वैजयंती केळकर
अनेक वर्षं सातत्याने लिखाण केलं असून वैजयंती यांची विविध विषयांवरील २४ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांद्वारे त्यांनी आपले नवरात्र, आपली मंगळागौर, भोंडल्याची गाणी, असे करा साठवणीचे पदार्थ, पावाच्या विविध पाककृती, सूप-सरबते, सण वर्षाचे व त्यांची पक्वान्ने, पोळ्या, पराठे, विविध भाज्या, दमफूल बिर्याणी, कडधान्याचे विविध प्रकार, २०० प्रकारची लोणची, विविध वड्या, लाडू, मसाले, चटण्या, सॉस, लज्जतदार मसाले, वरीपासून खिरीपर्यंत, पौष्टिक पालेभाज्या, या विषयांसंबधी लेखन केलं आहे. ‘कलातरंग’, ‘अस्ताई’ हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी टीव्ही व आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम केले असून त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.