प्रतिदिनी एक सुविचार
प्रत्येक दिवशी एकच सुविचार आत्मसात करा आणि त्या सुविचारानुसार आचरण करा. ही पुस्तिका आकाराने लहान असल्यामुळे प्रवासात, गाडीमध्ये सहजपणे वाचता येईल.

देश-विदेशांतील थोरामोठ्यांची संस्कारक्षम वचने
पुरातन काळापासून जगाच्या पाठीवरील विचारवंतांनी व बुद्धिवंतांनी वेळोवेळी अनेक विषयांवर मौलिक विचार वा भाष्य व्यक्त केलेले आहे. स्थळ, काळ अशा बंधनांच्या पलीकडचे असे सर्वव्यापी असणारे हे विचार नेहमीच प्रत्येकाच्या जीवनात मार्गदर्शी ठरतात. या पुस्तकात अशी निवडक सुविचार-सुवचने; ज्ञान, कार्य-कर्तृत्व-कष्ट, निसर्ग, देश, समाज, ध्येय, व्यक्तिमत्त्व, आचरण, मन, आरोग्य, धर्म-ईश्वर इ. विभागात संकलित केली आहेत. उत्तम जीवनमूल्ये सांगणारी देश-विदेशांतील थोरा-मोठ्यांची ही मौलिक सुवचने सर्व वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त ठरतील. विद्यार्थी, शिक्षक यांना तर हे पुस्तक बहुमोल ठरणारे असे आहे.

‘सुविचार’ म्हटल्यानंतर संस्कृत भाषेपुरतेच क्षेत्र मर्यादित करणे योग्य झाले नसते. ‘माझा मराठाचि बोलु कौतुके। परी अमृतातेही पैजा जिंके’ असे सार्थ अभिमानाने म्हणणारे ज्ञानेश्वर त्याचप्रमाणे भागवत धर्माचा कळस मानला गेलेला, मराठी भाषेचा जन-कवी तुकाराम, पौरुषाचे स्त्रोत असणारे समर्थ रामदास, यांसारख्या संत कवींच्या वेचक सुवचनांबरोबर मोरोपंत, वामन पंडित, यांसारख्या पंत कवींच्या सूक्तीही या छोटेखानी पुस्तकात आढळतील. संस्कृत वाडमयाचीच नव्हे तर मराठी सारस्वतातील निवडक सुवचनांची गंगा ही सर्वसामान्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने हा संग्रह सादर केलेला आहे.