परंतु प्रफुल्ल कदम यांच्या आत्मचरित्रात मुख्य भूमिका आहे ‘वेडीबाभळीची’. त्या नायिकेचा म्हणजे वेडयाबाभळीचा परिसर आहे ग्रामीण महाराष्ट्राचा. मात्र प्रयोग आहे जागतिक स्तरावर परिणाम घडविणारा. या आत्मचरित्राला उद्दिष्ट आहे ऊर्जाक्रांतीचे – जी जलक्रांती व कृषीक्रांती समवेतच साध्य होऊ शकते… …पूर्णपणे प्रतिकूल वातावरणातही प्रयोग करण्यासाठी लागते दुर्दम्य जिद्द. जिद्दीला भांडवल लागत नाही. उद्दिष्ट निश्चित असेल, विचार पक्का असेल आणि जिद्द असेल तर सर्व अडचणींवर मात करता येते. अगदी नकारात्मक विचार करणार्‍यांचा विरोधही मोडून काढता येतो आणि मतलबी मंडळींचे खेळही थोपविता येतात. खरं म्हणजे महाराष्ट्रात हजारो तरुण असे आहेत की ज्यांना काहीतरी करायचं आहे, परंतु दिशा नाही, कार्यक्रम नाही वा मार्गदर्शन नाही. त्यांना हे पुस्तक एक ‘गाईड’ ठरेल. -कुमार केतकर


120.00 Add to cart

आऊट ऑफ द बॉक्स

क्रिकेट: भावलेलं, दिसलेलं आणि त्या पलीकडचं


हर्षा भोगले
अनुवाद : चंद्रशेखर कुलकर्णी


स्वतःचं स्वप्न साकार करू पाहणार्‍या काही वाचकांना या पुस्तकातून निश्‍चितच एक दिशा आणि प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहेच, पण आपापल्या क्षेत्रात नेतृत्व कसं करावं आणि व्यावसायिक आयुष्यात आंतरराष्ट्रीय दर्जा कसा अंगी बाणवावा, याचेही काही मंत्र मिळून जातील.
— सचिन तेंडुलकर
टेलिव्हिजनच्या पडद्यावर जे दिसत असतं त्यापेक्षाही खूप काही तो तिथूनच आपल्याला दाखवतो. त्याने लेखणी चालवली तर कॉमेंण्ट्री बॉक्समधून त्याने जे सांगितलं त्याच्या कितीतरी पुढे तो आपल्याला घेऊन जातो. कॅमेर्‍याच्या साक्षीने उलगडणारी गोष्ट त्याच वेळी प्रभावीपणे सांगणं आणि त्याच कथानकावर वृत्तपत्रात लिहिताना चार पावलं पुढे जाऊन वेगळाच दृष्टान्त देणं या दोन्ही क्षमता असणारी माणसं भारतीय माध्यमांमध्ये फारच थोडी आहेत. हर्षा भोगलेचं वेगळेपण नेमकं यातच आहे.
— शेखर गुप्ता
खेळाबाबत प्रेम आणि ज्ञान यांच्या अपूर्व संगमाचे स्पष्ट प्रतिबिंब हर्षाच्या शैलीदार लिखाणात दिसते.


195.00 Add to cart

लंडननामा

जडणघडण पहिल्या ‘ग्लोबल सिटी’ची


सुलक्षणा महाजन


लंडनमध्ये व्यापार -उद्योग वाढले. ऐश्‍वर्याला गगन ठेंगणं झालं आणि त्याबरोबर गुन्हेगारीही फोफावली. खून, मारामार्‍या, रोगराई, दारिद्र्य सर्व काही एकत्र नांदू लागलं. बघता बघता लंडन बकाल होत गेलं. मात्र नंतर दूरदृष्टीच्या व्यक्तींनी व संस्थांनी याच लंडनचा कायापालट केला आणि ते बनलं एक सर्वांगसुंदर महानगर…
पहिलं ‘जागतिक महानगर’!
मानवी सर्जनशीलता, बुध्दी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान म्हणजेच आजचं लंडन. लंडनचा हा प्रवास थोडाथोडका नव्हे, तर २००० वर्षांचा आहे. या पहिल्या ‘ग्लोबल सिटी’ च्या जडणघडणीची, चढ-उतारांची सुरस कथा म्हणजेच…
‘लंडननामा!’



350.00 Add to cart

वॉर्ड नंबर पाच, केईएम

डॉ. रवी बापट

सुनीती जैन


ही सारी कहाणी आहे केईएम हॉस्पिटलमधील ‘वॉर्ड नंबर पाचची’. वैद्यकीय व्यवसायात असताना डॉ.बापट यांना आलेले अनुभव, उपचारादरम्यान भेटलेले विविध प्रकारचे रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज…
डॉक्टरने रुग्णाकडे केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि पुस्तकी ज्ञानातून पाहणं पुरेसं नाही. रुग्णाचं मन, त्याचा स्वभाव, त्याच्या भोवतालचं वातावरण हे समजून घेवून त्यांच्याशी संवाद साधून मगच उपचार करणं डॉ.बापट यांना गरजेचं वाटलं. शरद पवार ते सतीश राजे, दादा कोंडके ते दत्तू मिस्त्री, रुग्ण कुणीही असो त्याची पत-प्रतिष्ठा न पाहता शल्यचिकित्सक डॉक्टर बापटांनी सारख्याच आपुलकीने उपचार केले. अशा सर्व अनुभवांविषयी…



395.00 Add to cart

माझ्या विद्यार्थी मित्रांनो (Hard Bound)

स्व.यशवंतराव चव्हाण यांची दीक्षान्त समारंभातील भाषणे


[taxonomy_list name=”product_author” include=”456″]


मुत्सद्दी राजकारणी, विचारवंत आणि एक रसिक व्यक्तिमत्त्व म्हणून चिरपरिचित असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते देशभरातील विविध विद्यापीठांचे दीक्षान्त समारंभ संपन्न झाले. तेथे केलेल्या शिक्षणाविषयीच्या चिंतनशील भाषणांचं संपादित पुस्तक म्हणजेच – `माझ्या विद्यार्थी-मित्रांनो…’
या पुस्तकातली सगळी भाषणं यशवंतरावांनी उच्च शिक्षण देणारया विद्यापीठांमध्ये दिलेली असली, तरीही त्यात ते प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व ठळकपणे अधोरेखित करतात. शिक्षणाचा हेतू व्यक्तीचा विकास करणं एवढाच मर्यादित नसून त्यातून समाजाचाही विकास व्हायला हवा, ही त्यांची धारणा ते यात मांडतात. म्हणूनच समाजाच्या फार मोठ्या विभागाला शिक्षणाची गरज असल्याचं प्रतिपादन ते वेळोवेळी करतात, जे आजघडीलाही तितकंच लागू होतं.
शहरी व ग्रामीण शिक्षणातील तफावत, विकसित देशांसोबत जाण्यासाठी आवश्यक असणारे आधुनिक शिक्षण, उच्च शिक्षण घेतलेल्यांची समाजाप्रति असणारी जबाबदारी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांची मांडणी यशवंतराव एखाद्या कसलेल्या शिक्षणतज्ज्ञाप्रमाणे करतात. विशेष म्हणजे ही मांडणी करताना स्नातक अर्थात नव-पदवीधरांविषयी म्हणजेच देशाच्या तरुण उच्चशिक्षित पिढीविषयी त्यांना वाटणारं प्रेम आणि आशावाद त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होताना दिसतो.


395.00 Add to cart
1 3 4