यशोदा वाकणकर

यशोदा वाकणकर ही अनिल व अनिता अवचट यांची धाकटी मुलगी . लहानपणी झोपडपट्टीतल्या महानगरपालिकेच्या शाळेत शिकली . कॉलेजमध्ये ' कमर्शिअल आर्ट मध्ये शिक्षण घेतलेल्या यशोदाने अनेक वर्ष आर्टिस्ट म्हणून काम केलं . परंतु , स्वतःला असलेल्या एपिलेप्सीच्या व्याधीतून प्रेरणा घेऊन यशोदाने २००४ मध्ये पुण्यात ' संवेदना फाऊंडेशन ' -एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप सुरू केला . त्यासाठी तिने क्लिनिकल सायकॉलॉजी मध्ये एम.ए. केलं . बंगलोर युनिव्हर्सिटीतून ' डिप्लोमा इन एपिलेप्सी केअर ' केलं . गेली अठरा वर्ष कार्यरत असलेली ' संवेदना फाऊंडेशन ' ही संस्था एपिलेप्सी विवाह मंडळ , गरिबांसाठी एपिलेप्सी औषध मदत योजना , एपिलेप्सी जनजागृती अशा अनेक एपिलेप्सीशी निगडित पैलूंवर अविरत काम करत आहे . आज हे काम केवळ महाराष्ट्रातच नाही , तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आहे . यशोदाला माणसं जोडायला खूप आवडतं . गेली अनेक वर्ष तो विपश्यना करते . यशोदाला शास्त्रीय संगीत , बागकाम , हिमालयातील भटकंती , वाचन , लिखाण , स्वयंपाक असे अनेक छंद आहेत .

लेखकाची पुस्तकं

मैत्री एपिलेप्सीशी


यशोदा वाकणकर


यशोदा वाकणकर…

एपिलेप्सीचे दुष्परिणाम सोसल्यानंतर अगदी सर्वसामान्य जीवन जगणारी एक रुग्ण…
पण तिला आता ‘रुग्ण’ असं म्हणणं योग्य ठरेल का?
तर , नाही!
 सर्वसामान्य जीवन जगता जगता ती बरंच काही विधायक काम करत असते. ‘संवेदना’ एपिलेप्सी मदत गट हा अशा कामातील एक उपक्रम.
या गटाच्या माध्यमातून ती एपिलेप्सीच्या रुग्णांना आणि त्यांच्या पालकांना मोलाची मदत करत असते.
या पुस्तकाचं तिचं लिखाणही अशाच उपक्रमाचा एक भाग म्हणता येईल.
एपिलेप्सीचा त्रास असणाऱ्या मुलांचं पालकत्व करताना कोणती काळजी घ्यावी?
त्या रुग्णांचा आहार कसा असावा ?
औषधोपचाराचं महत्त्व किती ?
सर्जरीच्या पर्यायांचा विचार कसा करावा ?
एपिलेप्सीच्या अशा विविध पैलूंविषयी माहिती देणारं आणि अनुभवांच्या आधारे मार्गदर्शन करणारं पुस्तक…

मैत्री एपिलेप्सीशी… !



260.00 Add to cart