मिशन इंडिया

तरुणांसाठी विकसित भारत एक ध्येय



सहलेखक :
यज्ञस्वामी सुंदर राजन यांचा जन्म १९४३ साली झाला असून ते 'कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री'चे मुख्य सल्लागार आणि 'बिट्स पिलानी' येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी ते पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते. उपग्रह कार्यक्रम, मॅपिंग सिस्टिम्स, उपग्रह हवामानशास्त्र आदी गोष्टींकरता ते इस्रोशीदेखील सलंग्न होते.

अनुवाद :
मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.


भारत देश बदलण्याची ताकद भारतातल्या
तरुण पिढीत आहे, तीच भारताचं आशास्थान आहे.

तरुणांचे लाडके गुरू डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक नागरिकापुढे – खासकरून तरुण पिढीपुढे एक मौलिक ध्येय ठेवलं आहे ते म्हणजे, `मिशन इंडिया’चं – विकसित राष्ट्र म्हणून भारताची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावण्याचं, आपलं मानाचं स्थान निर्माण करण्याचं!
हे ध्येय साध्य करण्यासाठी कलाम यांनी विकसित देश म्हणजे काय, त्यांची लक्षणं, त्यांची अर्थव्यवस्था आणि भारताची सद्य:स्थिती यांबद्दल तपशीलवार विवेचन पुस्तकात केलं आहे. तसंच भारत विकसित देश व्हावा यासाठी आपण शेती, रसायन उद्योग आणि बायोटेक्नॉलॉजी, उत्पादननिर्मिती उद्योग, संरक्षण, सेवा क्षेत्र आणि शिक्षण व्यवस्था आदी क्षेत्रांमध्ये कशी प्रगती केली पाहिजे, त्यासाठी भविष्यात कोणती पावलं उचलली पाहिजेत याचा सहजसोप्या शब्दांत उदाहरणासह यात ऊहापोह केला आहे.
भारताच्या भविष्यकालीन विकासाच्या दिशेचं भान देणारं… सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणारं आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यास प्रेरणा देणारं पुस्तक…मिशन इंडिया !


140.00 Add to cart