अमेरिकेतून प्रकाशित होणारा पहिलावहिला जागतिक दिवाळी अंक.
‘आंतरराष्ट्रीय कथास्पर्धा’ हे आमच्या अंकाचे खास वैशिष्ट्य आहे. या कथास्पर्धेसाठी महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून सर्जनशील लेखक कथा पाठवतात. प्रतिभाशाली आणि मान्यवर परीक्षक त्यांमधून छापण्याकरता पहिल्या तीन क्रमांकांसाठी सर्वोत्तम कथा निवडतात.
‘अंक निनाद’ ही लेखनाची आणि वाचनाचीही एक प्रयोगशाळा आहे. साहित्यप्रकार व विषय यांच्यातील वैविध्य हे या अंकाचे बलस्थान! यंदाच्या अंकात वाचा अमेरिकेतील मराठी माणसांच्या वेगळ्या वाटा.
अमेरिकेतून प्रकाशित होणारा पहिलावहिला जागतिक दिवाळी अंक.
‘आंतरराष्ट्रीय कथास्पर्धा’ हे आमच्या अंकाचे खास वैशिष्ट्य आहे. या कथास्पर्धेसाठी महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून सर्जनशील लेखक कथा पाठवतात. प्रतिभाशाली आणि मान्यवर परीक्षक त्यांमधून छापण्याकरता पहिल्या तीन क्रमांकांसाठी सर्वोत्तम कथा निवडतात.
‘अंक निनाद’ ही लेखनाची आणि वाचनाचीही एक प्रयोगशाळा आहे. साहित्यप्रकार व विषय यांच्यातील वैविध्य हे या अंकाचे बलस्थान! यंदाच्या अंकात वाचा अमेरिकेतील मराठी माणसांच्या वेगळ्या वाटा.
‘….प्रत्येक गावात काही आख्यायिका आणि दंतकथा असतात . एक लेखक म्हणून या आख्यायिका मला भुरळ पाडतात . कोणताही लेखक त्याच्या कानावर पडलेल्या आख्यायिका निव्वळ कपोलकल्पित प्रदेशात राहू देत नाही . कधी चिमूटभर आशयाच्या सूतावरून कल्पनेचा स्वर्ग गाठत , तर कधी आशयाच्या स्वर्गात कल्पनेचं सूत कातत या आख्यायिकांना लेखक कागदावर उतरवत राहतो . कधी कल्पनेतल्या माणसांना तो खरेखुरे सदरे चढवतो . तर कधी खऱ्या मानवी स्वभावांना लेखक कल्पित नियती देतो . नाव , गाव , देश , वेष बदलत ही माणसं , या आख्यायिका मग सर्वदूर पसरत जातात आणि चिरायू होतात . ” गोठण्यातल्या गोष्टी’तली ही माणसं खरी असली नसली तरीही जन्मापासून ही माणसं माझ्यासोबत आहेत . या माणसांना आदि – अंत नाही.
या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे यात भरपूर फालतूपणा केलेला असतो . शब्दांचे खेळ , गद्य – पद्य विडंबनं , उगाचच केलेल्या कोट्या असतात . काहीवेळा तर कोट्या ‘ करायच्या म्हणून ओढूनताणून केलेल्या असतात . हे सारं करत असताना लेखक आपल्याकडे पाहून डोळा मारून जणू आपल्याला म्हणत असतो , ” बघा मी कसा फालतूपणा केलाय . हा खरा बावळटपणा नसतो . हे लक्षात येण्यासाठी वाचकही तसाच ‘ चतुर ‘ हवा . तसा नसेल तर त्याची चिडचिड होईल . ‘ हा काय आचरटपणा आहे ? ‘ असं तो डोक्यावरचे केस उपटत विचारील अशा विनोदी लेखनाच्या वाट्याला हा वाचक आला तर लेखकानं काशीत जाऊन प्रायश्चित्त घ्यावं.
तेव्हा एक सावधगिरीची सूचना अर्थात वैधानिक इशारा : तुम्ही दुसऱ्या प्रकारातले म्हणजे ‘ असली ‘ वाचक असाल तर आणि तरच या पुस्तकाच्या वाट्याला जा . पहिल्या प्रकारचे वाचक असाल तर त्यांना टोकाचे आत्मक्लेश सोसावे लागतील त्या क्लेशांतून आनुषंगिक मेंदूविषयक आजार उद्भवले तर त्यांना लेखक – प्रकाशक – मुद्रक जबाबदार असणार नाहीत.
