आनंदस्वर ज्येष्ठांसाठी

चैतन्यमयी सेकंड इंनिंगसाठी सहज सोपं मार्गदर्शन


डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी पीएच.डी. (पुणे विद्यापीठ), जाहिरातकलेतील एम.फिल, बी.कॉम एम.कॉम., बॅचलर ऑफ जर्नालिझम, डिप्लोमा इन जेरोन्टोलॉजी (टाटा सामाजिक विज्ञान संस्था), डिप्लोमा इन हायर एज्युकेशन ही शैक्षणिक अहर्ता प्राप्त केली आहे. ‘सनवल्र्ड सोसायटी फॉर सोशल सव्र्हिस’ या संस्थेच्या त्या संस्थापक असून त्यांना ३५ वर्षे अध्यापनाचा अनुभव आहे. त्या सध्या एम.आय.टी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत. त्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांच्या आयोजनामध्ये सहभाग असून त्या प्रभाकर पाध्ये, कमल पाध्ये ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला त्यामुळे त्यांना शेतीची आवड असून त्या सध्या शेती करतात. त्यांनी ‘मिळून साऱ्याजणी’, ‘हंस’, ‘नवल’ इ. नियतकालिकांमधून कथा व ललित लेखन केले आहे. त्यांना स्वतंत्रपणे भटकंती, वाचन, शास्त्रीय संगीताची आवड आहे. त्यांना २०१६चा टाईम्स ऑफ इंडिया समुहाचा ‘प्रमाण सिनियर्स' पुरस्कार तसंच, २०१६चा अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संघटनेचा ‘वात्सल्य' पुरस्कार मिळाला आहे. डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी वृद्धकल्याणशास्त्र या वृद्धांशी संबंधित असणाऱ्या विषयावर संशोधन करून पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. ‘वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेले प्रश्न अतिशय गुंतागुंतीचे आहेत. ते सोडवण्यासाठी ज्येष्ठांनी ‘आपल्यासाठी आपणच’ या तत्त्वाचा स्वीकार करणं आवश्यक आहे’, अशा अगदी वेगळ्या विचारांच्या त्या पुरस्कर्त्या आहेत. सनवर्ल्ड फॉर सिनियर्सच्या माध्यमाद्वारे परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण एकांकिका स्पर्धा आणि व्याख्याने आयोजित करून या तत्त्वाचा त्या अत्यंत तळमळीने प्रसार करतात.

आयुष्याची ‘पहिली इनिंग’ खेळून झाली आहे… जबाबदाऱ्या, कर्तव्यं पार पाडून झाली आहेत. केलेले, झालेले, दिलेले असे सगळे हिशोबही करून झाले आहेत. आता खूप सारा वेळ आहे. आयुष्याच्या संध्याकाळी डोळ्यासमोरून पुर्वायुष्य जातं, आणि जाणवतं… प्रेमाची, हक्काची माणसं जवळ नाहीत किंवा जवळ असूनही नसल्यासारखीच…
मग ‘दुसरी इनिंग’ खेळण्यासाठी खऱ्या अर्थाने आपणच उरतो आपल्यासाठी!
ज्येष्ठत्वाकडे नेणारा हा प्रवास आता सुरू होतो आहे याची जाणीव करून देत, आयुष्याच्या या ‘सेकंड इनिंग’ची सुरुवात किती ‘चैतन्यमयी’ होऊ शकते याचा प्रत्यय देणारं हे पुस्तक आहे. ही ‘सेकंड इनिंग’ सकारात्मकरित्या जगून अर्थपूर्ण कशी करता येईल याबद्दल अत्यंत सहज-सोप्या पद्धतीने
मार्गदर्शन यात मिळतं.
उतारवयातल्या विविध आजारांविषयीची थोडक्यात माहिती, वृद्धकल्याणशास्त्र या अभ्यासाच्या नव्या शाखेचा परिचय, इच्छापत्र व मृत्यूपत्राबद्दलचे समज-गैरसमज, वृद्धाश्रमांची माहिती अशा अनेक कळीच्या विषयांवर लेखिका छोट्या सुटसुटीत लेखांमधून संवाद साधते.
आजकाल आयुर्मान वाढतं आहे आणि त्याला जोडून येणारे मानसिक, शारीरिक क्लेशही वाढत आहेत… मात्र यावर मात करून आयुष्याची ही ‘सेकंड इनिंग’ समृद्ध करता येते… ती कशी करावी याचा तालबद्ध मंत्र देणारं पुस्तक…आनंदस्वर ज्येष्ठांसाठी!


100.00 Add to cart