डॉ. गंधे यांचा प्रस्तुत ग्रंथ म्हणजे समीक्षास्वरांची रंगलेली एक सुंदर बैठक होय. या बैठकीमुळे समीक्षेमध्ये स्वारस्य असणारा वाचक ज्ञानसंपन्न होईलच. त्याचबरोबर ह्या आगळ्यावेगळ्या वाटेच्या समीक्षेमुळे तो प्रमुदितही होईल. याचे कारण स्वतः डॉ. गंधे यांची समीक्षालेखनाची बैठक काहीशी अपारंपरिक आहे. डॉ. गंधे यांना समीक्षाविषय सुचतात आणि त्या विषयाची मांडणी मात्र ते खूप विचार करून स्वतःची संशोधितात. याच्या परिणामी डॉ. गंधे यांचा प्रस्तुत ‘साहित्य : अभिजात आणि लोकप्रिय’ हा ग्रंथ आगळावेगळा झालेला आहे. म्हणूनच समीक्षेच्या नव्या अभ्यासकांनी तो मन:पूर्वक वाचून जाणून घ्यावा अशी माझी शिफारस आहे. डॉ. द. दि. पुंडे
‘‘अनेकदा जे समीक्षकीय लेखन समोर येतं ते तांत्रिक, कोरडं आणि संज्ञांच्या जंजाळात अडकलेलं असं असतं. शास्त्रीय लेखन हे नेहमीच तांत्रिक असतं. ते ती विद्याशाखा सोडून पटकन सगळ्यांना कळेल किंवा कळावं अशी अपेक्षाही काहीशी अवास्तव असते. भाषाशास्त्रीय समीक्षा ही तशी असते. त्यात काही मुळात चूक आहे असं नाही. चुकतं हे की, अशी समीक्षा लिहिणं आणि वाचणं हे अभ्यासाचं सोडून साहित्य-व्यासंग मिरवण्याचं ठिकाण बनतं. मग उगाच अस्तित्ववाद वगैरे शब्द गप्पांमध्ये घुसले-घुसवले जातात. त्या शब्दांचा किंवा संकल्पनांचा काही दोष नसतो. ते शब्द आढ्यतेने वापरणाऱ्या लेखकांमुळे सर्वसामान्य वाचकांपासून अपरिचित राहतात. प्रत्येक भाषेत मोजके पण चांगले, उमदे समीक्षक असतात ज्यांची भाषा संज्ञायुक्त असली तरी शब्दबंबाळ नसते. ती वाचकाला परकं करत नाही, खुजं ठरवत नाही… `वा!’ म्हणताना हे पुस्तक या धारेवर तर आहेच, पण त्यापुढे जाऊन मी म्हणेन की, माहितीच्या विस्फोटाच्या काळात मला वाचक हा नुसता पॅसिव्ह भागीदार नव्हे, तर सह-सर्जकही वाटतो. समीक्षालेखन करताना तुम्ही वाचक हे मित्र-सुहृद बनून माझ्या डोळ्यांपुढे येत असता…’
– डॉ. आशुतोष जावडेकर
साहित्याचा मनापासून आस्वाद घेणारा आणि तो घेताना तुम्हालाही ‘वा!’ अशी दाद द्यायला लावणारा समीक्षा-लेखसंग्रह `वा!’ म्हणताना…
दैनंदिन चीजवस्तूंचा उगमापासून आजपर्यंतचा कुतूहलजनक प्रवास
अरुण टिकेकर
‘‘वाचक या पुस्तकात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो,’ असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो.
दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबद्ध माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेंमधील आवश्यक संदर्भही पुरवतात….
या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात….”
मनमोहन सिंग यांच्या काळातला ‘कोळसा-घोटाळा’ असो, की मोदींच्या जनधन-योजना, स्वच्छता मोहिमा, परदेशवाऱ्या असोत, किंवा संघाची खिल्ली
उडवणाऱ्या शरद पवार यांची भाजपशी अधूनमधून केलेली सलगी असो… गणेशोत्सवाचं बदलणारं स्वरूप असो की संजय दत्तला कारावासात मिळणाऱ्या
सवलती असोत… तंबी दुराई त्याचा तिरकस नजरेचा चष्मा लावणारचं ! मग त्याचा तल्लख मेंदू कामाला लागणार आणि त्या चष्म्यातून अशा प्रसंगांतील
विसंगती हुडकून काढणार. त्या विसंगतींवर बुद्धिनिष्ठ विनोदाचं आवरण चढवून आपल्यापर्यंत त्या ‘दीड-दमडी’तून पोचवणार !
या दीड-दमडीत कल्पनाविलासाचं माध्यम विविधप्रकारे वापरलं जातं… काल्पनिक प्रसंग निर्माण करून त्यात विनोदनिर्मितीची अजोड ताकद असलेल्या
संवादांची चपखल पेरणी होते, विविध भाषा, विविध बोली दावणीला बांधल्या जातात, तर कधी काव्य-अभंग-ओवी-वग असे साहित्यप्रकार ढंगदारपणे पेश होतात, तर कधी ‘पत्र-व्यवहारा’तून तिरकस बाण सोडले जातात. तंबी दुराईचं ‘मोनोटनी’शी वावडं असल्यामुळे तो विविध प्रयोग करतो…एकाचएक शैलीत अडकत नाही.
राजकारण, समाजकारण, साहित्य-संस्कृती क्षेत्रांत घडणाऱ्या प्रसंगांतील विसंगतींना उघडं पाडत नकळतपणे उपरोधिक भाष्य करायचं आणि तेही उच्च दर्जाची विनोदनिर्मिती साधून… ही या तंबी दुराईची खासियत !
हे लिखाण हसवत हसवत अंतर्मुख कधी करतं, विचारप्रवृत्त कधी करतं, नव्या जाणीवा कधी करून देतं हे कळतही नाही आणि म्हणूनच ही आहे रंजन करणारी, प्रबोधन करणारी आणि त्यासोबत बौद्धिक आनंद देणारी… अर्थात श्रीमंत करणारी दीड-दमडी!
वसुमती धुरू यांची पाककलानिपुण आहारशास्त्रज्ञ ही ओळख आता जुनी झाली आहे . सजग नजरेने आसपासच्या समाजात वावरणाऱ्या एक ज्येष्ठ नागरिक म्हणून दादरची माणसे त्यांना ओळखतात …. एका विशिष्ट भौगोलिक परिसरातील काही स्त्रियांच्या जीवनाची ही रेखाटने आहेत . आठवणी आहेत . त्यात स्मरणरंजनाचाही भाग आहे ; पण लेखिका स्मरणरंजनात फार रमणारी नाही . या पुस्तकात भेटणाऱ्या स्त्रिया तशा सामान्य आहेत , तरीही परिस्थितीवर स्वार होणाऱ्या आहेत … लेखिकेला बदलत्या काळाची , बदलत्या मूल्यांची जाणीव आहे . ती निवेदनात व्यक्तही झाली आहे . कधी स्त्रियांकडून केल्या जाणाऱ्या परस्परविरोधी अपेक्षांमधील विनोदही निवेदिकेला जाणवतो … दादरमध्ये अनेकांच्या परिचयाच्या असलेल्या प्रभावती बापटाचे व्यक्तिचित्र आणि ‘ पूरणसाव ‘ हे वेगळे व्यक्तिचित्र वाचत असताना लेखिकेची स्वत : ला प्रश्न विचारण्याची ताकद लक्षात येते . ‘ त्यांच्या शेवटच्या इच्छा’मध्ये अंत्यसंस्कारांविषयीचे पुरोगामी विचार , अनेक व्रतस्थ माणसांचे अखेरच्या दिवसात तोल जाणे याची चिकित्सा हे लेखनातील प्रगल्भ आविष्कार आहेत . तसेच प्रेमलग्ने कशी होतात आकर्षण म्हणजे काय ? हे किशोरवयीन मुलामुलींचे प्रश्नही आले आहेत . ‘ कोणासारखी होशी गं मुली ? ‘ सारख्या नर्मविनोदी कथेतील वटसावित्रिचे व्रत गमतीचे आहे .. दादरमधील त्या काळातल्या जीवनाचे चित्र रेखाटताना स्मरणरंजनाच्या सहजप्रेरणेला आवर घालत हे लेखन केले आहे . त्यातील तपशील मोलाचा आहे , पण त्यापलिकडे लेखिकेचा दृष्टिकोन अधिक मोलाचा आहे . – पुष्पा भावे ( प्रस्तावनेतून
चार पावलं बरोबर चाललं की मैत्री होत नाही . एकमेकांच्या आयुष्यात चौकसपणे न डोकावता , सहजस्फूर्तपणे जे जाणवतं त्यात मैत्रीची बीजं असतात . न विचारता बोलायला , न सांगता ऐकायला कधी सुरुवात होते , एकमेकानां समजून घेताना मैत्री केव्हा जुळते कळतच नाही . दीर्घकाळ सहवासात राहता येतच अस नाही . परंतु सहवासाचे ते क्षण जेव्हा स्मृतीत घर करून राहतात , तेव्हा जीवाभावाची मैत्री जडते . लेखिकेच्या या ‘ सहेल्या तशा सामान्यातील असामान्य . आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर जेव्हा चौकट विस्कटते , तेव्हा चौकटीबाहेरचे निर्णय घेण्याचे धाडस त्या दाखवतात , त्यातील वेगळेपण पेलून आयुष्य जगतात . हे वेगळेपण पेलणं त्यांना सोपं जातं की त्याची खंत वाटते , की त्यातून निर्भेळ आनंद मिळतो ? या सगळ्या सहेल्यांच्या जीवनाने घेतलेले वेगवेगळे आकार विलोभनीय वाटतात . मोडतोड न करता , चौकटीत न बसणाऱ्या या सहेल्या इथल्या – तिथल्या
ग्रीस आणि भारत या देशांना अतिशय प्राचीन संस्कृतीचा उज्ज्वल वारसा लाभला आहे. मौखिक आणि चिरंतन महाकाव्यांची निर्मिती करणारे हे दोनच देश आहेत. दोन्ही देशांतील महाकाव्यांत आणि पुराणकथांमध्ये विलक्षण साम्यही दिसून येतं. या महाकाव्यांचा विषय संहारक युद्ध हा असून त्यातून प्रकट झालेलं तत्त्वज्ञान, डोकावणारा इतिहास, मानवी प्रवृत्ती, धर्माच्या संकल्पना या सर्व घटकांमुळे ही महाकाव्यं विविध पातळ्यांवर समृद्ध ठरतात. या पुस्तकात सुरुवातीला लेखिकेने ग्रीक वाङमयाची पार्श्वभूमी दिली आहे. पुढे ग्रीक पुराणकथांची वैशिष्ट्यं सांगून अभिजात साहित्यमूल्य असलेल्या रोचक ग्रीक पुराणकथा लेखिकेने पुस्तकासाठी वेचल्या आहेत. त्यात झ्यूस, हेरा, अथिना यांसारख्या देवतांच्या कथा आणि ऑर्फीयस व पॅन्डोरा सारख्या इतर कथांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ओडिसी व इलियड ही महाकवी होमरने साकारलेली महाकाव्यं, एस्किलस-सॉफोक्लिस-युरिपिडीस लिखित शोकांतिका यांचाही आढावा घेऊन लेखिकेने एक व्यापक वाङ्मयीन पट या पुस्तकाला प्राप्त करून दिला आहे. प्राचीन ग्रीक माणसाच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, आकांक्षा, तत्त्वज्ञान, स्वप्न, कल्पना प्रतिबिंबित करणारं असं हे
अभिजात वाङमय मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन अंतर्मुख करतं. सर्जक कलावंताला आविष्काराची प्रेरणा देणाऱ्या, मानसशास्त्रज्ञाला मनाच्या कानाकोपऱ्याकडे बघायला प्रवृत्त करणाऱ्या आणि साहित्याच्या व इतिहासाच्या विद्यार्थ्याला माहितीचा नवा खजिना उघडून देणारं रंजक असं…ग्रीकपुराण !
ते’ आणि मी हे शकुंतला पुंडे ह्यांचं एक अनोखा अविष्कार असणारं आगळंवेगळं ललित पुस्तक. या पुस्तकातल्या ‘ते’शी लेखिकेचं एक भावनिक नातं तिच्या नकळत निर्माण होत गेलेलं आहे. ते नातं इतकं उत्कट, मधुर अन् जिवाभावाचं झालेलं आहे की, कोकणातला मुक्त, घनदाट, विस्तीर्ण निसर्ग असो वा शहरातल्या घराच्या गॅलरीतला बंदिस्त मंच किंवा गॅलरीबाहेरचा ‘हिरवा रंगमंच’ असो, हे नातं जणू तिच्या जगण्याचाच एक धागा होऊन जातं. ‘ते’ आणि लेखिका यांचं जगणं एकमेकांत गुंतलेलं, एकमेकांशी बांधलेलं, जणू सलग घट्ट वीण असलेल्या रेशमी वस्त्रासारखंच कसं होऊन जातं याचं एक मनोज्ञ दर्शन या पुस्तकात सर्वत्र, सतत घडत राहतं.
आपल्या बालपणापासून आजपर्यंत ‘ते’शी अलगद जुळत गेलेले भावबंध लेखिकेने सरळसाध्या तरीही वेधक अशा शैलीत मांडलेले आहेत. त्यामुळे वाचकही स्वत:च्या नकळत लेखिकेच्या आनंदविश्वाचा वाटेकरी होतो. ‘ते’ आणि मी हे पुस्तक वाचणं म्हणजे निखळ आनंदाचा अनुभव आहे अन् निखळ अनुभवाचा आनंदही आहे!
आलेल्या क्षणाला सहज सामोरं जाणं हे तत्त्व झेन तत्त्वज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक मानलं जातं. या तत्त्वाचं आचरण करण्यासाठी शिकागोस्थित लेखक धनंजय जोशी यांनी भारतातून, थायलंडमधून आणि दक्षिण कोरियातून अमेरिकेत आलेल्या बौद्ध गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विपस्सना (विपश्यना) आणि झेन मेडिटेशन या दोन्ही अध्यात्मपरंपरांची प्रदीर्घ काळ साधना केली. एवढंच नव्हे तर त्यांनी झेन तत्त्वज्ञान आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालून ललितशैलीत अनुभवकथन लिहिलं. त्याचंच हे पुस्तक म्हणजे ‘सहज’.
रोजच्या जगण्यातल्या नेहमीच्या अनुभवांना झेन कथा, झेन गुरूंच्या आठवणी किंवा प्रसंग यांची जोड देऊन जोशी लीलया झेन तत्त्वज्ञानातली मूलतत्त्वं आपल्याला त्यांच्या या लहानशा लेखांमधून सांगून जातात. विशेष म्हणजे ती सांगत असताना त्यांचा सूर उपदेशकाचा नसतो. तो सहज, पण काहीतरी महत्त्वाचं सांगून जाणारा असतो.
एखाद्या मित्राने किंवा जवळच्या व्यक्तीने त्याला आकळलेली शहाणीव जाता जाता आपल्याला सांगून जावी, असा अनुभव देणारं पुस्तक… ‘सहज’…
‘पोएट टू पोएट’ या अभिनव संकल्पनेतून सुप्रसिद्ध प्रतिभावान जर्मन कवयित्री उलरिकं द्रेस्नर हिच्या निवडक जर्मन कवितांचं अरुणा ढेरे व जयश्री हरि जोशी यांनी साकारलेलं अनुसर्जन…
वेगवेगळ्या देशांतले भूप्रदेश तिथल्या सांस्कृतिक संदर्भांसकट उलरिकं यांच्या काव्यात्म अनुभवाचा भाग झालेले आहेत. त्यामुळे मराठी कवयित्रींच्या अनुभवविश्वापेक्षा तिचं अगदी निराळं आणि समृद्ध असं अनुभवाचं जग तिच्या कवितांमधून समोर येतं.
सांस्कृतिक संदर्भांपासून पूर्ण मुक्त अशा स्त्रीशरीराच्या अनुभवापासून थेट मानवजातीच्या उत्क्रांतीच्या इतिहासापर्यंत आणि स्त्रीपुरुष संबंधातल्या ताण्याबाण्यापासून बर्लिनच्या भूत-वर्तमानापर्यंत तिच्या कवितेचा विस्तृत पैस आहे…
– अरुणा ढेरे
ही कविता ध्वनीचे बोट धरून दृश्यप्रतिमांची उकल करते. उलरिकंला शब्दांचे खेळ करायला आवडतात. नवीन शब्दांचे सर्जन करण्यात तिचा हातखंडा आहे.
दृश्य रूप हे तिच्या कवितेचे विशेष लक्षण आहे. उलरिकंची कविता माणसा-माणसांतील समीकरणं आणि लालसा, त्यांच्या भावनांचे खेळ, आकांक्षाचे ओझे हे जगाच्या पाठीवर सारखेच असते हे दाखवून देणारी.